Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सासर-पण-माहेर

B — Bhagwanta Wayal, Tue, 07/16/2013 - 09:07
आहे ग आई मी सुखी समाधानी नको आणू आता तु़झ्या डोळ्यांमध्ये पाणी पितॄतुल्य सासरे माझे मातृतुल्य सासू येतील ग कसे माझ्या डोळ्यांमध्ये आसूं प्रेमळ पती मला जपे फुलावाणी नको आणू आता तु़झ्या डोळ्यांमध्ये पाणी नणंद माझी बहिणीसारखी भावासम दीर आठवेल कसे आता मला ग माहेर जाऊबाईची ती तिंगी आहे फार गुणी नको आणू आता तु़झ्या डोळ्यांमध्ये पाणी बाहेरची कामे मला नाही ग सांगत स्वंयपाकपाणी करते मी घरात्ल्याघरात जीव लावतात मला सर्व मुलीवाणी नको आणू आता तु़झ्या डोळ्यांमध्ये पाणी नाही म्ह्टले तरी रोज आठवण येते तेंव्हा मात्र मन माझे कासाविस होते आठवत बसते तेंव्हा जुन्या आठवणी नको आणू आता तु़झ्या डोळ्यांमध्ये पाणी शहरात झाले मी ग लहानाची मोठी बाबांचा आशिर्वाद होता माझ्या पाठी भावाचा आधार आहे माझ्या मनी नको आणू आता तु़झ्या डोळ्यांमध्ये पाणी संस्कार तुझे मी ग कोरले मनात समर्थांची शिकवण ठेविली ध्यानात सामर्थ्य मिळे देहा मना उभारणी नको आणू आता तु़झ्या डोळ्यांमध्ये पाणी ...........बी.डी.वायळ

प्रतिक्रिया द्या
6173 वाचन

💬 प्रतिसाद (4)
त
त्रिवेणी Tue, 07/16/2013 - 12:16 नवीन
खरच सगळ्या लेकींना असेच सासर मिळो
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 07/16/2013 - 12:53 नवीन
समर्थांची शिकवण ठेविली ध्यानात
समर्थांची शिकवण, सासरी जाऊच नका... बाकी कविता छान आहे.
  • Log in or register to post comments
न
निनाव Wed, 07/17/2013 - 00:35 नवीन
तुम्ही ऑफिस ह्या विषय पलीकडे देखील लिहिता , हे बघून सुखद वाटले. (हलकेच घेणे :) ) शिवाय , कविता छानच । अजून येऊ द्या । तुम्ही खूप छान लिहिता वेग-वेगळे विषय घ्या ।
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal गुरुवार, 07/18/2013 - 08:21 नवीन
प्रतिक्रिया देणार्‍यांचे तसेच वाचकांचे मनापासुन आभार.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा