Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आव्हान

आ — आतिवास, Tue, 08/13/2013 - 06:54
खेळ मांडलेला तेव्हा त्याचे खुळखुळे झाले, ललाटीच्या भग्न रेषा पायतळी ठसे ओले, इथे तिथे व्यर्थ व्यर्थ सारे सारे क्षुद्र झाले, नाही सुटले काहीही त्याने भलतेच केले, खोळ काही काळ पुन्हा मी टाकते गहाण, आता त्याच्या पुण्याईला उरे त्याचेच आव्हान!

प्रतिक्रिया द्या
2552 वाचन

💬 प्रतिसाद (10)
प
पैसा Tue, 08/13/2013 - 12:41 नवीन
अर्थ हाती लागतोय लागतोय असं वाटेपर्यंत परत हातातून निसटतोय. जरा कोडं आहे. बघू सुटतंय का!
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 08/13/2013 - 12:44 नवीन
पैसातैशी शमत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
य
यशोधरा Tue, 08/13/2013 - 12:49 नवीन
पोचली अगदीच. सुरेख लिहिलंय कसं म्हणू? फार टोचणारं लिहिलं आहे आतिवास...
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Wed, 08/14/2013 - 01:41 नवीन
मान्य. टोचतय खर आहे. पण नक्की काय ते समजत नाही आहे. आतिवास ताई जरा उलगडाल का? काल पासुन वाचते आहे, पण शप्पथ काही उलगडेना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
आ
आतिवास Wed, 08/14/2013 - 05:05 नवीन
अपर्णाताई, :-( आपण लिहावं आणि अर्थ वाचकांवर सोडून द्यावा - स्पष्टीकरण (आणि समर्थन) देत बसू नये - असं पथ्य (नियमाला पथ्य हा जरा विचित्र समानार्थी शब्द आहे!) मी सामान्यतः पाळत आले आहे. त्यामुळे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
स
स्पंदना Wed, 08/14/2013 - 05:22 नवीन
र्‍हायल बाई! पण तरीही खोळ काही काळ मी टाकते गहाण चा अर्थ सांगशील?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास
आ
आतिवास Wed, 08/14/2013 - 05:39 नवीन
अर्र! रागावलात वाटतं तुम्ही :-) इथं खोळ हा अर्थ शरीरासाठी वापरला आहे. ('वासांसि जीर्णानि....' वगैरेचा परिणाम!!) ती खोळ गहाण टाकली आहे - म्हणजे तितकी मोलाची आहे, पण गहाण टाकायची वेळ पण आली आहे. ती गहाण ठेवून बदल्यात 'काहीतरी' मिळालेही आहे ... एखादी वस्तू गहाण टाकली की आपली असून आपली उरत नाही - तिचं काय होतं त्यावर आपलं नियंत्रण काही काळ तरी नसतं.. आता 'शरीर गहाण टाकणं' याचा अर्थ कवितेकडे पाहण्याची 'एक' दृष्टी देतो. 'एक' अशासाठी की दुस-याच ओळी केंद्रस्थानी घेतल्या तर कदाचित वेगळा अर्थ लागू शकेलही :-) थांबते. मी माझ्याही नकळत कवितेबद्दल लिहायला लागले की!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
प
पैसा Wed, 08/14/2013 - 06:11 नवीन
मी इथेच अडखळत होते. नक्की कोणता भाग केंद्रस्थानी आहे यावर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास
म
मदनबाण Wed, 08/14/2013 - 11:25 नवीन
छान !
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Wed, 08/14/2013 - 11:52 नवीन
समजून घेतेय....
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा