Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"स्वामी तिन्ही जगाचा"

B — Bhagwanta Wayal, Fri, 08/30/2013 - 12:52
गोंडस रुप तुझे, घेतले डोळ्यात भरुन। बोबडे तेझे बोल, ठेवले हृदयी कोरुन॥ दुडू दुडू चाल तुझी, पायी खणकतो वाळा। दॄष्ट लागेल म्हणोन, लावला काजळाचा टिळा॥ चिऊ काऊचा करुन, भरविला दुध-भात। पोट भरताच तुझे, धरीसी तू माझा हात॥ काम करता करता, हाती पाळण्याची दोरी। झोप लागावी म्हणुन, ओवी होती ओठावरी॥ लागलास चालायला, आंगण झाले थोडे। होई काळ्जाचे पाणी, जेंव्हा दॄष्टीस न पडे॥ जमविले सवंगडी, खेळ मांडला दारात। जेवायला किती वेळा, बोलाविले मी घरात॥ तहाण भूक विसरुन, खेळ खेळ्ण्यात रंगला। लागला मित्रांचा संग, आईलाच विसरला॥ आईविन नाही माया, असो रंक अथवा राव। ठेच लागताच येते, मुखी आईचेच नाव॥ सर्व मिळेल विकत, या मायेच्या बाजारी। "स्वामी तिन्ही जगाचा", आईविण भिकारी॥ ...............बी.डी.वायळ

प्रतिक्रिया द्या
1382 वाचन

💬 प्रतिसाद (2)
P
psajid Fri, 08/30/2013 - 13:23 नवीन
दुडू दुडू चाल तुझी, पायी खणकतो वाळा। दॄष्ट लागेल म्हणोन, लावला काजळाचा टिळा॥ तुमच्या या कवितेने "लिंबलोन उतरू कशी ? असशी दूर बाळा तू ! इथून दृष्ट काढिते, निमिष एक थांब तू… थांब तू… " या गीताची आठवण आली. खुप छान कविता !
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal Wed, 09/04/2013 - 07:23 नवीन
प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासुन आभार साजीदभाई.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा