Welcome to misalpav.com
लेखक: सार्थबोध | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

लेख छान आहे. जवळच्या नात्यातील एकाचा घटस्फोट झाल्यामुळे तुम्ही वर दिलेल्या पायर्‍या, टप्पे लांबुन पाहीले, ऐकले आहेत. इगो प्रोब्लेम, नेहमी मीच का नमतं घ्यायचे हे तर मोठे कारण वाटतं घटस्फोटाचे.

इगो प्रोब्लेम, नेहमी मीच का नमतं घ्यायचे हे तर मोठे कारण वाटतं घटस्फोटाचे.
नेहमीच नमते घेऊन, अनेक वर्षांनंतर, ह्या नमते घेण्याचाही उबग आला आणि जर तिने किंवा त्याने म्हंटले की 'नेहमी मीच का नमतं घ्यायचं?' तर तो इगो प्रॉब्लेम असू शकतो का? पतीचे किंवा पत्नीचे विवाहबाह्य संबंध असणे हे जसे एक कारण असू शकते तसेच 'पतीचे किंवा पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत असा (नुसता) संशय असणे' हेही घटस्फोटाचे कारण असू शकते. प्रेम विवाहातही, जोडीदार निवडण्यात आपली चूक झाली हे लक्षात आल्यावर आणि सहजीवन अशक्य असताना, मुलांचा विचार करून उर्वरित आयुष्य घटस्फोट न घेता एकत्र व्यतित करणे ही गोष्टही नवरा, बायको आणि मुले ह्या सर्वांनाच क्लेशकारक असते. लग्नाच्या वयात शारीरिक गरज/मागणी पराकोटीची असते. वैवाहीक जिवनात जसजशी ही गरज भागविली जाते त्याची तीव्रता कमी होत जाते. (लॉ ऑफ मार्जिनल युटीलिटी?) पण मध्यंतरीच्या काळात भावनिक संबंध दृढ होत गेलेले असतात (तसे ते व्हावेत) आणि 'प्रेम' शब्दाचा नवा अर्थ उमगतो. तो एकदा उमगला की लहानसहान वाद/भांडणं जास्त गंभीर होत नाहीत. त्यासाठी दोघांचीही वैचारिक परिपक्वता अत्यंत आवश्यक ठरते. ती सर्वांना येतेच असे नाही जिथे येत नाही तिथे समस्या गंभीर होत जातात. आपण दूरुनच न्यायाधीशाची भूमिका बजावतो आणि 'ह्याचीच चूक' किंवा 'तिचीच चूक' असे लेबल लावून मोकळे होतो. पण प्रत्यक्षात जे स्वतः ह्या सर्वातून जात असतात त्यांनाच ठाऊक असते त्यांची समस्या आणि त्यावर उपाय. मुल किंवा मुले नसतील तर घडस्फोट हा सर्वोत्तम उपाय आहे. पण ह्या जगात तुम्ही नविन जीव जन्माला घातला असेल तर 'घटस्फोट' हा सर्वात शेवटचा उपाय असावा. आणि शक्यतो, कृतीच काय पण भांडणात शब्दोच्चारही टाळावा.

इगो प्रोब्लेम, नेहमी मीच का नमतं घ्यायचे हे तर मोठे कारण वाटतं घटस्फोटाचे. सहमत..... याचबरोबर, जोडण्यापेक्षा तोडण्याची पर्याय जास्त जवळचा आणी सोपा वाटायला लागलाय बहूतेक...

घटस्फोट होण्यामागे गैरसमज, कम्युनिकेशचा अभाव एवढीच कारणे असतील असे नाही. दोघांपैकी एकाने विवाहबाह्य संबंध ठेवणे, हुंड्यासाठी छळ, फसवणूक अशीही बरीच कारणे असतात. बरे सावरत बसण्याएवढा वेळही कोणापाशी नसतो. कधी कधी तत्त्वांशी तडजोड करणे शक्य नसते. आता ही परिस्थिती आहे खरी. मग कोणीतरी अशा घटस्फोटितांना जर परत नवा मांडायची इच्छा असेल आणि तशी संधी मिळवून देत असेल तर चांगलंच म्हणायचं! परिस्थिती आणि संस्कृती यांचा घटस्फोट आहे असे मला वाटत नाही. कारण संस्कृती प्रवाही असते, तशीच परिस्थितीही बदलत असते. १०० वर्षांपूर्वी विधवा विवाह कोणी करू शकले नसते. घटस्फोट तर कल्पनेच्या बाहेरची गोष्ट होती, पण आज या दोन्ही सर्वसाधारण गोष्टी आहेत. आता परिस्थिती आणि संस्कृती या दोन्हीही गोष्टी झपाट्याने बदलत आहेत. बदलत्या परिस्थितीत काय योग्य हे त्या त्या वेळी ठरते. त्याला एकच एक नियम लावता येणार नाही. लेख मुद्देसूद आहे. तुमची शैली चांगली आहे. आणखी चर्चा वाचायला आवडेल.

लेख कळकळीने, मनापासून लिहिला आहे असं वाटतं आहे/जाणवतं आहे. लग्न हे एकमेकांसोबत जीवन सुखाने जगण्यासाठीच केलं असतं. त्यामुळे घटस्फोटाचा निर्णय हा कोणासाठीही फारसा सोपा वा आनंददायी असावा असं वाटतं नाही. घटस्फोटाची वेळ न आलेलीच चांगली पण, 'घटस्फोट' नेहमीच वाईट असतो का. किंवा 'घटस्फोट घेणे' हा नेहमीच चुकीचा निर्णय असतो का? याबद्दलची लेखकाची/वाचकांची मतं वाचायला आवडतील.

अगदीच जमत नसेल तर घटस्फोट घेण कधीही चांगलच नाही का? अर्थात हे जितक दिसतय तेव्हढ वरवरच नसावं. नवरा बायको हा नातेसंबंध फकत बोलण्यावर संभाषणावर अवलंबुन नसतो. त्याला बरेच पदर असतात. भावनिक आधार हा तर अतिशय महत्वाचा. लग्न केलं जात ते सामाजिक मान्यतेनुसार शारीक गरजांसाठी. ती ही तेव्हढीच महत्वाची. सततचा सहवास...नकोसा वाटत असेल, समजा दारुचं व्यसन..किंवा सारख शॉपिंग बाहेर खाण्याचा हट्ट...दुसर्‍याकडे पाहुन स्वतःकडे हवच अशी मानसिक ईर्षा..घरच्या नातेवाईकांबद्दल अति तिरस्कार वा त्यांचा अति हस्तक्षेप...अगदी रोज घरी जाव की नको..आता काय वाढलय पुढ्यात अशी अवस्था येते, तेंव्हा घटस्फोट्च योग्य नाही का? पुर्वी माणसं दुसर लग्न करीत...स्त्रीया परतुन माहेरी आलेल्या परत जात नसत...अथवा ..टाकुन दिलेली..परित्यक्ता..हे सगळ असायचच. आता जरा झाकुन घालण्याऐवजी कायद्याने होतय. नव्या आयुष्याची अपेक्षा केली जाते एव्हढच. एकुण काय जे झाकुन, छपवुन असायच ते समाजात वर आलय. अर्थात लेखकाने लिहीलेली आईवडीलांची अवस्था पटण्याजोगी.

घटस्फोट हा मस्त उपाय आहे.पण त्यापेक्षाही मस्त उपाय म्हणजे परिचयोत्तर विवाह करणे .पण पगार, ३ /२ बी एच के. सासरे सासू असणे नसणे असे " हो" म्हणण्याचे निकष मुलीनी ठेवले की मग स्वभाव, आकांक्षा , संवयी ई चा विचार मागे पडतो. परिणामी नंतर भाडणे. खरे तर विवाहजीवन मधेच मोडणे ही अत्यंत क्लेशकारक गोष्ट .ती शत्रूचाही बाबतीत होउन नये असे माझे मत आहे. पण मुलींचा मुलगा शोधण्याचा दृष्टीकोन माझ्या आईच्या पिढीत फार आंधळेपणाचा, माझ्या पिढीत मध्यममार्गी तर आताच्या पिढीत अति ऐहिक आहे.