Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आहे!?

प — पाषाणभेद, Sat, 08/17/2013 - 04:12
आहे!? आहे? आहे? आहे? आहे? साखर आहे? आहे! आहे! आहे! आहे! साखर आहे! आहे? आहे? आहे? आहे? गुळ आहे? आहे! आहे! आहे! आहे! गुळ आहे! आहे? आहे? आहे? आहे? तेल आहे? आहे! आहे! आहे! आहे! तेल आहे! आहे? आहे? आहे? आहे? खोबरे आहे? आहे! आहे! आहे! आहे! खोबरे आहे! (नारळ, साबूदाणा, शेंगदाणे, मोहरी, हळद, मीठ..... फिनाईल, घासणी, झाडू इ. आहे? आहे? आहे?) (नारळ, साबूदाणा, शेंगदाणे, मोहरी, हळद, मीठ..... फिनाईल, घासणी, झाडू इ. आहे! आहे! आहे!) किती मोजू सांगा? किती घ्यायचे आहे? साखर ५ किलो, गुळ अर्धा किलो आहे तेल ३ किलो आहे, तुप पाऊण किलो आहे, मिरची अर्धा किलो आहे नारळ, साबूदाण, शेंगदाणे, मीठ, मोहरी, हळद मागच्याप्रमाणे आहे सामान मोजले, चला लवकर ८४३ रुपये काढा, गिर्‍हाईकांची घाई आहे काय शेठ! इतके पैसे कसे झाले? हा महागाईचा आलेख चढता आहे! मी काय म्हणतो लिहून ठेवा! आत्ता पैसे नाहीत उधारी आहे! रामू सगळा माल आत ठेव! माफ करा, उधारी बंद आहे! - पाभे

प्रतिक्रिया द्या
5238 वाचन

💬 प्रतिसाद (10)
च
चित्रगुप्त Sat, 08/17/2013 - 06:29 नवीन
अगदी वेगळ्या धर्तीची कविता आवडली. असे काही वेगळे वाचायला छान वाटते. ....मीठ, मोहरी, हळद मागच्याप्रमाणे आहे... यातील 'मागच्याप्रमाणे' चा अर्थ समजला नाही.
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal Sat, 08/17/2013 - 13:20 नवीन
मागच्याप्रमाणे म्हणजे, मागच्या महिन्याच्या यादीप्रमाणे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 08/17/2013 - 13:31 नवीन
पुलेशु. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 08/17/2013 - 14:12 नवीन
पाभे, आता तुम्हाला फोन येणारः गुड मॉर्निंग सर, मै आयसीआयसीआय बँक से विनित कुमार बोल रहा हूं. सर आपको क्रेडिट कार्ड के लिये सिलेक्ट किया गया है....वगैरे... वाटल्यास हा व्हिडो बघा (आचरट आहे बरे): http://www.misalpav.com/node/25394#new
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 08/17/2013 - 14:14 नवीन
लिंक चुकली, इथे बघा: http://www.youtube.com/watch?v=ey9usei6ojg
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Sat, 08/17/2013 - 14:45 नवीन
हि कविता वाचल्यावर मला द.मा.मिरासदारांच्या गाणारा मुलुख ह्या कथेची/नाटिकेची आठवण आली. कथेतल्या मुलुखातला राजा सगळ्या प्रजेने सर्व दैनंदिन संभाषणसुध्दा गाण्यातूनच करावे असा हुकूम काढतो. आणि मग धमाल सुरू होते. प्रत्येकजण गाण्यातच बोलू लागतो. त्यात नवराबायकोच्या संवादाची सुरवात काहीशी अशी आहे .. बायको : तेल संपले, तूप संपले, स्वैपाक आता मी करू कशाचा ?...
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 08/19/2013 - 03:36 नवीन
आहे. आहे. आहे. ही भेदक कविता पाषाणाचि'च आहे! :)
  • Log in or register to post comments
न
निरन्जन वहालेकर Wed, 08/21/2013 - 17:06 नवीन
वेगळ्या धर्तीची कविता. आवडली.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 08/24/2013 - 10:41 नवीन
महागाईपुढे बोलती बंद आहे!
  • Log in or register to post comments
भ
भावना कल्लोळ Sat, 08/24/2013 - 12:09 नवीन
आजचे हे भीषण कटू सत्य आहे !!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा