Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कृष्ण नाही गोकुळी

ज — जुईचे फूल, Wed, 08/28/2013 - 01:00
रंग नाही गंध नाही रास नाही गोकुळी विरह वेड्या गौळणीचा श्वास नाही गोकुळी गोपिकांचे लक्ष भारी दूध लोणी लपविती दूध लोणी चोरण्याची आस नाही गोकुळी सांज वेळी कृष्ण जाई वाजवूनी बासुरी अधर वेड्या बासुरीचा वास नाही गोकुळी मोहनाने मोहलेल्या गौळणीला गाठली कृष्ण प्रेमी गुंगण्याचा भास नाही गोकुळी आठवांचे लोट येती नंदराणी सांगते गोकुळीला जगविणारा त्रास नाही गोकुळी

प्रतिक्रिया द्या
1345 वाचन

💬 प्रतिसाद (7)
स
स्पंदना Wed, 08/28/2013 - 02:14 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
न
नित्य नुतन Wed, 08/28/2013 - 09:10 नवीन
खुपच सुंदर ...
  • Log in or register to post comments
फ
फिझा Sat, 08/31/2013 - 03:15 नवीन
खूपच मस्त !!! आवडली रचना !!!
  • Log in or register to post comments
स
सुधीर Sat, 08/31/2013 - 06:33 नवीन
सुंदर कविता.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Sat, 08/31/2013 - 07:01 नवीन
सु रे ख!!
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Sat, 08/31/2013 - 22:32 नवीन
अतिशय सुंदर रचना. .... गाता येइल. :)
  • Log in or register to post comments
भ
भावना कल्लोळ Wed, 09/04/2013 - 12:10 नवीन
खुप सुरेख ……. सध्याच्या दहीहंडी मध्ये मला हे असेच भाव जाणवतात, कृष्णाची हंडी आता राजकारण्याची झाली. भक्तीचा तो भाव नाही, व्यवहार वसला गोकुळी.(थोडेसे अवांतर)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा