Welcome to misalpav.com
लेखक: शिवोऽहम् | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

तुम्ही स्वतः तर वेडे आहातच शिवोऽहम, पण आता आम्हालाही वेडे करुन टाकायला लागलाय. गुलाल ज्या पिक्चरबद्दल ऐकलही नव्हत काल पाहीला, खर सांगते पियुषवरुन नजर हलत नाही तो पडद्यावर असताना. झापडा खाउनही काही तरी सिद्ध करण अन ते ही खाल नजरेने. मस्त! दुनिया गाण रिवांईंड करुन करुन ऐकल. ती मुजर्‍याची दोन्ही गाणी सुद्धा मस्तच जमलेत. दुसर गाण पॅरोडी वाटत.

चला, आता तुम्ही चार गोष्टी सांगाल या माणसाबद्दल. चांगल्या सिनेमाच्या प्रयत्नांबद्दल. हा सिनेमा फार रखडला सेन्सॉरमध्ये. पब्लिक को भी कुछ जम्या नहीं. चालायचंच. असे नट, कलाकार आहेत आपल्यात आणि अजुन त्यांच्यात गर्मी आहे काम करायची हेच खूप आहे.

मस्त लिखाण गुलाल हा चित्रपट म्हणुन खुप मस्त होता आणि त्यात पियुषचा वाटा सिंहाचा आहे :)

पुभाप्र! दर वेळी प्रतिक्रिया देत नाही, पण वाचतो आणि वाट पहातो...

शिवोऽहम् साहेब्..सर्व प्रथम दंडवत स्विकारावे.जबरदस्त लेखमाला चालु केली आहे तुम्ही.पियुष मिश्रा सारख्या गुणी कलाकाराविषयी एवढं वाचायला मिळेल असा विचार सुद्धा केला नव्हता. मी पियुष मिश्राला सर्वप्रथम मकबुल मधे पाहिलं.लीड रोल नव्हता पण त्याने त्या पात्रात जिवंतपणा आणला होता. इरफान खान, तब्बु, पंकज कपुर, नसीर, ओम पुरी अशी मातब्बर मंडळी असताना देखील त्याच पात्र लक्षात राहिलं. त्यानंतर त्याचे बरेच चित्रपट आले पण गुलाल मधे धमाका केला या माणसाने.गीतकार, संगीतकार, गायक, अ‍ॅक्टींग सबकुछ मिश्राजी.रॉकस्टारमधे,वासेपुर सुदधा मस्त काम आहे याचे. अशा या अवलिया कलाकाराला सलाम.तुमच्यामुळे बरीच नवीन ओळख झाली या कलाकाराची. पुढील कलाकार मनोज वाजपेयी आहे हे वाचुन तर कमालीचे ऊक्तंठा वाढली आहे. इरफान खान,तिग्मांशु धुलिया,सौरभ शुक्ला,मकरंद देशपांडे,सुधिर मिश्रा यांच्या विषयीसुद्धा वाचायला आवडेल. पुलेशु.

हे सगळं वाचतोय... पियुष आधी अनेक चित्रपतातुन पाहिला होता. पण गुलाल आणि हुस्ना या दोन्ही मुळे शोधुन त्याचे बरेच चित्रपट पाहिले. गुलाल ची गाणी मस्तच आहेत.

शिवोऽहम वर अपर्णा अक्षय यांनी म्हणल्याप्रमाणे तू तर वेडा आहेसच... आम्हाला पण चटक लावतो आहेस. तुझ्या प्रत्येक शब्दातून तुझं पॅशन दिसतंय. आणि म्हणून पियुष मिश्रासारख्या खरोखरच एका अवलियाची माहिती तितक्याच अवलिया आणि "हुकलेल्या" रसिकाकडून वाचायचा आनंद मिळतोय. काय कमाल शब्दप्रतिभा आहे यार तुझी ! आणि सलाम तुझ्या लेखणीला आणि मुख्य म्हणजे तुझ्या पॅशनला! प्रचंड आवडतिये मालिका ! लिखते रहो ! जे.पी.

"दिल से" पाहिल्यापासूनच पियुष बद्द्ल उत्सुकता होती..पुढील भाग लवकर येउ द्या !!

जबरा. तुम्ही स्वतः तर वेडे आहातच शिवोऽहम, पण आता आम्हालाही वेडे करुन टाकायला लागलाय.>> अपर्णा यांच्याशी २००% सहमत. गुलाल ने जबरदस्त मोहिनी टाकली होती मनावर. कधीतरी त्यावर लिहिण्याचा मानस होता. पण नेमकी नस कधीच सापडली नाही. तुम्ही एका परिच्छेदातच चित्रपटाच सारं मर्म उलगडून दाखवलंत. टोपी काढली आहे. तुमची सारी पोतडी इकडे मोकळी करावी ही विनंती. अन्यथा भूत होऊन बोकांडी बसेन ही धमकीही देऊन ठेवतोय. _/\_