Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वाटते मजला भिती - (गझल)

व — विदेश, Sat, 07/27/2013 - 11:42
जीवनाची सांगता ही वाटते मजला भिती ऐकण्याला कोणि नाही वाटते मजला भिती सागरावर का उसळती जीवघेणी वादळे हा किनारा एकटा ही वाटते मजला भिती ढोलताशा ऐकुनी मज खूप होतो त्रास हा देवळातिल शांततेची वाटते मजला भिती वाटले घ्यावा विसावा टेकुनी खांद्यावरी वाट ती अडवील कोणी वाटते मजला भिती माजलो पैशात लोळत चेहरा सुजला किती ओळखेना आरसाही वाटते मजला भिती जागणे अन् झोपणे का फरक नाही राहिला जीवनाची ओढ नुरली वाटते मजला भिती .

प्रतिक्रिया द्या
1233 वाचन

💬 प्रतिसाद (3)
च
चाणक्य Sat, 07/27/2013 - 12:06 नवीन
ठीक आहे पण बात जम्या नही.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 07/27/2013 - 14:31 नवीन
ठीक...
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal Wed, 08/07/2013 - 06:46 नवीन
गझल वाचली वाचली, आवडली मज फार। पतिक्रिया देण्यास का वाटावी मजला भिती॥
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा