स्वच्छ कपडे घालुन, मस्त पावडर वगैरे लावुन झोपले की सुखाची झोप लागते हे अगदी शंभर टक्के खरे आहे. मला बहुधा त्यामुळेच सुखी झोपेची देणगी मिळाली असावी. हे झोपताना भांग पाडुन पावडर लावुन झोपण्याच्या सवयीमुळे बर्याच वेळा घरचे हसतात त्याकडे मी दुर्लक्ष करतो हे चांगलेच आहे हे आता जाणवते. :)
छान. लेख आवडला. मला सुगंध (सेंटस्) आवडतात.
मी कॉलेजला असताना परिक्षेचा अभ्यास रात्री आंघोळ करून, स्वच्छ कपडे घालून परत खोलीत छान सुगंधी उदबत्ती लावून ( सुवासाकरता ) करायचो. वातावरणनिर्मिती मस्तं होत असे, पण अभ्यास म्हणावा तितका चांगला झाला नाही. त्याऐवजी अवांतर वाचन फार चांगले झाले.
त्याकाळात माचीवरला बुधा, शेलारखिंड, मिरासदारी, रारंगढांग, पार्टनर, दुनियादारी, ललितचे अंक ह्या पुस्तकांचे वाचन झाले. अजूनही त्या उदबत्ती वास दरवळला पुस्तके वाचण्याच्या आठवणी जाग्या होतात.=)
पण माझ्यासाठी सुखाच्या झोपेसाठी दिवसभर केलेले श्रम पुरेशे असतात!
संपूर्ण सहमत!
आणि प्रणयाचं म्हणाल तर गंध अनुषंगिक आहे, पारस्पारिक आकर्षण आणि फिटनेस मुख्य आहेत.
आगदि व्यक्तिगत बोलायचं तर स्वच्छ आणि मोकळा श्वास, आणि गंधरहित अंगप्रत्यांगाच्या स्पर्शसुखाचा कैफ, ही प्रणयाची खरी मजा आहे! फ्रॅगरन्स वातावरणात असावा आणि शरीर गंधरहित हवं.
मी स्वतः रोज झोपताना शुचिर्भूत होऊन स्वच्छ चेहरा धुवून सुगंधी पावडर लावून नवीन पायजमा शर्ट घालून कडक इस्त्रीच्या चादरीवर झोपणे पसंत करतो.
या मुद्द्याशी मी पूर्णतः सहमत आहे आणि माझे स्वतःचे वागणेही जवळजवळ असेच आहे.
तथापि, रात्री झोपताना चेहऱ्यावर पाउडर लावणे योग्य आहे का? सौंदर्य तज्ज्ञ तर रात्री मेक-अप पूर्णतः उतरवून ठेवावा असे सांगतात.
रच्याक... लेख फारच उपयुक्त आहे, विशेषतः आळशी स्त्री-पुरुषांसाठी.
प्राणीमात्रांना प्रणय-सुख हे निसर्गाचे सर्वोत्तम वरदान आहे. ते भरभरून देण्या-घेण्यातही अकारण आळस/ कंजुषी/ हातराखलेपणा करणाऱ्या स्त्री-पुरुषांना मी सहानुभूतीदेखील दाखवू इच्छिणार नाही; नोकरी/ उद्योग/ घरकाम/ आहे अशी कारणे असणाऱ्यांना/ सांगणाऱ्यांना देखील नाही.
आयुष्य मजेत जगा(की जागा!)...
साहेब, पावडर मध्ये मूळ घटक टाल्क हा असतो आणि हा एक निष्क्रिय(INERT) आहे त्यामुळे तो आपल्या त्वचेबरोबर अजिबात क्रियाशील नाही. उलट त्वचेतून बाहेर पडणारे अतिरिक्त तेल/ स्वेद शोषून (ADSORB ) घेतो. शिवाय पावडर मध्ये वापरण्यात येणाऱ्या त्याच्या कणांचा आकार त्वचेच्या रंध्रांपेक्षा मोठा असतो त्यामुळे तो त्वचेची छिद्रे बंद करीत नाही. इत्राघातक सुगंधी द्रव्ये असतात त्यामुळे रात्री साधी पावडर लावल्याने कोणताही अपाय होत नाही.
लहान मुलांची पावडर (जोन्सन बेबी पावडर) मोठ्यांनी वापरू नये याचे कारण त्यांचा कणांचा आकार अतिशय लहान असतो( जो बालकांच्या त्वचे च्या छिद्रांपेक्षा मोठा असतो). हि पावडर अतिशय वस्त्रगाळ अशी असते ती बालकांच्या त्वचेला मुळीच हानी होउनये म्हणून.
बाकी प्रणय सुख हे फक्त मनुष्याला मिळालेले वरदान आहे खालच्या प्राण्यांसाठी ती एक जीवनाची अत्यावश्यक अशी सहजप्रेरणा(INSTINCT) आहे. त्यामुळे एकदा संबंध झाला कि कुत्रा आणि कुत्री वेगवेगळ्या दिशांना जातात मांजर किंवा चित्त यात तर संभोग हि मादीसाठी अतिशय वेदनादायक प्रक्रिया आहे. त्यामुळे मांजरांचा प्रणय हा अतिशय वादळी आणि कर्कश आवाजाचा असतो कारण मादी प्रणयासाठी मुळीच तयार नसते पण नर तिचा सतत पाठपुरावा करून शेवटी तिला खिंडीत गाठून संभोग करायला लावतो आणि या संभोगाच्या वेद्नेनेच स्त्रीबीज पक्व होते आणि पुढची संतती होते.
मानवाला संभोग हि एक अत्यंत उच्च दर्जाचे सुख देणारी क्रिया आहे म्हणून पुरुष लग्नासाठी तयार होतात. जर मानवात नराचे काम फक्त शुक्राणू दान हे असते तर पुरुष एका संभोगानंतर नम निराला झाला असता आणि स्त्रीवर बालकाला अठरा वर्षे पर्यंत पोसण्याची अत्यंत कठीण जबाबदारी आली असती. अशा परिस्थितीत किती बायका त्याला तयार झाल्या असत्या? आणि मग मुळ प्रेरणा वंशसातत्य हि खुंटलीच असती.
आपण जर रोज खायच्या पदार्थावर चव वाढवण्यासाठी नारळ कोथिम्बिर शेव असे पदार्थ पेरतो तर प्रणयाची प्रक्रिया खुलवण्या साठी थोडेसे जास्त कष्ट घेतले तर कुठे बिघडले ? दुर्दैवाने अतिपरिचयात अवज्ञा या न्यायाने नवरा/बायको सुद्धा रोजची होतात आणि लोक जसे नित्य कर्माने स्नान/ जेवण उरकून घेतात तसा प्रणयसुद्धा "उरकून" घेतात.
यासाठीच हा वेगळा विचार आहे.
जसे जेवण पंगतीत बसून सुवासिक उदबत्ती आणि मंगल सनईच्या सुरात करता येते किंवा रेल्वेच्या डब्यात मिळणाऱ्या राईस प्लेटने पण पोट भरता येते. काय करायचे ते आपण ठरवा
एकाच वासाचा दोन व्यक्तींवर वेगवेगळा परिणाम होतो. उदा. बोंबलाचा वासाने एखाद्या व्यक्तित भूक निर्माण होते. काहींची चक्क लाळ गळते तर काहींना मळमळते. भूक नाहीशी होते. संस्काराचा परिणाम कसा असतो ना?
डॉक्टरसाहेब. झकास लेखमाला आणि लेख.
रात्री आंघोळ (डोके धुण्यासहित) केल्यावर झोपताना अत्यंत छान, सुगंधित , स्वच्छ वाटतं हे अगदी खरं आहे. मी कितीही उशीरा घरी आलो तरी, कितीही थकवा आला असला तरी, रात्री आंघोळ केल्याशिवाय जेवत किंवा झोपत नाही. घरात सर्वजण या सवयीला हसतात. आणि मलाही कधीकधी असं वाटायचं की मी रात्रीच्या आंघोळीचा नियम फारच कडकपणे पाळतोय की काय.. ?! ऑब्सेसिव्ह काहीही वाईटच.. असाही विचार यायचा. हे इतर लोक कसे बिन आंघोळीचेही मस्तपैकी झोपू शकतात असंही वाटायचं..
पण आता तुम्ही लिहील्यावर वाटतंय की चांगलीच सवय आहे.. काही ऑब्सेसिव्ह नाही.
धन्यवाद..
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.
युगंधरा ताई,
रोज नाही तरी आठवड्यातून दोन दिवस जरी आपण झोपण्यापूर्वी स्वच्छ स्नान करून मंद सुगंध असलेली पावडर किंवा गजरा घालून एक इस्त्री केलेला गाऊन(किंवा आपण निजताना वापरता ते वस्त्र) घालून इस्त्रीच्या चादरीवर झोपून पहा. या गोष्टीना फारतर दहा मिनिटे जास्त लागतील. स्त्रिया एकदा मुल झाले कि स्वतःकडे लक्ष देणे सोडून देतात."स्त्री हि क्षणाची पत्नी आणी अनंत कालची माता आहे" हे आचार्य अत्र्यांचे वचन स्त्रियांच्या मानसिकतेवर खोलवर परिणाम करून आहे. या गोष्टी केवळ दुसर्यासाठी नव्हे तर स्वतः साठी करून पहा. जर आपण सध्या हळदी कुंकू समारंभात जाण्यासाठी तयार होण्यात दहा मिनिटे घालवू शकता तर स्वतःला आनंदित करण्यासाठी आपण दहा मिनिटे दिली तर चालेल. ( हे आपल्याला उद्देशून आहे असे नाही तर सर्व स्त्रियांसाठी लागू आहे.)
आपल्या व आपल्या आवडत्या व्यक्तीच्या (पतीच्या) नातेसंबंधात किती फरक पडतो ते सुद्धा आपल्याला जाणवेल.
I AM ALWAYS DECKED UP FOR THE CELEBRATION CALLED "LIFE"
प्रतिक्रिया
मस्त..
मस्त हो डॉक.
सहमत.
धुतलेले कपडे घालुन खरच छान
अगदी झोपतांना
गजरा नाही मिळाला तर...
करा नाव सार्थक!
बर… करतो दादा मस्ती करतो.
स्वच्छ कपडे घालुन, मस्त पावडर
छान. लेख आवडला. मला सुगंध
छान
क्या बात है दादा!
फ्रॅगरन्स वातावरणात असावा आणि शरीर गंधरहित हवं
झोपताना चेहऱ्यावर पाउडर लावणे योग्य आहे का?
साहेब, पावडर मध्ये मूळ घटक
अतिपरिचयात अवज्ञा होत नाही! उत्तरोत्तर रंगत वाढत जाते
ADSOR
नाही ADSORB हा शब्दच बरोबर
पण
छान!
एकाच वासाचा दोन व्यक्तींवर
वासाबद्दल सहमत.
वासांसी जीर्णानी यथा विहाय...
अच्छा असे आहे होय? आम्हाला
वस्त्रे जीर्ण झाली तरी `हाय' म्हणायची सवय अंतापर्यंत जात नाही
ओ हो...
वस्त्रे बदलून संकेतस्तळावर विहार करणारी व्यक्ती,
वास वास ! बास बास !
डॉक्टरसाहेब. झकास लेखमाला
पुढील भागांच्या प्रतिक्षेत
व्वा.
लेख छान आहे.माहिति पुर्ण आहे.
युगंधरा ताई,