@माझीही शॅम्पेन, @मिसळपाव, @मुक्त विहारि, @गणपा, @तथास्तु प्रतिसादाबद्धल धन्यवाद!
@सिवाजी-द-बॉस फँटसी कथा आवडणार्या बर्याचजणांना सेल्फ हेल्प प्रकार बिलकूल आवडत नाहीत हा अनुभव आहे.
फँटसी कथा आवडणार्या बर्याचजणांना सेल्फ हेल्प प्रकार बिलकूल आवडत नाहीत हा अनुभव आहे.
वास्तव निरीक्षण आहे. उगा खाटल्यावर बसलेले असताना देवाने/हॅरि पॉटरने ह्यांना आयतं हातात घबाड ठेवावं हिच यांची अपेक्षा असते. कश्ट नकोत बगा ना मनाचे ना शरिराचे. असो तुम्हि अनावश्यक विषयांतर केलच होत तर म्हटल दोन शब्द मी सुध्दा लिहावेत.
राहता राहिला सेल्फ हेल्पचा फंडा, ते फारच जेनेरिक स्टेमेंट आहे म्हणुन विरोध करत नाहि. पण रस्त्याच्या कडेला मिळणारी हि म्यानेजेमेंटची पुस्तके मुळातच कॉमन्सेन्स निर्माण करायला त्रोटक असतात. अस वैयक्तिक मत आहे.
या जगात हायलि इफेक्टिव कसे बनावे याचे लेखन वाचन करणे व प्रत्यक्ष बनणे यात जमिन आस्मानचा फरक असतो. व ही पुस्तके वाचुन वा अॅप्रिशिएट करुन व्यक्ति हायलि इफेक्टीव्ह नवे तर हायलि डिफेक्टिव्ह बनतो असेच निरीक्षण आहे.
या जगात हायलि इफेक्टिव कसे बनावे याचे लेखन वाचन करणे व प्रत्यक्ष बनणे यात जमिन आस्मानचा फरक असतो. व ही पुस्तके वाचुन वा अॅप्रिशिएट करुन व्यक्ति हायलि इफेक्टीव्ह नवे तर हायलि डिफेक्टिव्ह बनतो असेच निरीक्षण आहे.
याच्याशी सहमत. नुसती पुस्तक वाचून फक्त पुस्तकी शहाणपण येतं. प्रत्यक्ष कृती फार कमी लोक करतात. पण कधी कधी अडल्या नडल्याला मार्गदर्शन होतं.
फँटसी कथा आवडणार्या बर्याचजणांना सेल्फ हेल्प प्रकार बिलकूल आवडत नाहीत हा अनुभव आहे.
विरोध!
फँटसी कथा या सेल्फ हेल्पपेक्षा भारी असतात असं मला वाटतं. नायक/नायिका संकटात आहेत आणि अचानक देवदूत/परी वगैरे धावून येते आणि नायकाची सुटका होते असं फँटसी पुस्तकांत सहसा घडत नाही. (अगदी "जादूगाराचा जीव पोपटात" वगैरे छाप कथांमध्ये पण नाही.)
.
मिपावरच किमान दोन तरी आयडींनी बॅटमॅन सीरिजमधली वाक्यं आपल्या स्वाक्षरीत वापरली आहेत. हॅरी पॉटर सीरीजमधे सुष्टांना जादू येते तशीच दुष्टांनाही येते. सुष्टांचा विजय होतो कारण प्रेम, आदर, मैत्री, शौर्य वगैरे "मानवी" गुण त्यांच्यामधे असतात म्हणून. "विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिब्लिटी" हा खरंच महत्त्वाचा विचार आहे.
सेल्फ हेल्प अजून काय वेगळं असतं?
ग्रेट पॉवर कम्स विद ग्रेट रिस्पॉन्सिब्लिटी सारखे फंडेच मुळात "फँटसि" असतात कारण (रिस्पॉन्सिब्लिटी) जबाबदारिची जाणिव एखादी क्षमता विकसित करु शकेल परंतु एखादी विकसित क्षमता जबाबदारिची जाणीव निर्माण करेलच असे नाहि. तसही मोस्ट ओफ द रिस्पॉन्सिब्लिटीज कम्स विदाउट (ग्रेट) पॉवर हे वास्तव फँटसिबाजांना शक्य तेव्हडे टाळायचे असते म्हणून ग्रेट पॉवर कम्स विद ग्रेट रिस्पॉन्सिब्लिटी सारखे शब्दछ्चल त्यांना प्रभावित करतात.
कालच समोरचा पप्पु त्याचि स्वप्नसुंदरी जिवनसाथि म्हणून कधि मिळेल याचा विचार करत होता. मी म्हटलं कधिही नाही. त्याला पुढं बोलु न देता इतकच म्हणालो कि बाबारे याच एकमेव कारण फक्त हेच आहे की तुझ्या (व प्रत्येकाच्या) स्वप्नात केवळ एक नव्हे तर अनेक मुलि येत असतात. :)
सहमत. फँटसी (विशेषतः अॅडल्ट फँटसी) हा मुळातच एक प्रकारचा पलायनवाद आहे. पण हा पलायनवाद विचारांत असलाच तरी कृतीत असेल असं नाही. तुमचा पप्पू स्वप्नसुंदरी कधी मिळेल याचा विचार करत होता. कुणी सांगावं, तो त्या दिशेने पावलं उचलतसुद्धा असेल. तुम्ही त्याला पुढं बोलू दिलं असतंत तर कदाचित त्याने सांगितलं असतं. :)
याच एकमेव कारण फक्त हेच आहे की तुझ्या (व प्रत्येकाच्या) स्वप्नात केवळ एक नव्हे तर अनेक मुलि येत असतात.
हा मुद्दा कळला (कस्टमायझेशन ऑफ फँटसीज). पण याचा "रिस्पॉन्सिब्लिटी - पॉवर" या वरच्या चर्चेशी संबंध कळला नाही. कृपया उस्कटून सांगावे...
हा मुळातच एक प्रकारचा पलायनवाद आहे. पण हा पलायनवाद विचारांत असलाच तरी कृतीत असेल असं नाही
बिंगो! हा पलायनवाद आहे व फँटसिबाज विचारांनी कसे असतात हे स्पश्ट करायचे होते.
तुमचा पप्पू स्वप्नसुंदरी कधी मिळेल याचा विचार करत होता. कुणी सांगावं, तो त्या दिशेने पावलं उचलतसुद्धा असेल. तुम्ही त्याला पुढं बोलू दिलं असतंत तर कदाचित त्याने सांगितलं असतं
त्याने काय करावे हा त्याचा प्रश्न आहे. माझं काम त्याला त्याच्या फॅंटसिची क्षणभंगुरता दाखवुन त्यात त्याने किती गुरफटावे याबद्दल सावध करणे इतपतच आहे. एका मर्यादेपर्यंत त्याच्या कार्याला माझ्या कोटी कोटी शुभेछ्चाच आहेत.
हा मुद्दा कळला (कस्टमायझेशन ऑफ फँटसीज). पण याचा "रिस्पॉन्सिब्लिटी - पॉवर" या वरच्या चर्चेशी संबंध कळला नाही. कृपया उस्कटून सांगावे...
फॅटसिबाजांची मनोवृत्ति विशद करायला हे उदाहरण दिले होते. थोडक्यात ते स्वतःच्या काल्पनिक विश्वाला इतके चिकटुन असतात कि सहज सोपं मुलभुत वास्तव त्या नादात ते कसे आरामात विसरतात हे स्पश्ट करायचे होते. फँटसि हे बहुतांश कल्पनारम्यता/मनोरंजन आहे, तर सेल्फ हेल्प ह्याचा उद्देश केवळ मनोरंजन नसल्याने त्याचि व्यापकता गरज खोलि या फॅटसिबाजाना आकलन होण्यास तुलनेने कठिण असतात. त्यामुळे उस्कटुन समजावणे कितपत जमेल याबाबत शंका आहे तरिही इछ्चा असल्यास सहकार्य नक्कि देइन.
फँटसि हे बहुतांश कल्पनारम्यता/मनोरंजन आहे, तर सेल्फ हेल्प ह्याचा उद्देश केवळ मनोरंजन नसल्याने त्याचि व्यापकता गरज खोलि या फॅटसिबाजाना आकलन होण्यास तुलनेने कठिण असतात.
याच्यावरून.
समजा दोन्ही गोष्टींची आवड असलेला माणूस असेल तर तो भलताच इंट्रेष्टिंग असेल!
असेल असेल...तुम्हाला ते तसं वाटतय तर ते तसच असणार, मला ते समजुन घ्यायला अवघड जातय हा निव्वळ माझा दोष.
समजा दोन्ही गोष्टींची आवड असलेला माणूस असेल तर तो भलताच इंट्रेष्टिंग असेल!
आब्सोलुटली येस. मोस्ट इंटरेस्टिंग पर्सन. एंड अन फॉर्चुनेट्ल्यी अ बिट नर्सिसिस्ट. म्हणजे त्याचे फंडे मनोरंजक असणार पण त्यात मी चि बाराखडी नसेलच याचि अजिबात खात्रि नाही.
बरोबर. पावर चकटफूच निर्माण झाली. पण या देवदत्त/निसर्गदत्त पावरचा विनियोग चांगल्या कामासाठी करता का वाईट हाच त्या रिस्पॉन्सिब्लिटीचा मुद्दा आहे.
म्हणजे आपल्याकडची (पैशांची आणि सत्तेची, बहुदा फुकट मिळालेली) पावर जाणवून एखादा माजतो आणि अंगावर सात किलो दागिने घालून* शरीराचं "वामन हरी पेठे" करतो. दुसरा गुपचूप त्या पैशांचा आणि सत्तेचा उपयोग लोकांना मदत करण्यासाठी करतो. हाच तो "रिस्पॉन्सिब्लिटीचा मुद्दा". फँटसी वास्तवाला भिडते ती इथे.
-
*अतिशय अवांतरः या लोकांना विमानतळावरच्या सिक्युरिटी चेकला किती वेळ लागत असेल!
मिठाचा खडा टाकण्याबद्दल क्षमा करावी. पण मला हे पुस्तक "बोलाची कढी बोलाचाच भात" या पठडीतलं वाटतं. म्हणजे थियरी उत्तम, पण प्रत्यक्ष जगण्यातल्या खाचाखोचांसाठी काय उपाय?? काही मार्गदर्शन???
दोन उदाहरणं:
१. "मिशन स्टेटमेंट" - हे पुस्तक वाचल्याचं आणि आवडल्याचं सांगणारे कैक भेटले, पण तुझं मिशन स्टेटमेंट काय रे भौ? असं विचारल्यावर बरेच गडबडले. जे उरले त्यांनी आपली मिशनं काळसुसंगत / परिस्थितीसुसंगत बदलली. असं होण्याचं कारण म्हणजे माणूस सर्वज्ञानी नाही. माणसाकडे "सीमित शहाणपण" (बाऊंडेड रॅशनालिटी) असते. त्या त्या परिस्थितीत तो त्याला योग्य वाटेल असे निर्णय घेतो. तात्कालिक परिस्थितीच्या रेट्याने तत्त्वंसुद्धा बदलावी लागतात, तिथे मिशन स्टेटमेंटचं काय घेऊन बसला राव!
२. क्वाड्रंट प्रकरण - हा माझ्या बॉसचा आवडता उद्योग होता. तो सगळ्यांना आपली कामं अशी चार चौकटींमध्ये विभागायला लावायचा. इथपर्यंत छान. मेथॉडिकल वगैरे. पण त्याचे आणि माझे क्वाड्रंट कधी जुळायचेच नाहीत. त्याच्यामते जे क्वा.१ ते माझ्यामते क्वा.३. मग मारामार्या!
तुमचं म्हणणं योग्य आहे. पण...
मिशन स्टेटमेंट यावर त्यांनीच केलेलं भाष्य मला आवडलं "We detect rather than invent our mission in life" आणि ते मला पटलं. हे डिटेक्ट कधी होईल ते मात्र सांगण कठीण आहे. १० वर्षापूर्वी जर का माझ्या हातात हे पुस्तक दिलं असतं तर मलाही फारसं आवडलं नसतं. ह्या पुस्तकातले विचार हा "टॉप डाऊन" अॅप्रोच आहे. म्हणजे तुम्हाला प्रथम मिशन, व्हिजन कळलं पाहिजे वगैरे. मग तुम्ही क्वाड्रंट वगैरे वर येता. समाजातली फार कमी लोक असतात की त्यांना ध्येय वगैरे कळलेलं असतं.
मिशन आणि क्वाड्रंटच्या अगदी उलटा अॅप्रोच डेव्हिड अॅलनचा (जीटीडी) आहे. तो "बॉटम अप" आहे. तो एकदम मिशन स्टेटमेंटवर येत नाही. "पहिली हातातली कामं" यावर येतो आणि १-२ आठवडे, वर्ष वगैरे वर जायला सांगतो. कदाचित ते पुस्तक तुम्हाला थोडफार योग्य वाटेल.
१. लोकानी मिशन स्टेटमेंट केलं नाहि हा लोकांचा दोष, कोव्हीचा नाहि१
२. क्वाड्रंट जुळले नाहित ठिक आहे. पण मुळात तुला क्वाड्रंट पद्धतीत काहि त्रुटी जाणवल्या का?
चुकिच्या कारणांसाठी पुस्तक/विचार बाजूला सारतोयस असं वाटलं.
मस्त सुधीर
याचे pdf पण उतरवून घेतले आहे
http://boykepurnomo.staff.ugm.ac.id/wp-content/uploads/the-7-habits-ofhighly-effective-people.pdf
येथे मिळेलच
पण तुमचा मराठी अनुवाद पण भारी जमलाय
स्पा यांनी दिलेल्या लिंक बद्धल आपलं मत असतं तर कदाचित योग्य आहे. कारण त्या पीडीएफ मध्ये आकृत्या नाहीत. मुद्रण आवृत्ती मधले सगळे उतारे असतील का तेही मला सांगता यायचं नाही.
पुस्तकात जे काही आहे ते मी दोन भागात मांडलं आहे. मला तरी त्यात वावगं असं काहीच दिसलं नाही.
तुम्ही म्हणताय तसं "गोल गोल शब्द फेक" यानंतर आलेल्या दुसर्या पुस्तकांमध्ये मला प्रकर्षाने जाणवली. पण यात मला लेखकाचा प्रामाणिक भावला.
असो, कव्हींनीच म्हटलयं की प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. त्यामुळे तुम्हाला हे पुस्तक आवडलं नाही हे तुमचं मत आहे. पण माझं मत तरी मला हे खूप वेगळ वाटलं आणि आवडलं.
इथे लोक वर्षानुवर्शांची मेहनत, प्रयत्न, कश्ट, अभ्यास याच्या आधारे भगिरथ प्रयत्नानी भौतिक यश खेचुन आणतात त्यांचे परिश्रम, चिकाटी वगैरे वगैरेचे कौतुक बाजुलाच राहो, त्याकडे संपुर्ण दुर्लक्ष करुन नुसते दोन फंडे मनात रेंगाळुन बाकिच सगळ आपोआप फुकटात घडत असत असलं भुक्कड सिक्रेट शिकवणे म्हणजे त्या लेखकाने समाजाचि खरोखर केलेलि कृर चेष्टा आहे.
चपलिने मारलं पाहिजे असलि अंधश्र्द्धा पसरवणार्याला.
हे पुस्तक प्रामुख्याने "लॉ ओफ्फ अॅट्रक्शन" विस्कुटुन (सिक्रेट) सांगते असा दावा करते. बर हे सिक्रेट काय आहे तर "थोट्स बिकम्स रिअॅलिटी". म्हणजे काय मला १० कोटी हवेत असा विचार करत असाल तर १० आपोआप मिळणारच. बास दॅट्स इट. तुम्हि करोडपति झालात समजा. आणि फक्त हेच तत्व वापरुन जगातल्या महान लोकानी महान गोश्टी साध्य केल्यात. ज्याना साध्य करता आलं नाही त्यांना हे सिक्रेटच माहित नाही हेच एकमेव कारण आहे.
अरे हो... आता यशाचे इतक सोप सिक्रेट मिळाल्यास लगेच हुरळु नये, कारण लेखक सरांना तोडीस तोड आहेच पण त्याने एक सॉलिड पाचर मारलि आहे या सिक्रेट्मधे. काय तर म्हणे आपण जेंव्हा १० कोटी हवेत हा विचार करतो तेंव्हा मुळात आपल्याकडे १० कोटी नाहित हाच विचार आपण खरे करत असतो अन सिक्रेट काय म्हणत तर "थोट्स बिकम्स रिअॅलिटी" म्हणून आपल्याकडे १० कोटी येत नाहित.
तरा हा असला "लॉ ऑफ अॅट्रॅक्शन" प्रेम्,पैका व एखाद्या कार्यातिल यश, रिलेशन्शिप, व्यक्तिगत महत्वाकांक्षापुर्ति यासाठि कसा अप्लाय करायचा ह्याचे फंडे दिलेत, पण अर्थातच पाचर ठोकुनच. सोबतिला उगाच फ्रिक्वेन्सि, डिमेन्शन वगैरे वैज्ञानीक वापरुन अंधश्रध्दांचा इतका आचरट्पणा भरला आहे कि... लेखक प्रत्यक्ष समोर आला तर...
सुधीर भाऊ : आपण खुपच छान असे परिक्षण लिहिले आहे. आपली मेहनत लक्षात घ्यायला हवी. आढावा कसा घ्यावा हे आपल्या लेखातुन समजु शकते. पुनश्च अभिनंदन आणि पूढील काळासाठी शुभेच्छा.
दोन्ही भाग आवडले.
Life is a journey, not a destination.Slow down and enjoy life. It's not only the scenery you miss by going too fast - you also miss the sense of where you are going and why.
यासाठी मिशन स्टेटमेंट हवंच...पण प्रत्यक्षात ते कसे करायचे हे शोधणे हे अतिशय अवघड आहे..आपले मिशन शोधणे हे येरागबाळ्याचे काम नव्हे. मला तरी आतापर्यन्त स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातील "अभौतिक" मिशन स्टेटमेंट बनवलेला कोणी भेटलेला नाही. :)
प्रतिक्रिया
वाह एकदम झकास सुरूवात , पु-ले
सुधीर, स्टीव्हन कोव्हीचे
पुस्तक तर मस्त आहेच आणि...
+१
या पुस्तकाचा सारांश एका दमात
+१००
@नुसतं शिवधनुष्य छान पेललेलं
*****
सेव्हन हॅबिट्स
धन्यवाद!
विदा महत्वाचा.
सहमत
या जगात हायलि इफेक्टिव कसे बनावे याचे लेखन वाचन करणे व प्रत्यक्ष बनणे यात जमिन आस्मानचा फरक असतो. व ही पुस्तके वाचुन वा अॅप्रिशिएट करुन व्यक्ति हायलि इफेक्टीव्ह नवे तर हायलि डिफेक्टिव्ह बनतो असेच निरीक्षण आहे.याच्याशी सहमत. नुसती पुस्तक वाचून फक्त पुस्तकी शहाणपण येतं. प्रत्यक्ष कृती फार कमी लोक करतात. पण कधी कधी अडल्या नडल्याला मार्गदर्शन होतं.फँटसी कथा आवडणार्या बर्
विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट
असो.
सहमत. फँटसी (विशेषतः अॅडल्ट
:)
म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे
असं तुम्हाला का बरे वाटलं ?
फँटसि हे बहुतांश कल्पनारम्यता
याच्यावरून
म्हणजे त्याचे फंडे मनोरंजक
बरोबर. पावर चकटफूच निर्माण
मिठाचा खडा टाकण्याबद्दल क्षमा
धन्यवाद
बरोब्बर! डेव्हिड अॅलनचं
बरोब्बर! डेव्हिड अॅलनचं
हा काही कोव्हीचा दोष नव्हे!
खुप छान समजावून दिले आहे.
मस्त सुधीर
भंपक पुस्तक!
तद्दन भंपक पुस्तक आहे.
निस्ती गोल गोल शब्द फेक आहे.
:(
करेक्शन
आं? कमाल आहे.
पण...
वाचकांनी सावध असावे!कशापासून ते पण लिहा :)र्होंडा ब्र्यान चे द सिक्रेट
धन्यवाद
"चान" हा योग्य शब्द आहे!
द सिक्रेट इतके अंधश्र्द्धा जोपासणारे पुस्तक सध्या वाचलं नाही
समजले नाही
पुस्तक वाचलय काय ?
अभिनंदन.
सेव्हन हॅबिट्स सारांश
दुसरा भाग मलाच शोधावा लागला
मी पुस्तक चाळलेलं आहे.
मस्त. आमच्या ऑफिस मध्ये
मिशन स्टेटमेंट हवंच,पण कसं ?