Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कृष्णलीला..

क — किसन शिंदे, गुरुवार, 08/29/2013 - 10:08
कुठे दोन-चार स्पीकर्स तर कुठे दहा फुटांच्या डॉल्बीच्या अजस्त्र भिंती.. कुठे पाच-दहा हजाराचं शुल्लक बक्षीस तर कुठे एक कोटीचं.. कुठे भगव्या टि-शर्टमधल्या कार्यकर्त्यांचा घोळका तर कुठे पांढर्‍या... कुठे गोविंदा रे गोपाळा तर कुठे मच गया शोर सारी नगरी रे.. कुठे चार-पाच थरांचा तर कुठे विश्वविक्रमाशी बरोबरी करणार्‍या नऊ-दहा थरांचा थरार.. कुठे हाता-पायावर निभावतं तर कुठे जिवाशी जातं.. कुठे मानाची तर कुठे जगातली सर्वात मोठी.. कुठे हिंदी तारे-तारका तर कुठे मराठी.. कुठे लावणीतलं या रावजी तर कुठे हिंदीतलं चिकनी चमेली.. उत्तराखंडमधली मोठ्ठी नैसर्गिक आपत्ती..पुरोगामी महाराष्ट्राला हादरवणारी दाभोळकरांची हत्या..सीमेवर झालेली जवानांची क्रुर हत्या..रूपयाची आर्थिक हेळसांड.. हे सगळं विसरून २१ व्या शतकातला मॉर्डन कान्हा सज्ज झालाय कोट्यावधीचे लोणी खायला! कदाचित हेच सगळं अपेक्षित असावं त्या सावळ्या घनःश्यामाला!!

प्रतिक्रिया द्या
2170 वाचन

💬 प्रतिसाद (10)
अ
अग्निकोल्हा गुरुवार, 08/29/2013 - 10:12 नवीन
सज्ज न होण अनपेक्षित कोणाला आहे ?
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 08/29/2013 - 10:20 नवीन
ह्म्म..
  • Log in or register to post comments
ध
धन्या गुरुवार, 08/29/2013 - 10:23 नवीन
अगदीच बुवा नास्तिक तुम्ही. देवाची पुजा तुमच्या डोळ्यांवर का येते?
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 08/29/2013 - 10:28 नवीन
ती झाली काल मध्यरात्रीच!! आता दिवसभर फक्त धुडगूस आणि धिंगाणा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
ध
धन्या गुरुवार, 08/29/2013 - 10:35 नवीन
आज पुण्यात तारकानवमी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
आ
आतिवास गुरुवार, 08/29/2013 - 10:26 नवीन
आहे खरं हे असं :-(
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 08/29/2013 - 13:10 नवीन
द्येवा, सुरवात तर छानचं. अश्याच अजुन कविता येऊ द्या :)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 08/29/2013 - 18:51 नवीन
सुरेख कविता रे. बाकी हा दहीहंडी फोडणारा निरागस कान्हा खास तुमच्यासाठी द्येवा. Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अग्निकोल्हा गुरुवार, 08/29/2013 - 21:28 नवीन
केल्या गेल्या आह्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
स
स्पंदना Fri, 08/30/2013 - 02:57 नवीन
दोन महिन्यापासुनची तयारी त्यांची. काय बोलाव काही कळत नाही खरच!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा