Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काही अठवणी...!

अ — अत्रुप्त आत्मा, Fri, 07/26/2013 - 18:47
काही अठवणी...उन्हातल्या काही अठवणी...पावसातल्या काही नुसत्या...तालातल्या काही गुलाबी...गालातल्या काही आनंदी...सुखाच्या काही त्रासिक...दु:खाच्या काही केवळ..जनातल्या कित्येकांच्या..मनातल्या! काही..हसर्‍या मुलांच्या काही..गळल्या फुलांच्या देठांनाही सोडून गेल्या.. उमलणार्‍या कळ्यांच्या! काही माझ्या गावाच्या काहि..तर,नुसत्या नावाच्या काही...दूरं देशांच्या तळहातांवरिल..रेशांच्या! काही..मंद वासांच्या काही..धूंद श्वासांच्या तिच्या माझ्या मिठितल्या कूंद मोहक स्पर्शांच्या!!! बेबंदिच्या अठवणी काही.. मुक्त मोकळ्या वाटांच्या फुलांनिही बहरून यावे अश्या गोजिर्‍या क्षणांच्या अठवणींच्या प्रदेशा बा घ्यावा अमुचा सलाम मुक्त मोकळी श्वसने अमुची... एरवी फक्त गुलाम...! ============================== https://fbcdn-sphotos-e-a.akamaihd.net/hphotos-ak-ash4/1013210_488468174572807_1569204451_n.jpg ==============================

प्रतिक्रिया द्या
4418 वाचन

💬 प्रतिसाद (20)
प
प्रचेतस Fri, 07/26/2013 - 19:11 नवीन
वाह बुवा. सुंदर आठवणी. शेवटची दोन कड़वी बेहद्द आवडली.
  • Log in or register to post comments
म
मोदक Fri, 07/26/2013 - 19:50 नवीन
बुवा - एक सुधारणा... काही..मंद वासांच्या काही..धूंद श्वासांच्या तिच्या माझ्या मिठितल्या कूंद मोहक स्पर्शांच्या!!! काही..मंद वासांच्या काही.. बेधुंद श्वासांच्या तिच्या माझ्या मिठितल्या धुंद मोहक स्पर्शांच्या!!!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 07/26/2013 - 20:10 नवीन
तू म्हणतोस ते बरोबर,पण... अगदी सिरियसली सांगतो... आपापल्या वयातला फरक पहाता... तुझा अँगल तुझ्यासाठी,आणी,माझा अँगल माझ्यासाठी ठीक आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Fri, 07/26/2013 - 20:34 नवीन
तुम्ही शिनीयर शिटीझन आहात हे (तुम्हीच म्हटलेले) मान्य करूनही.. ;-) कूंद मोहक स्पर्शांच्या माझा आक्षेप कुंद या शब्दावर आहे. बाकी भावना पाहता हा शब्द अस्थानी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 07/26/2013 - 20:56 नवीन
@(तुम्हीच म्हटलेले) >>> म्हणजे नै का? :p @माझा आक्षेप कुंद या शब्दावर आहे. >>> असू द्या!!! Image removed. @बाकी भावना पाहता हा शब्द अस्थानी आहे.>>> ती भावना तुंम्हाला (तुमच्या सध्या असलेल्या वयात!) तशी दिसते आहे! म्हणून शब्द "अस्थानी" वाटतोय! अता माझं पश्टिकरण बगा--- तिच्या माझ्या मिठितल्या कूंद मोहक स्पर्शांच्या!!!>>>असा स्पर्श जेंव्हा वरवरचा वाटत असतो तेंव्हा तो सुखावणारी धुंदी देतो,पण जेंव्हा या स्पर्शातली खरी खोल ओढ कळते,तेंव्हा तो स्पर्श शरिरा इतकाच मनाच्या गाभ्याशी जाऊन भिडतो,अगदी खोल उतरतो...मुरतोही...म्हणूनच तो थंडीत दाट धुकं पडलेल्या वातावरणासारखा,उबदार/समजदार...म्हणजेच कूं....द भासतो! ... म्हणून मी वयातला(माफक असला,तरी महत्वाचा असा... Image removed. ) फरक अधीच सांगितला होता...! त्यामुळे आमचा शब्द अस्थानी नसून बरोब्बर "अ"स्थानीच पडलेला आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ध
धमाल मुलगा Fri, 07/26/2013 - 21:34 नवीन
च्यायला! कुंद वातावरण थंडीत दाट धुकं पडल्यानंतरचं नसतंय. पाऊस पडणार,पडणार वाटतं पण पडत नाही तेव्हाचं दमटसं, ओलसरसं दाटून आलेलं वातावरण असतं त्ये कुंद वातावरण म्हणतात (असं मला वाटतं. ) - धमु खोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 07/26/2013 - 21:44 नवीन
राजाधिराज...धमुराज..आपलेच बरोबर आहे... :) आमचा प्रतिक्रीया ल्याह्याच्या जोसात रूर्‍तु चुकलाच! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
म
मोदक Fri, 07/26/2013 - 21:50 नवीन
आन्ना..गपा आन्ना गपा.. :-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
च
चौकटराजा Sat, 07/27/2013 - 07:15 नवीन
धनराव , तुमच्याकडं कान टोचायचा चिमटा हाय काय ? @ आअ कवितेचा फॉर्म व कन्टेन्ट दोन्ही आवडले. बुवा बेडशाच्या लेंण्यांपेक्षा गूढ आहात आपण ! कुठं कपाळावरील टिळ्याचा विचार तर कोठे गाल्यावरल्या तिळाचा विचार ! व्वा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
स
स्पा Sat, 07/27/2013 - 08:00 नवीन
कुंद , शेवाळलेल्या वातावरणात .. धुकट वाटेवरून .. ओल्या रानातून ती अचानक समोर दिसते ... आकाशातून थेंब थेंब हलकेच खाली येत असतात. निळा काळसर उजेड आस्ते आस्ते कमी होत असतो ..मधूनच वीज आकाशात घुमत असते आणि रानातल्या पडळी समोरच्या गंजलेल्या फाटकात ती उभी असते, नुकताच कोसळू लागलेला पाउस अंगावर घेत ... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
प
प्रचेतस Sat, 07/27/2013 - 08:04 नवीन
बाकी शेवाळलेले, धुकट वातावरण जेव्हा असते तेव्हा विजा चमकत नाहीत असा अनुभव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
स्पा Sat, 07/27/2013 - 08:10 नवीन
असा अनुभव आहे.
तुमच्या आणि आमच्या वयातला फरक पाहता , दोघांना वेगवेगळा नुभव येणे शक्य आहे -- अतृप्त स्पा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Sat, 07/27/2013 - 08:14 नवीन
हा अनुभव सार्वत्रिक असतो. एकदा अनुभवाची बेशर्त स्वीकृती करून तर पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
प
प्रभाकर पेठकर Fri, 07/26/2013 - 21:45 नवीन
माननिय कविवर्य सुरेश भट ह्यांची 'क्षण' ही कविता आठवली.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Fri, 07/26/2013 - 22:14 नवीन
वाह!! एकदम अप्रतिम. बुवांच्या खास ठेवणीतले शब्द.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 07/27/2013 - 07:37 नवीन
हा बुवा भलताच अत्रूप्त दिसतोय, आठवणीतुन बाहेरच यायला मागत नाही. बुवा श्रावण सुरु होतोय, लवकर लायनीवर या, नाहीतर मम आत्मन : श्रुतिस्मृति पुराणोक्त, फलप्राप्त्यर्थं श्रीपरमेश्वर प्रीत्यर्थ्यं अशी सुरुवात करण्या ऐवजी काही अठवणी...उन्हातल्या काही अठवणी...पावसातल्या काही नुसत्या...तालातल्या काही गुलाबी...गालातल्या अशी झाली तर यजमानांची पंचाईत होईल. बाकी कविता बेहद्द आवडली
  • Log in or register to post comments
स
स्पा Sat, 07/27/2013 - 07:54 नवीन
वाह जबराट रोम्यांटिक कविता हाय ;) अवांतर : बाकी ज्यात त्यात चुका काढून , उगाच किडे करणाऱ्या मोदक रावांचा जाहीर निषेध . वयानुसार वागा मोदक राव ;)
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Sat, 07/27/2013 - 09:29 नवीन
वयानुसार वागा मोदक राव>> कोणाच्या वयानुसार??? :( कविता छानच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
म
मोदक Sat, 07/27/2013 - 11:11 नवीन
कविता छानच >> कोण कविता..?? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 07/27/2013 - 09:59 नवीन
सुंदर... बस इतकेच !!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा