Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तान्हुला

B — Bhagwanta Wayal, गुरुवार, 07/25/2013 - 12:56
चिमुकला तान्हा ठेऊन घरी आई त्याची जाते कामावरी असते गरज आणिक मजबुरी करते मग ती लोभाची चाकरी कोणी ठेविती त्याच्यासाठी दाई परी आईची माया कोण देई जीवापाड सांभाळ करू पाही तरी आईची सर येणार नाही पूर्ण वेळ ऑफिसात जातो घरी येण्यास रोज ऊशिर होतो वाट बघून बाळ झोपी जातो झोपेतच तो आई आई म्हणतो बाळ वाढले पाळ्णा घरात आईबाबांच्या आठणी ऊरात आसवांचा पुर लोट्ला जोरात रडे तेंव्हा तो भावनेच्या भरात आई मित्रांना शाळेत घेऊन जाती बघुन त्याच्या डोळ्यांत आश्रु येती आई वडिल आणिक नाती-गोती पैशापुढे सर्वच विसरुन जाती कोणी जाणा हो त्यांच्या भावनेला नका छळू त्या कोवळ्या मनाला भुकेले ते मातेच्या वात्सल्याला द्यावे प्रेम आपुल्या तान्हुल्याला ..................बी.डी.वायळ

प्रतिक्रिया द्या
2107 वाचन

💬 प्रतिसाद (10)
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 07/25/2013 - 13:04 नवीन
पहिल्या कडव्यातील 'गरज आणि मजबुरीच्या' स्वतःच्याच भावनेला कवीने शेवटच्या कडव्यांमधून छेद देत, आई-वडीलच स्वतःच्या मुलाचा 'छळ' करीत आहेत असा विचार मांडत, त्यांच्या 'गरज आणि मजबुरी' ह्या भावनेला स्वार्थाची झालर लावली आहे. कविता सुमार आहे. ओढून ताणून 'लेडिज ऑड्यन्सला' रडवायला लिहील्यासारखी वाटते आहे.
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal Fri, 07/26/2013 - 08:15 नवीन
नसता गरज अथ्वा मजबुरी । असे पाहिजे होते क? दुसरे म्हणजे कुणाला रडवण्यासाठी नाही लिहिली तर आज खरी वस्तुस्थितीच अशि आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Fri, 07/26/2013 - 09:09 नवीन
'नसता गरज अथवा मजबुरी' असे तरी कसे म्हणणार? कारण, आजकालच्या वाढत्या महागाईच्या काळात, 'गरज आणि मजबुरी' ही वस्तुस्थिती आहे. ''लेडिज ऑड्यन्सला' रडवायला...' हे पुलंच्या 'रावसाहेब' ह्या कथेतील वाक्य आहे. गमतीखातीर मी वापरले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhagwanta Wayal
B
Bhagwanta Wayal Fri, 07/26/2013 - 08:16 नवीन
नसता गरज अथ्वा मजबुरी । असे पाहिजे होते क? दुसरे म्हणजे कुणाला रडवण्यासाठी नाही लिहिली तर आज खरी वस्तुस्थितीच अशि आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
B
Bhagwanta Wayal Fri, 07/26/2013 - 08:17 नवीन
नसता गरज अथ्वा मजबुरी । असे पाहिजे होते क? दुसरे म्हणजे कुणाला रडवण्यासाठी नाही लिहिली तर आज खरी वस्तुस्थितीच अशि आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
अ
अभ्या.. गुरुवार, 07/25/2013 - 13:27 नवीन
काय राव तुम्ही. दीपीकेचा जमाना ग्येला म्हणता आणि असल्या अलका कुबलच्या कविता लिव्हता. :( फक्त कन्सीस्टन्सी पायजे बघा.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 07/27/2013 - 20:34 नवीन
चिमुकला आशा ठेऊन उरी सोडली तळायला एकच पुरी अशीच एका कविची मजबुरी अठवण देते कट्यावरी...कट्यावरी =)) -------- कॉलिंग वल्ली...! (अँड लिल्या ऑल सो =)) ) किति तळयची झाली घाई कोणिच ना कढई देई पीठ मळतांना फाटली बाही बायकू मागून हसली..ह्ही..ह्ही..ह्ही..ह्ही!!! =)) ====================== ऊं.....म्ब....ऊंम्ब....! अता "अजून" होत नै! =)) मी दमलो...., :p अगोबा या हो ,अता तुंम्ही .... =)) ================================================ भगवंता---रागावू नकोस रे........! ही चेष्टा आहे सारी! =))
  • Log in or register to post comments
ल
लीलाधर Sun, 07/28/2013 - 05:24 नवीन
तुम्ही घ्या तुमच्या मुखी त्याने तुम्हीही सुखी आम्हीही सुखी :)) :-P :-D
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 07/28/2013 - 15:47 नवीन
अगं अगं लिली... तू परत शी केली...! :P =)) कागद आणा रेssss...!!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लीलाधर
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 07/28/2013 - 16:09 नवीन
लिहित राहा. पुले्शु. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा