वेदना
अस्त सूर्याचा पाहुनी
मी किरणांसाठी झुरतो ll १ ll
ती वेळ सुरु परतीची
थवा घरट्यास उडतो ll २ ll
सांजेचा दीप तोही
एकलाच गाभारी जळतो ll ३ ll
दिव्यास सोबत माझी
तो वातीत काजळतो ll ४ ll
भाव दाटला नयनी
अलगद गाली ओघळतो ll ५ ll
जणू सन्यस्त होऊनी
मी ओठी दु:ख थोपवतो ll ६ ll
गोठली वेदना एकांती
मी स्मृतींमागे पळतो ll ७ ll
झाकून दर्दभावना सारी
मी मलाच रे सावरतो ll ८ ll
आरशास पाहता फिरुनी
तो नकळत काही सुचवतो ll ९ ll
वाटे चेहराच मला माझा
काय असा फसवतो ll १० ll
- सार्थबोध
💬 प्रतिसाद
(4)
भ
भावना कल्लोळ
Tue, 08/13/2013 - 10:34
नवीन
छान शब्द रचना, भावली मनाला कविता, काहीसा स्वतःचा अंतरंग दिसला :)
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Tue, 08/13/2013 - 10:43
नवीन
छान !
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 08/13/2013 - 10:49
नवीन
अशी करुन वाचली, अजुनच आवडली.
- Log in or register to post comments
P
psajid
Wed, 08/14/2013 - 08:04
नवीन
आशयघन कविता
- Log in or register to post comments