Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक आगळी वेगळी पाऊस कविता

ज — जुईचे फूल, Mon, 08/26/2013 - 04:01
बऱ्याच दिवसात तुझ्यावर काही लिहिलं नाही लिहावंसं वाटलं. बऱ्याच दिवसात मनासारखं काही केलं नाही करावंसं वाटलं. तू पडतोच आहेस रे माझ्या लहानपणापासून मीच खूप लांब आले तुला तिथेच सोडून बऱ्याच दिवसात मनाची कवाडं उघडली नाहीत उघडावीशी वाटली. बाहेर सगळे चांगलेच आहेत पण माझे कुणीच नाहीत खरंतर मी सुद्धा परकी झालेय माझी उरलेच नाही बऱ्याच दिवसात आपलं कुणी भेटलं नाही भेटावसं वाटलं. मला वाटलं तू खोटा झालास माझा पैसा खरा केलास पण तू अजूनी तसाच माझा पैसा खोटा केलास बऱ्याच दिवसात बालपण जगलेच नाही जगावसं वाटलं आज तुला पाहिलं पूर्वीसारखंच निरखून आज तुला पहिलं पूर्वीसारखंच हरखून बऱ्याच दिवसात स्वत:ला विसरलेच नव्हते विसरावंसं वाटलं का येतोस अवेळी अन करतोस माझी धावपळ माझ्याच मनी चलबिचल तू तसाच निश्चल बऱ्याच दिवसात तुझ्यात कुणाला शोधलं नाही शोधावसं वाटलं. दाखवतो आहेस खरा की सगळ्यांसाठी पडतोयस खरं खरं सांग तूही कुणाला तरी शोधतोयस बऱ्याच दिवसात कुणाला छेडलं नाहीस? छेडावसं वाटलं? पुरे झाल्या गप्पा आता निघून जा बरं ढगात मला बरीच कामं आहेत हे येतील घरात बऱ्याच दिवसात खरंतर कधीच कुणाला टाळलं नाही टाळावसं वाटलं.

प्रतिक्रिया द्या
2201 वाचन

💬 प्रतिसाद (11)
फ
फिझा Mon, 08/26/2013 - 04:10 नवीन
मस्त ! दाखवतो आहेस खरा की सगळ्यांसाठी पडतोयस खरं खरं सांग तूही कुणाला तरी शोधतोयस बऱ्याच दिवसात कुणाला छेडलं नाहीस? छेडावसं वाटलं? हे खासंच !!!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 08/26/2013 - 04:12 नवीन
:)
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Mon, 08/26/2013 - 04:45 नवीन
देवा! काय काय वाटल कस सांगु? उठुन झर्र्दीशी काहीतरी लिहावस वाटल.
  • Log in or register to post comments
स
सुधीर Mon, 08/26/2013 - 05:15 नवीन
आवडली कविता!
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Mon, 08/26/2013 - 05:26 नवीन
आवडली कविता
  • Log in or register to post comments
क
कोमल Mon, 08/26/2013 - 06:41 नवीन
मस्तच..
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Mon, 08/26/2013 - 07:00 नवीन
कविता आवडली. पण शीर्षक थोडं गंमतीदार वाटलं...:-)
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Mon, 08/26/2013 - 07:03 नवीन
अगदी 'आगळी वेगळी पाऊस कविता'. साधे शब्द असल्यामुळे पावसाची केलेला थेट संवाद भावला.
का येतोस अवेळी अन करतोस माझी धावपळ माझ्याच मनी चलबिचल तू तसाच निश्चल बऱ्याच दिवसात तुझ्यात कुणाला शोधलं नाही शोधावसं वाटलं.
.. हे कडवं तर १ नंबर
  • Log in or register to post comments
अ
अतुलनियगायत्रि Mon, 08/26/2013 - 07:06 नवीन
"बऱ्याच दिवसात खरंतर कधीच कुणाला टाळलं नाही टाळावसं वाटलं." हे मस्तच... बाकी सगलि कविताच उत्तम जमली आहे..
  • Log in or register to post comments
P
psajid Mon, 08/26/2013 - 09:14 नवीन
पुरे झाल्या गप्पा आता निघून जा बरं ढगात मला बरीच कामं आहेत हे येतील घरात बऱ्याच दिवसात खरंतर कधीच कुणाला टाळलं नाही टाळावसं वाटलं. हा कवितेचा उत्कर्ष बिन्दु ! अप्रतिम कविता ! एकदम आवडली !
  • Log in or register to post comments
भ
भ ट क्या खे ड वा ला Mon, 08/26/2013 - 17:49 नवीन
आगळं वेगळं वाचावास वाटलं
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा