Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अनेक ज्योती पेटवणारी, एक पणती मालवली होती

स — सार्थबोध, Wed, 07/24/2013 - 08:19
अनेक ज्योती पेटवणारी, एक पणती मालवली होती छोट्याश्या अंधाऱ्या खोलीत, काही कुरबुर चालू होती काळ्या अंधारात दुर्बुद्धीने, विवेकावर मात केली होती ll १ ll कापसावाणी मऊ पाऊले, तिथेच बांधून घातली होती हातांची ती कोमल पर्णे, बेडीमध्ये अडकवली होती ll २ ll चंद्रावाणी नितळ चेहरा, सशावाणी पिटुकले डोळे अंधश्रधेच्या विखारी बुरख्याने, मिटून झाले भळभळलेले ll ३ ll काहीच घडले नव्हते, काही अस्तित्वातच आले नव्हते एका गोजिऱ्या निष्पाप जीवावर,काळे सावट घेरले होते ll ४ ll कुणाची तरी गाढवी बुद्धी,गैरसमजाचे ओझे वाहत होती मायेची भक्कम गोधडीच, उबेऐवजी चटके देत होती ll ५ ll सरस्वतीच्या विणेची तार, छेडण्या आधीच तुटली होती पाप करण्याची बुद्धी द्यायला, देवाला इतकी का घाई होती? ll ६ ll प्रत्येक जीवाला भोग असतात, याची मला माहिती होती पण इतक्या कोवळ्या जीवाला?. मला उत्तरे मिळत नव्हती? ll ७ ll कोणाचा "नाच रे मोराचा" नाच, पिसाप्रमाणे झडणार होता छोटीशी टिकली; केसांचा बो, बांधायचा राहणार होता ll ८ ll बहिण; कोणाची भावी अर्धांगिनी, व्हायचीच राहिली होती कुणाच्या तरी जनावरी मेंदूत, हि क्रूर कल्पना आली होती ll ९ ll माणसातील जनावराने एक, स्त्री भ्रूण हत्या केली होती कुणीतरी उमलण्याआधीच एक, गोंडस कळी खुडली होती ll १० ll विज्ञानाने इतकी प्रगती का केली? याची मला चीड होती देवाच्या डोळाल्याही आज वाटे, दाट अश्रूंची झालर होती ll ११ ll कोणाची ती बिनडोक बुद्धी, वंशाचा दिवा हुडकत होती पण अनेक ज्योती पेटवणारी, एक पणती मालवली होती ll १२ ll - सार्थबोध

प्रतिक्रिया द्या
1096 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा