Skip to main content

... मी कुठे नाही म्हणालो

लेखक ऋषिकेश यांनी रविवार, 13/07/2008 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
शैलेश कुलकर्णी याची ..मी कुठे काही म्हणालो ? ही दर्जेदार गझल वाचून सद्य राजकीय परिस्थितीवर काही ओळी सुचल्या.. त्या कोण म्हणतंय हे ओळखु येईल अशी आशा आहे ;) त्याच जागा , त्याच चाली , मी कुठे नाही म्हणालो ? तोच सौदा, ती खुशाली , मी कुठे नाही म्हणालो ? धावते मग सोनिया माझ्यापुढे , टाकीत धापा , सांगते व्हा सरकारी, मी कुठे नाही म्हणालो ? मजवरी होत्या परजल्या पार्टित तलवारी, जरी तू लाज विसरू, गिळू थोडी, मी कुठे नाही म्हणालो ? लाल चीनचे कवच होते, ते भांडले काही करोनी वाचवणार माझे मवाली , मी कुठे नाही म्हणालो ? "आपुली ही प्रीत ,म्हणशी, अणूकराराचेच नाते", डाव्यांस तोडू, मोडू खोडी , मी कुठे नाही म्हणालो ? -ऋषिकेश
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3963
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

एकदम मस्त कविता! म.टा. अथवा सकाळ ला पाठवून पहा. लोकसत्तेत पाठवल्यास मात्र केतकर (सोनीयापुढे) म्हणतील "मी इथे (या कवितेस) नाही म्हणालो!"

शब्दांत खूपच सुधारणा करता येईल. दहा पैकी सहा गुण. - (गुणकारी) सर्किट

प्राजु, तात्या, विकास, सहजराव आणि गुणकारी सर्किट ;) प्रतिसादाबद्दल अनेक आभार! :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

तिच मान्स आन त्योच तमाशा , मी कव्हा नाई म्हन्ल तिच बिअर आन त्योच बार, मी कव्हा नाई म्हन्ल हासत हासत जगायला , मी कव्हा नाई म्हन्ल तुपल्याशी नात जोडायला, मी कव्हा नाई म्हन्ल प्रकाश घाटपांडे