साधे सोपे गणित.....

खालील समीकरणांमध्ये योग्य ती गणिती चिन्हे घालुन उत्तर ६ आणा.
गणिती समीकरणांचे सर्व नियम लागू.
त्या त्या अंकांशिवाय इतर कोणताही अंक वापरु नये.
उदा. २ + २ + २ = ६
६ + ६ - ६ = ६
मी २ सोपी उदाहरणे सोडवुन दाखवली आहेत.आता उरलेली सोडवा.

१ १ १ = ६
२ २ २ = ६
३ ३ ३ = ६
४ ४ ४ = ६
५ ५ ५ = ६
६ ६ ६ = ६
७ ७ ७ = ६
८ ८ ८ = ६
९ ९ ९ = ६

१?१?१ = ६
(२*२)+२ = ६
(३*३)-३ = ६
४+४ - (square root of(४)) = ६
(५/५)+५ = ६
६*६/६ = ६
७-(७/७) = ६
(cube root of(८))+(cube root of(८))+(cube root of(८)) = ६
(९+९)/(square root of(९)) = ६

(१+१+१)! = ६
२+२+२ =६
३*३-३ =६
वर्गमूळ(४) + वर्गमूळ(४) + वर्गमूळ(४)=६
५+(५/५) =६
६+६-६ =६
७- (७/७) =६
घनमूळ(८) + घनमूळ(८) + घनमूळ(८)=६
वर्गमूळ(९) *वर्गमूळ(९) - वर्गमूळ(९)=६

अवांतरः ! म्हणजे फॅक्टोरियल.

उदा: ३! = ३*२*१
४! = ४*३*२*१

उत्तर बरोबर आलेल्यांचे अभिनंदन......

मी काढलेली उत्तरे अशी आहेत......

(1 + 1 + 1)! = 6

2 + 2 + 2 = 6

3 * 3 - 3 = 6

4 + 4 - √4 = 6

5 / 5 + 5 = 6

6 + 6 - 6 = 6

7 - 7 / 7 = 6

8 - √(√(8+8)) = 6

(9 + 9) / √9 = 6

ज्यांनी घनमूळ वापरले आहे त्यांचे थोडे चुकले आहे...
त्या त्या अंकांशिवाय इतर कोणताही अंक वापरु नये.
घनमूळ वापरताना आपल्याला ३ हा आकडा स्वतःहून टाकावा लागतो..
घनमूळासाठी गणितात वेगळे चिन्ह नाही...

अवांतरः
"√" टाकताना विंडोजमधील कॅरॅक्टर मॅप वापरावा

फॅक्टोरिअल क्रिया = त्या संख्येस ती संख्या धरून १ पर्यंत आधीच्या सर्व संख्यांनी गुणणे.
जसे - ३! = ३ * २ * १ = ६
४ ! = ४ * ३ * २ * १ = २४ ...
महत्त्वाचे - क्ष ! = क्ष * (क्ष -१) ! जसे ४ ! = ४ * ३ * २ * १ = ४ * (३ * २ * १) = ४ * ३!
(मास्तर)बेसनलाडू