Welcome to misalpav.com
लेखक: मृत्युन्जय | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

लेख आवडला असं म्हणवत नाही ते केवळ त्यातल्या मृत्यूच्या संदर्भामुळे. कारण बारीक तुमच्याही अवती भोवती कुठेतरी असेल. असेल तर त्याला ओळखा. आणि इतक्यात त्याला भेटला नसाल तर भेटा. कधी खुप उशीर होइल् सांगता येणार नाही. आणि फक्त हळहळत बसणे ही बारीकसाठी खुप फुसकी श्रद्धांजली असेल. ही अशी हळहळ तर प्रत्येक माणूस जाताना मागे ठेवून जातो!

अतिशय हृद्य व्यक्तिचित्रण. बारीक अजून तुम्हा मित्रांच्यासोबत आहे असंही कसं म्हणू? असा माणून इतका जवळून भेटणे आणि असा अकाली निघून जाणे हे नशीब म्हणायचं. त्याचं नसणं सहन करण्याची ताकद तुम्हाला मिळो ही सदिच्छा.

+१ सुरेख चित्रण. अगदी डोळ्यासमोर उभे केलेत.

वयाची ६० - ७० वर्षे जगाला ओरबाडुन झाल्यावर कॅन्सर होउन सुद्धा नको ती माणसे दशक २ दशक आरामात ओढतात
हे मात्र पटले. कँसर होउन सुद्धा ही माणसे जगाला नव्या जोमानी जास्तीत जास्त ओरबाडतच आहेत.

आवडले. बारीक सारख्या काही विभूती पाहिल्या आहेत. अकाली (अजून तरी) गेल्या नाहीत इतकाच काय तो फरक. अगदी प्रत्ययकारी वर्णन केलेले आहे.

सुरेखच लिहलं आहे व्यक्तीचित्रण.
फेविकोल इतक्या घट्टपणे त्याने आख्खा ग्रुप सांधला होता. आम्हा इतर सगळ्यांचे एकमेकांशी बोलणे होवो न होवो बारीक सगळ्यांच्या संपर्कात असायचा.
प्रत्येक गृपमध्ये असा एखादा माणूस नक्कीच असावा असं वाटतं.

आमच्या अश्याच मित्राची आठवण करुन दिलीत आज परत. योगायोग म्हणजे आम्ही त्याला नेहमी जाड्या हाक मारयचो. तोही असाच ३४ वर्षाचा असत्तांना हार्ट अटॅकने गेला. अजुनही तो दिवस आठवला की काटा येतो अंगावर. गणपतीमध्ये त्याला बरोबर नेल्याशिवाय आम्ही कधीच गेलो नाही. कितीही मोठी रांग असली तरी त्याच्या ओळखिचे कोणी भेटले नाही असे कधीच झाले नाही, आमचे गावातले सगळे गणपती एका रात्रीत बघून व्हायचे आणि मग उरलेले ४ दिवस आम्ही गणपती बघायच्या नावाखाली खुप भटकायचो. सोनेरी दिवस होते ते. असो. तुमचे लिखाण खुप ओघवते झाले आहे. वाचतांना त्यात अडकायला होते. धन्यवाद, आमच्या मित्राची आठवण ताजी केल्याबद्दल.

पाळायचा असेल तर माणसाने कुत्रा पाळावा, वेळ ही काय पाळायची गोष्ट आहे
बाकी हे वाक्य आमच्या मित्राच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. देवाला पण घाई झाली होती माहीत नाही, पण आमचा मित्र आमच्यापासून हिरावून एक पोकळी दिली त्याने, कधीही भरुन न निघणारी. श्या उग्गाच वाचलं हे... :(

तुमच्या मित्राला खरी श्रद्धांजली वाहिलीत तुम्ही! मनापासून लिहिलय. >> +११११११११११

मित्राची अशी अवेळी एक्झिट फार फार त्रास देऊन जाते. :( छान लिहिलंयस असं तरी कसं म्ह्णू? :(

तुमी नाय वो.. मंद्या.. मंदार गोड्बोले.. त्याला " दमदार" म्ह्णायचो..

दोस्तोंका गम दोस्त हि जाने :( आमचे भाडखाऊ हरामखोर मित्रमंडळ कुठे उलथायला गेलेत कोण जाणे. सर्वांना हा धागा फॉर्वर्ड करतो. अर्धवटराव

... आमचा वर्गमित्र हा. जेव्हा तो गेला, त्याच्या थोडं दिवस आधी त्याच्या फेसबुक पेजवर त्यानेच काढलेला एक सुंदर फोटो होता - बहुतेक 'बर्गर' चा..अगदी आर्टीस्टीक......आणि मग एकापाठोपाठे एक 'तुझी आठवण येते..' अशा पोस्ट यायला लागल्या. अगोदर वाटलं की हे असलं खाणं खाऊन होणार्‍या परीणामांची कल्पना करून विनोदच चालू आहेत . काहीतरी वेगळं आहे हे कळायला थोडा वेळ लागला होता..... भयानक गेला तो दिवस... आमच्या ग्रुपवर एकाने हा लेख फॉरवर्ड केला होता. फारच हृदयस्पर्शी लिहिलंयत....

अपनी यादें अपनी बातें लेकर जाना भूल गये, जाने वाले जल्दी में मिलकर जाना भूल गये... बारीकला जाउन आज २ वर्षे झाली म्हणुन धागा वरती काढत आहे फक्त

मला वाटतं असा एक 'बारीक' सगळ्यांच्याच सर्कलमध्ये असतो की काय! आमचाही 'बारीक' गेलेल्याला दोनेक वर्षे होऊन गेलीत. नुकताच त्याचा वाढदिवस होऊन गेला... स्साला हरामखोर. काय असा अचानक गेला! छ्या:...

का नजरेतून सुटला?
तुमच्या मित्राला खरी श्रद्धांजली वाहिलीत तुम्ही! मनापासून लिहिलय.
तंतोतंत सहमत.

5'9" उंच अन भरघोस 'बारीक' असा समक्ष समोर उभा राहिला आमच्या असे लेखन जमले आहे मृत्युंजय भाऊ, बारीक खूप मोठ्या प्रमाणात तुमच्या मनात जिवंत असल्याची जाणीव खूप सुखद आहे बघा