Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विषय

B — Bhagwanta Wayal, Wed, 08/14/2013 - 16:25
डोळ्यांनी बघीतले दृष्यातले सुख। अंतरी वाढली कामाची भुख। डोळ्यांनी देवाचे रुप बघायचे असते हे मात्र कधी कळ्लेच नाही। आमचे मन...... कधी सत्कर्माकडे वळलेच नाही ॥१॥ हातांनी दिला लोकांना मार। अंतरी वाढली क्रोधाची धार। हातांनी देवाला नमस्कार करायचा असतो हे मात्र कधी कळलेच नाही। आमचे मन...... कधी सत्कर्माकडे वळलेच नाही ॥२॥ मनाचा नाही कळला हा डाव। अंतरी वाढला लोभाचा भाव। मनानेच देवाचे नामस्मरण करायचे असते हे मात्र कधी कळलेच नाही। आमचे मन...... कधी सत्कर्माकडे वळलेच नाही ॥३॥ नाकाने घेतला भलताच वास। अंतरी वाढली लोभाची रास। नाकातुनच जपाअजपा चालू असते हे मात्र कधी कळलेच नाही। आमचे मन...... कधी सत्कर्माकडे वळलेच नाही ॥४॥ बुध्दीकडे नेहमी होते कुविचार। अंतरी वाढला मत्सर फार। बुध्दीने सारासाराचा निवाडा करायचा असतो हे मात्र कधी कळलेच नाही। आमचे मन...... कधी सत्कर्माकडे वळलेच नाही ॥५॥ जिव्हेने केली लोकांची निंदा। अंतरी वाढला दंभाचा धंदा। जिव्हेवरच श्रीशारदा नांदत असते हे मात्र कधी कळलेच नाही। आमचे मन...... कधी सत्कर्माकडे वळलेच नाही ॥६॥ पायांनी मारल्या नको तिथ लाथा। अंतरी वाधले संशय आणि चिंता। चरणंम पवित्रंम वितितंम पुराणंम हे मात्र कधी कळलेच नाही। आमचे मन...... कधी सत्कर्माकडे वळलेच नाही ॥७॥ कानांनी ऐकली स्वतःचीच स्तुती। अंतरी वाढली अहंकाराची मती। कानांनी देवाचे गुणगान ऐकायचे असते हे मात्र कधी कळलेच नाही। आमचे मन...... कधी सत्कर्माकडे वळलेच नाही ॥८॥ श्रीसद्गुरु कृपा झाली जेंव्हा। विषयांच कार्य थांबल तेंव्हा। अंतरी अखंड नामस्मरण करायचे असते हे आता आम्हाला पक्के कळ्ले। आमचे मन..... आता कुठे सत्कर्माकडे वळले ॥९॥

प्रतिक्रिया द्या
784 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा