अजाणता
अजाणता जाणले कसे
इप्सित शब्दांनी मनातले
भातुकलीने लक्ष्य वेधले
गतकाळात विखुरलेले
चिमणी पोपट बुलबुल आदी
सवंगडी सारे जमले
चित्त हरखले हरली चिंता
वय उरले शैशवातले
बडबडगाणी हिरव्या रानी
राज्य परीचे सापडले
नितळ मोगरी अवकाशावर
बाळ निरागस बागडले
…………… अज्ञात
💬 प्रतिसाद
(2)
म
मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 08/29/2013 - 07:32
नवीन
हे खासचं!!
आवडले.
- Log in or register to post comments
P
psajid
गुरुवार, 08/29/2013 - 08:02
नवीन
बडबडगाणी हिरव्या रानी
राज्य परीचे सापडले
नितळ मोगरी अवकाशावर
बाळ निरागस बागडले
हे मला़ही आवडले !
- Log in or register to post comments