Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

समर्पण

स — सार्थबोध, Mon, 07/22/2013 - 08:17
ओढ लागली दत्ताची वाढे गोडी परमार्थाची मिळे स्फूर्ती साधनेची होई पूर्ती आनंदाची ll १ ll मूर्ती साजिरी मायेची प्रेमळ सावली वात्सल्याची उभी पाठीशी कायमची चिंता वाहे भक्तांची ll २ ll घ्यावी प्रचीती दत्तांची चित्तवृत्ती हो पावनतेची सेवा करिता चरणांची मिळे अनुभूती चैतन्याची ll ३ ll दत्तनाम घेता वाची स्वानुभव अष्टांग रोमांची राख होतसे दु:खांची हि किमया दत्तकृपेची ll ४ ll काय चिंता भविष्याची भीती कायसी अशाश्वताची मनी भावना समर्पणाची फिटेल चिंता नि:शंकची ll ५ ll श्री गुरु चरणरज, © www.saarthbodh.com

प्रतिक्रिया द्या
2835 वाचन

💬 प्रतिसाद (4)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 07/22/2013 - 08:22 नवीन
|| श्री गुरुदेव दत्त || __/\__
  • Log in or register to post comments
स
सार्थबोध Tue, 07/23/2013 - 05:43 नवीन
धन्यवाद मिसळलेला काव्यप्रेमी आपण माझे भजन वाचल्याबद्दल आणि आपल्या प्रतिक्रियेबद्दल मी आभारी आहे -सार्थबोध
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Tue, 07/23/2013 - 07:58 नवीन
भजन आवडले. Image removed. दत्तांविषयी गूगलताना हैहेय साम्राज्य, कार्तिवीर्यार्जुन, आणि त्याचा परशुरामाने केलेला वध, वगैरे प्रतिमा मिळतात. दत्ताविषयीच्या पोथी-पुराणातून याविषयी काय माहिती मिळते, हे वाचण्यास आवडेल. Image removed. Image removed. Image removed. डावीकडील चित्रः राजस्थान १९ वे शतक,(ब्रिटिश म्यूझियम, लंडन) मधले चित्रः इ.स १८०० (बहुधा माळवा शैली) ब्रिटिश म्यूझियम, लंडन. उजवीकडील चित्रः 'कंपनी' शैली, १९ वे शतक.
  • Log in or register to post comments
स
सार्थबोध Tue, 07/23/2013 - 10:10 नवीन
धन्यवाद चित्रगुप्त , मला ही मुद्देसूद माहिती मिळाल्यास नक्कीच पोचती करेन…
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा