Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फिश फ्राय

त
त्रिवेणी
Mon, 07/15/2013 - 16:30
नमस्कार मंड्ळी, माझ धनी ३ वर्षानंतर परत आता वशट खाऊ लागल्यात.(ही लाईन अपर्ना ताईंच्या मागच्या एका लेखातील लिखाणाची कापी) ही मागील कोकण सफरीची क्रुपा. तर म्ह्ट्ल चला आज फिश फ्राय करुया. साहित्य:- पापलेट - २ तंदुर मसाला- २ चमचे लाल तिखट- २ चमचे कांदा लसुन मसाला- २ चमचे ह्ळद- १ चमचा लिंबु- १ लसुण- ८ ते १० पाकळ्या मिठ- गरजेनुसार तेल- प्रत्येकाच्या डायट्नुसार रवा- २ चमचे बटर(चहा सोबत खातो ते)- ३Album 1 (मी स्वःतसाठी दिड पाव सुरमई सुध्दा घेतली होती. फोटोत दिसेलच तुम्हाला.) क्रुती- १)पापलेट साफ करुन त्याला लिंबु+मिठ+हळद लावुन १५-२० मिनीट ठेवावे. २)त्यादरम्यान तिखट्,तंदुर मसाला, कांदा लसुन मसाला,ठेचलेल्या लसुन पाकळ्या एकत्र करुन मॅरिनेट केलेल्या फिशला लावुन कमीत कमी १ तास ठेवावे. ३)रवा+बटरचा चुरा एकत्र करुन त्यात चवीपुरते मिठ व तिखट टाकावे. ४)मॅरिनेट फिश वरील रव्याचे मिश्रण लावुन शॅलो फ्राय करावे. fish fry fish fry fish fry fish fry

प्रतिक्रिया द्या
15497 वाचन

💬 प्रतिसाद (29)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 07/15/2013 - 18:10 नवीन
मस्त दिसतायेत फीश फ्राय. आवडले. अजून येऊ द्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Mon, 07/15/2013 - 18:40 नवीन
फिश फ्राय आपला वीक पॉईट आहे. पण रवा असुनहि बटरचा चुरा लावण्याचे प्रयोजन समजले नाहि?
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 07/15/2013 - 23:03 नवीन
'प्रयोजन समजले नाही' हा प्रश्न आहे की विधान? असो. बटरच्या चुर्‍यामुळे मसाल्यातील पाण्याचा अतिरिक्त अंश शोषला जाऊन माशाला रवा चांगला चिकटावा हा उद्देश असू शकतो. त्यासाठी रव्यात किंचित तांदूळाचे किंवा गव्हाचे पीठ मिसळले तर अधिक चांगला परिणाम दिसून येतो. त्यातल्या त्यात मी तांदूळाचे पीठ वापरतो. त्याने कुरकुरीतपणा वाढतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत
ग
गणपा Tue, 07/16/2013 - 09:46 नवीन
त्यातल्या त्यात मी तांदूळाचे पीठ वापरतो. त्याने कुरकुरीतपणा वाढतो.
सहमत. आमच्या घरी मासे तळताना रव्या ऐवजी तांदळाचं पीठच वापरलं जातं. कधी पीठ संपलं असेल तरच मग रव्याचा नंबर लागतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
त
त्रिवेणी Tue, 07/16/2013 - 06:28 नवीन
पेठकर काकांनी बरोबर सांगितले. माझी एक मेत्रिण बटर आणि बर्याचदा मारी बिस्कीटही रव्यात मिक्स करते म्ह्णून मी सुध्दा हा प्रयोग करुन बघितला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत
प
पैसा Mon, 07/15/2013 - 20:02 नवीन
त्रिवेणीचे प्रयोग सुरू झालेले दिसतात! तुमच्या अहोंना नक्की आवडले असणार!
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Tue, 07/16/2013 - 06:36 नवीन
हो ताई आवड्ले अहोंना. पण तुम्ही सांगितलेल्या आमंत्रण मधील फिश फ्राय आणि करी अजुन आठ्वते. तशी करी करुन बघण्याचे खुप मनात आहे. अवांतर - गणपतीपुळे येथील होटेल समीर मध्येही मस्त फिश मिळाले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
प्रभाकर पेठकर Mon, 07/15/2013 - 23:05 नवीन
मसाल्याची पद्धत वेगळी आहे. वापरून पाहीली पाहिजे.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 07/16/2013 - 01:10 नवीन
आहा! आहा! लागलं, लागलं! लग्न मुरायला लागल. हरकत नाही, चला. आनंद आहे. बा द वे मासा मस्त दिसतो आहे. अगदी खंगरी पाककृती. मी मात्र प्रॉम्फ्रेट सोडुन सुरमाईच्या मागे धावेन.
  • Log in or register to post comments
G
garava Tue, 07/16/2013 - 04:43 नवीन
वाह! तोंडाला पाणी सुटले..!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 07/16/2013 - 05:34 नवीन
फिश फ्राय.... रविवार सार्थकी लागणार आमचा..
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Tue, 07/16/2013 - 06:21 नवीन
प्रतिसादा बद्द्ल सग्ळ्यांना खुप खुप धन्यवाद.
  • Log in or register to post comments
B
bharti chandanshive१ Tue, 07/16/2013 - 06:57 नवीन
मसाल्याची पद्धत वेगळी आहे. खुप छान आहे
  • Log in or register to post comments
म
मी_देव Tue, 07/16/2013 - 08:55 नवीन
Ekdum bhari
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 07/16/2013 - 09:48 नवीन
इथे हे घरचे मासे मिळत नसल्याने असले हे धागे पहाणे म्हणजे मानसीक छळ आहे.
  • Log in or register to post comments
म
मालोजीराव Tue, 07/16/2013 - 10:41 नवीन
असले हे धागे पहाणे म्हणजे मानसीक छळ आहे.
हापिसात बसून पेरी-पेरी चिकन बघताना आमचाबी मानशिक छळ होतो…गनपाशेट ;)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 07/16/2013 - 10:44 नवीन
शेम हिअर!!! हपिसात बसून अस्ले षड्रसविकार चाळवणारे धागे पाहिले की कामातलं लक्ष उडून जातं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव
म
मी_आहे_ना Tue, 07/16/2013 - 10:48 नवीन
अगदी बरोबर (जेवण झालं असलं तरीही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अनन्न्या Tue, 07/16/2013 - 12:33 नवीन
बाकी डीश छानच असणार, सगळे म्हणतायत म्हणजे!
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Tue, 07/16/2013 - 18:04 नवीन
अनन्न्या ताई रत्नागिरी ट्रिप तर तुमच्या भेटीमुळे सार्थकी लागली. आणि हे सर्व पैसा ताईंमुळेच शक्य झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्न्या
द
दिपस्तंभ Tue, 07/16/2013 - 19:36 नवीन
मस्तच् दिसत आहेत मासे... तोंडाला पाणी सुटले..! जेवनानंतर हि..
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Wed, 07/17/2013 - 06:17 नवीन
प्रतिसादा बद्द्ल सग्ळ्यांना खुप खुप धन्यवाद.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 07/17/2013 - 06:47 नवीन
तोंडाला पाणी आणि हळहळ !...........
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Wed, 07/17/2013 - 07:42 नवीन
अंमळ छळवाद आहे हा ;-)
  • Log in or register to post comments
न
नक्शत्त्रा Wed, 07/17/2013 - 07:46 नवीन
हळहळ...मासा साथि.... बाकी डीश छानच असणार, सगळे म्हणतायत म्हणजे!
  • Log in or register to post comments
स
सांजसंध्या Wed, 10/23/2013 - 19:03 नवीन
बघूनच तोंडाला पाणी सुटलं. आता करायलाच पाहीजे..
  • Log in or register to post comments
व
विशाखा राऊत Wed, 10/23/2013 - 19:33 नवीन
सही...
  • Log in or register to post comments
व
वात्रट मेले Sun, 01/12/2014 - 12:47 नवीन
आज हिला करायलाच सांगतो....:)
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Sun, 01/12/2014 - 19:57 नवीन
चमचमीत मासे. छान फोटो.सोपी पाककृती. पेठकर काकांच्या टिप्स. व्वा! माझी मेजवानी सुरु आहे, फक्त मिपावर!!!! नक्कीच करून पाहीन. येऊ द्या अजून नवीन काहीतरी. आपला मिपा स्नेही: आयुर्हीत
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा