Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मरण झाले स्वस्त

B — Bhagwanta Wayal, Sun, 08/04/2013 - 07:47
खरे सांगतो मी देवा तेला एक गोष्ट जीवन झाले महाग आणि मरण झाले स्वस्त ॥ धॄ ॥ महागाईचा आलेख किती वर गेला कसे जगावे देवा सांग तुच मला गरीबाच्या दुखाला नाही कुठे अंत..॥१॥ कर्जापाई शेतकरी हवालदिल झाले कितितरी आत्म्हत्या करुनिया मेले देऊनिया जातात अस्वासने फ्क्त...॥२॥ बाँब स्फोट घातपात येथे घडतात निष्पाप लोक त्यात बळी पडतात काही आपल्या घरामध्ये रहातात मस्त...॥३॥ दोन गाड्यांमध्ये जेंव्हा टक्कर होते बघताबघता बस कधी दरीमध्ये जाते पिऊनिया चालवी गाडी नाही त्याल धास्त..॥४॥ पुर आणि भुकंपाने होई नुक्सान रिलीफ फंडामध्ये जमा करतात धन टाळुवरच लोणी खाऊन करतात फस्त...॥५॥ ................बी.डी.वायळ

प्रतिक्रिया द्या
1491 वाचन

💬 प्रतिसाद (3)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 08/04/2013 - 08:46 नवीन
गरीबाचं कोणी नसतं ....आणि देवाला, गरिबांची अजिबात दया येत नाही. अशा आशयाची कविता पोहचली. पूर, गाड्यांच्या टकरी, रिलिफ फंडाचा होणारा चुरा. वगैरे हे सर्वही खरं आहे. पण, हे कवितेतून येतांना त्यात जरा अजून धारदारपणा येऊ द्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal Sun, 08/04/2013 - 17:18 नवीन
धन्यवाद डोक्टरसाहेब, प्रतिक्रियेबद्दल आभार..!
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Sun, 08/04/2013 - 19:03 नवीन
टाळुवरच लोणी खाऊन करतात फस्त...>>>>>>>>>आणि अशा माणसांना ते पचतेही हे नवल. अशी बरीच माणसे पाहण्यात आली आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा