Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

या साध्या घरात माझ्या

स — सार्थबोध, Mon, 08/05/2013 - 06:26
या घरात माझ्या, काही न आलिशान साधेच खोपटाचे, सारवलेले छान ll १ ll नाही नक्षीदार, कौलांनी कसेबसे झाकलेले निजताना नजरेत त्यातून, चांदणे वेचलेले ll २ ll नाहीत भिंती भक्कम, घुमणे वाऱ्याचे चाले निवारा नसता किडा-मुंगी, त्यास आपले समजलेले ll ३ ll पावसाळ्यात बरसुनी तो, घरास नाहवून जातो उन्हाळ्यात तोही घरास, असा तावून सुलाखून जातो ll ४ ll बैठेच स्वयंपाक चाले, नाही सोयी नव्या पूर्ण चुलीवर भाजलेले, आगळेच अन्न ब्रह्मपूर्ण ll ५ ll नाहीत विजेऱ्या दिवे, रात्रीस किर्र अंधार असतो देवाजवळ मिणमिणणारा, हर कोपरा उजाळत असतो ll ६ ll नाही फार बगीचा, नाही फार वनश्री ती मोजकीच फुले अन्, तुळस वृंदावनी ती ll ७ ll इतरांसारखे नसेल टुमदार, मला फिकीर ना त्याची आसरा निवारा घ्याया, ती माझी वास्तू हक्काची ll ८ ll या साध्या घरात माझ्या, काहीच ना चीजवस्तू समाधान इतुकेच कि, देव म्हणे तथास्तु ll ९ ll - सार्थबोध

प्रतिक्रिया द्या
2353 वाचन

💬 प्रतिसाद (8)
म
मदनबाण Mon, 08/05/2013 - 06:32 नवीन
सुंदर ! :) नाही नक्षीदार, कौलांनी कसेबसे झाकलेले निजताना नजरेत त्यातून, चांदणे वेचलेले ll २ ll केवळ अप्रतिम ! :)
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Mon, 08/12/2013 - 16:06 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
क
किसन शिंदे Mon, 08/05/2013 - 06:41 नवीन
वाह!! प्रत्येक कडवं सुंदर आहे. प्रत्येकाच्या मनात स्वत:चं असं एखाद घर असावं अशी सुप्त इच्छा असते.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 08/05/2013 - 07:26 नवीन
सुख "पाहिजे आहे ते मिळण्यात" नसून "मिळाले आहे ते पाहिजे असण्यात" आहे !
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal Tue, 08/06/2013 - 12:32 नवीन
इतरांसारखे नसेल टुमदार, मला फिकीर ना त्याची आसरा निवारा घ्याया, ती माझी वास्तू हक्काची ll ८ खुपच छान..!
  • Log in or register to post comments
S
sanjivanik१ Tue, 08/06/2013 - 17:42 नवीन
अप्रतिम शब्द रचना , त्याही पेक्षा अप्रतिम अर्थ
  • Log in or register to post comments
व
वेणू Mon, 08/12/2013 - 05:53 नवीन
किती खास लिहीलंय...
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 08/12/2013 - 15:58 नवीन
साध्या शब्दात साध्या घराचं वर्णन!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा