बालमजूर
आठ तासांच्या चक्रात बाबा
माझं बालपण हरवून गेलं,
अकाली प्रौढत्व दिलंत तुम्ही
माझं खेळायचं राहून गेलं ........!
दारिद्र्याचा बुजवण्या खड्डा
लहान भावाला संगती न्हेलं,
हुशारीची मलाच वाटली लाज
दप्तर फेकून हाती खोरं घेतलं ........!
यशाची माझ्या देऊन हमी
मास्तरांनी हुशारीचं दिलं दाखलं,
म्हणालात तुम्ही त्यानला
“ पोटी माझ्या चार मुलं - ...........
इतक्या मोठ्या दुनियेत मास्तर
माझं पोरगच का अडाणी ऐकलं,
शिकूनच का भाकरी मिळते
किती अडाणी उपाशी मेलं ........?
माझं हातपाय थकलं आता
करील बहिणींच हात पिवळं,
पर अपराधाची बोच मनी
कुस्करलं दारिद्र्यानं बालपण कोवळं ........!”
(मीच म्हणालो, त्यावेळी बाबा कि ........)
“ वाईट नका वाटून घेऊ
बाबा मला शिक्षण बास झालं,
बुद्धीमाधल्या खड्ड्यापेक्षा
पोटामधला डबरा खोलं........!!
पोटामधला डबरा खोलं ........!!
श्री. साजीद यासीन पठाण
💬 प्रतिसाद
(16)
ब
बहुगुणी
Tue, 08/13/2013 - 13:20
नवीन
साजीद भाई,
छान लिहिलंत बालकामगाराचं मनोगत, डोळ्यासमोर उभा राहिला तो मुलगा. ("बुद्धीमधल्या खड्ड्यापेक्षा, पोटामधला डबरा खोल.." हेही आवडलं.)
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 08/13/2013 - 13:25
नवीन
मिपावर स्वागत. अशाच आशयपूर्ण कविता येऊ द्यात!
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Tue, 08/13/2013 - 13:25
नवीन
@बुद्धीमाधल्या खड्ड्यापेक्षा
पोटामधला डबरा खोलं........!!
पोटामधला डबरा खोलं ........!! >>>>>>>>>> 
- Log in or register to post comments
ज
जेपी
Tue, 08/13/2013 - 13:42
नवीन
छान लिहीलय
- Log in or register to post comments
भ
भावना कल्लोळ
Tue, 08/13/2013 - 13:45
नवीन
खूप सुंदर आणि आशय पूर्ण…
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Tue, 08/13/2013 - 18:56
नवीन
आशयपूर्ण
- Log in or register to post comments
ग
गोप्या खंडेतोड
Tue, 08/13/2013 - 13:47
नवीन
खास
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 08/13/2013 - 14:04
नवीन
छान
- Log in or register to post comments
स
सुधीर
Tue, 08/13/2013 - 18:21
नवीन
कविता आवडली.
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Wed, 08/14/2013 - 01:10
नवीन
व्वाह! साजीद भाई!
- Log in or register to post comments
न
निरन्जन वहालेकर
Fri, 08/16/2013 - 13:34
नवीन
वाईट नका वाटून घेऊ
बाबा मला शिक्षण बास झालं,
"बुद्धीमाधल्या खड्ड्यापेक्षा
पोटामधला डबरा खोलं"........!!
पोटामधला डबरा खोलं ........!!"
व्वा! क्या बात है ! ! विदारक सत्य ! ! ! आवडली.
- Log in or register to post comments
स
स्वाती३५११
Sun, 08/18/2013 - 18:20
नवीन
कविता आवडली
वाचुन दृष्य डोळ्यासमोर आले.
- Log in or register to post comments
च
चिगो
Sun, 08/18/2013 - 18:33
नवीन
कविता भिडली मनाला..
- Log in or register to post comments
P
psajid
Mon, 11/11/2013 - 07:45
नवीन
धन्यवाद !
- Log in or register to post comments
P
psajid
Mon, 11/11/2013 - 07:45
नवीन
धन्यवाद !
- Log in or register to post comments
P
psajid
Mon, 11/11/2013 - 07:46
नवीन
धन्यवाद !
- Log in or register to post comments