Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

' ठोकळे '

D — drsunilahirrao, Sun, 07/21/2013 - 15:23
' ठोकळे ' ठोकळे, ठोकळ्यांचा समूह, मग आख्खा एक ठोकळा किंवा आख्खा ठोकळा, ठोकळ्यांचा समूह आणि किरकोळ ठोकळे : एकूण एकच. लाल ठोकळ्यातून उतरलास की काळापिवळा थांबव शंभरची पत्ती दाखव दिली नाहीस तर तो भाव खाणार रिंकाम्या खिशाने बोंबलत पुढे जाणार एरवी दहावीसचा धंदा ; पण आता नाही, तर कधी कमावणार ? उजवीकडे मोठे भुयार मग भुयारात भुयार ! आणि मग तिथे ठोकळेच ठोकळे, ठोकळ्यात ठोकळे काळे ठोकळे , पांढरे ठोकळे , खाकी ठोकळे , मळकट,कळकट, ठिसूळ आणि बळकट लहान, मोठे, उंच आणि बुटके ; गब्बर आणि फाटके ठोकळे एकदाचे तुझे भुयार शोध सापडले ? नशीब समज ! आपले न परतीचे भुयार सापडणे हाच जीवनाचा उद्देश, हाच शिक्षणाचा फायदा ; अडाण्याला कसला कळतो आणि वळतो कायदा ? आता हळूच कानोसा घे , आवाज नको करुस हे तुझ्या बापाचे नाट्यगृह नाही किंवा पिरबाबाचा उरूस घाई नको थांब ; आधी मोबाईलचा गळा दाब ! लिहिणाऱ्या ठोकळ्याला निरोप दे ; तुझ्या नावाचा पुकारा घे शंभरची पत्ती त्याच्या घशात घाल आणि ठोकळ्यांचा खेळ मांड ! काळे -पांढरे ठोकळे ,पांढरे ठोकळे, निव्वळ काळे ठोकळे ,किरकोळ ठोकळे उभे आणि बसलेले , घुसलेले आणि फसलेले लिहिणारे , बडवणारे , पुकारणारे बाजू मांडणारे ,खोडणारे, तराजुला वारंवार हादरे देणारे, सत्याचा गळा घोटणारे युक्तीवादी ठोकळे ! आणि हा निव्वळ काळा ठोकळा : याच्या अंगाला हजार डोळे;पण डोळ्यांच्या ठिकाणी खोबण. हा कधी कधी मुका आणि बहिरा सुद्धा ! याच्या तराजूत वजन टाक , भावना घाल चुलीत अशुभ रडू ,भेकू नकोस: साला, सकाळी सकाळी अपशकून नको ! गुमान बाजूला ये आणि आणखी एक पत्ती दे, पुढची तारीख घे बोल पटकन, कन्नी काट. पुढच्या तारखेला आहेच गाठ ! नाहीतर मग साडेपाच पर्यंत थांब फरक काय पडणार राजा , तुझीच रोजीरोटी बुडेल ; तुलाच जायचे आहे लांब ! पुन्हा काळा पिवळ्या ठोकळ्यात बस शंभरची पत्ती दे आता लाल ठोकळा शोध जीवतोड धावत; खिडकी पकड आता हे धावणारे ठोकळे निवांत पहा ..! - डॉ. सुनील अहिरराव http://aaskmed2.blogspot.in/2013/07/blog-post_21.html

प्रतिक्रिया द्या
1206 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा