Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सुदामा

स — सार्थबोध, गुरुवार, 08/29/2013 - 08:34
काय वर्णन करू, त्या पामराचे सदनी दारिद्र्य, अठरा विश्वाचे जाहला गृहस्थ, पाश गरिबीचा स्मरे परंतु मेळा, गोकुळाचा ll १ ll दशा वाईट, भविष्य होय अंध उदर भरण्या, रोजचा आक्रंद स्मरणात तरी, होता गोपालवृंद इच्छा पाहण्या, पुन्हा तो मुकुंद ll २ ll करुनी विचार, निश्चय केलासे मनोमनी स्मरण, माधवाचे भेटस्वरूप काय, मित्रास न्यावे? कल्लोळ मनी, त्यास काय आवडावे ll ३ ll घरात नाही, एकही उपलब्ध दाणा कृष्णाचा मित्र, उगीच का रे म्हणा ! शिळे पोहे पुरचुंडी, घेतली शेवटी त्याच्या ठायी, तीच शक्य होती ll ४ ll आला द्वारकेस, उपाशी थकलेला काम टाकून, माधव भेटीस धावला धरिले पाय, हतबल सुदाम्याने तो सावळा मित्र, आलिंगन प्रेमाने ll ५ ll बडदास्त मित्राची, कृष्ण करी जातीने प्रेमात नाहला, विसरला सुदामा; मागणे दिली भेट पोह्याची, जीवाच्या सख्यास भेट पाहून उजाळा, जुन्या आठवणीस ll ६ ll उचंबळे सुदामा, भरवून घास मित्रास दोन घास पोटी, नीर कृष्ण लोचनास भेट साधी, किंचित दुर्गंधी त्यास मधुसूदन पाही, फक्त प्रेमभावास ll ७ ll परतला पुन्हा सुदामा, सारे अनोळखी कृष्ण-रुक्मिणी कृपा, काय हवे आणखी जाऊन झोपडी, बदल प्रासादात कुटुंब सारे, नाहले आनंदात ll ८ ll मनोमन हर्षला; कृतार्थ झाला, इथे तो सुदामा कृष्ण्हृदयी भाव तिकडे, मित्र सुदामा सुदामा ll ९ ll - सार्थबोध

प्रतिक्रिया द्या
872 वाचन

💬 प्रतिसाद (1)
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 08/29/2013 - 08:50 नवीन
नविन कायद्यानुसार अंधश्रद्धा पसरविण्यास मनाई आहे. (हलकेच घेणे).
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा