Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक चिऊ, गोजिरवाणी..

व — वेणू, Sat, 08/10/2013 - 13:29
मी तुळशीपाशी, लावता पणती एक, अंगणी शेजीची येते चिमणी सुरेख कसे गाल गुलाबी, कानी झुलती डूल हातात बाहुली आणि जाईचे फूल... अन् म्हणते करूनी गाल गोबरे मजला, "पाहूनी मला का हसूच फुटते तुजला?" तिज जवळी ओढूनी, सांगू पाहे मग मी, "अगं बाळा, गोड तू सुंदर चपळ गं हरिणी, अशी गोडच दिसशी, हळूच हसता तू गं, तुज पाहून बाळा, हसू फुटे मजला गं" ना कळते तिजला, परि हलविते मान, बाहुलीस धरुनी तिथेच मांडी ठाण, ही तिला भरविते काय पहा हे ध्यान, म्हणे ऐक बाहूले, "करू तयारी छान!" बाहुलीस सजविता, पाहे शांत मी बसूनी, तिचे केस आवरते, फूल जाई गुंफूनी.. मग पावडर खोटे, तिट टिळाही देते ह्रूदयास धरूनी "राणी माझी" म्हणते म्हणे ऐक बाहुले, सुंदर तू ही दिसशी जर हासता कोणी, तू ही खुदकन हसशी... मी पाहता कौतुके, हळूच मज म्हणते ती "कसे सगळेच हसले, बघ ना जरा हासता मी" ती भुरकन जाते, आली तशीच उडूनी अन् साठवते मी , आत-आत ती चिमणी, मग मलाही वाटे, घ्यावे शिकून जरासे हे तंत्र खुशीचे, आनंदाची गाणी... अशी रोजच येते, चिऊ ही चिवचिवणारी अन् गळ्यात पडते, "हसते का गं" म्हणूनी.... -वेणू (बागेश्री)

प्रतिक्रिया द्या
1789 वाचन

💬 प्रतिसाद (9)
न
निवेदिता-ताई Sat, 08/10/2013 - 14:30 नवीन
:)
  • Log in or register to post comments
स
सुधीर Sat, 08/10/2013 - 16:37 नवीन
सुंदर आहे कविता!
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 08/10/2013 - 21:06 नवीन
चिऊ आवडली! याच वृत्तातली "लाडकी बाहुली" काहीशी करूण आहे. पण ही बाहुली मस्त आहे!
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Sun, 08/11/2013 - 10:08 नवीन
किती ग गोड पोर! मस्त! बा द वे तुळशीचा दिवा ऐकुन नवल वाटलं.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 08/11/2013 - 16:36 नवीन
या कवितेला चित्र काढायला दिनानाथ दलालच हवे होते. सुरेख, अप्रतिम.
  • Log in or register to post comments
व
वेणू Mon, 08/12/2013 - 05:32 नवीन
धन्यवाद दोस्तहो... तुळशीचा दिवा पाहून आश्चर्य का गो? पैसा, अगदी बरोबर... त्या कवितेच्या चालीवर ही सदर रचना बसतेही चांगली :)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 08/12/2013 - 05:37 नवीन
हृद्य.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 08/13/2013 - 10:59 नवीन
:)
  • Log in or register to post comments
व
वेणू Wed, 08/14/2013 - 09:58 नवीन
:)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा