Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ती...

स — सार्थबोध, Mon, 08/19/2013 - 06:36
ऐकले जाहीर येथे, झुंड माणुसकी तुडवणारे वाचले जाहीर येथे, रत्न कन्या नाकारणारे ll १ ll जोडपे कैक नादान, येथे पालकत्वी रंगणारे तो असेल कि ती?, व्यर्थ शंका काढणारे ll २ ll माजले क्रूर बाजारी, गैर कर्मे रुजवणारे विवेक विसरून पालक, वाट आंधळी जोखणारे ll ३ ll अवैध पैसा अमाप, गर्भश्रीमंत मिरवणारे कष्टी भगवंत येथे, पाहून गर्भ चिरणारे ll ४ ll लिखित काही और तरीही, वंशदिवा शोधणारे हातचे टाकून पायी, कळ्या नाजूक तुडविणारे ll ५ ll विझल्या ज्योती किती, काळोख भोवती बोचणारे नवी संज्ञा माय-बापा, जन्म देऊन मारणारे ll ६ ll नका टाकू स्त्री उद्याची, घसे कोरडे बोलणारे हात कानावरी त्यांचे, ठार बहिरे ऐकणारे ll ७ ll - सार्थबोध

प्रतिक्रिया द्या
751 वाचन

💬 प्रतिसाद (1)
द
दत्ता काळे Mon, 08/19/2013 - 07:11 नवीन
विझल्या ज्योती किती, काळोख भोवती बोचणारे नवी संज्ञा माय-बापा, जन्म देऊन मारणारे ll ६ ll .. वा ! छान कल्पना
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा