पाककृती

बटाट्याची शेव (आषाढी एकादशी विशेष)

Primary tabs

साहित्य : बटाटे, तिखट, मीठ, जिर्‍याची पूड, थोडे राजगिर्‍याचे पीठ, तळण्यासाठी तूप.

कृती : बटाटे घेऊन, ते वाफवून, अगदी वाटून घ्यावेत. ह्या बटाट्याच्या गोळ्यात चवीप्रमाणे तिखट, मीठ व जिर्‍याची पूड व थोडे राजगिर्‍याचे पीठ घालून गोळा चांगला मळावा. नंतर शेवपात्राने शेव तुपात तळून काढावी, ही शेव कुरकुरीत व चवदार लागते. ;)