Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

झालंया सगळ येगळ आता ..

व — वैभव कुलकर्नि, गुरुवार, 07/18/2013 - 05:08
झालंया सगळ येगळ आता ... रगात भी घालतंया घोळ आप -आपल्यात मीसळतानाभी वाचतया रक्तगटाची ओळ सगळं झालया तुटक-तुटक .. नात्याला कृत्रीमतेची ओल बोलणं फकस्त जवळ आलंया .. शब्द राहिल्याती अबोल भाऊ नाही मनात कुणी ... रडतीया चंद्राची ती कोर भाकरीनभी ओ ळ्ख बदललीया .. नग म्हणतीया चूल पिसेच वहित ठेवत नाही कुणी .. झालाय दु:खी तिकडे मोर पाया पडून मूर्ती चोरतुया ...इतका नास्तिक झालाय चोर आंब्याच भी बालपण गेलया ...आणलाया लहानपणीच मोहोर शब्दाच भी वय वाढलया .. लावत्याती कुणाच्याभी जीवाला घोर दुष्टाची ती चक्र रंगवुनी , पिवळ पिकलया ते ऊर पंख फुटलेकी कि पक्षी उडतुया , नग म्हनतुया घर झालंया सगळ येगळ आता ... रगात भी घालतंया घोळ आप -आपल्यात मीसळतानाभी वाचताया रक्तगटाची ओळ

प्रतिक्रिया द्या
1203 वाचन

💬 प्रतिसाद (4)
न
निनाव गुरुवार, 07/18/2013 - 06:19 नवीन
वैभव दा , हि दोन कडवी खूपच आवड्लि. पिसेच वहित ठेवत नाही कुणी .. झालाय दु:खी तिकडे मोर पाया पडून मूर्ती चोरतुया ...इतका नास्तिक झालाय चोर आंब्याच भी बालपण गेलया ...आणलाया लहानपणीच मोहोर शब्दाच भी वय वाढलया .. लावत्याती कुणाच्याभी जीवाला घोर
  • Log in or register to post comments
व
वैभव कुलकर्नि गुरुवार, 07/18/2013 - 06:23 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाव
व
वेल्लाभट गुरुवार, 07/18/2013 - 06:32 नवीन
हॅट्स ऑफ !!!! क्या बात है! काय म्हणावं या काव्याला... चटके लावणा-या ओळी आहेत. इतके बारकावे टिपलेत तुम्ही की बोलून सोय नाही. सुसाट!
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 07/18/2013 - 06:34 नवीन
सुंदर काव्य
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा