Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

" दु:खा "

क — कैलास गायकवाड, Sun, 09/01/2013 - 07:51
कधी नको अन कधी वाटतोस रम्य दु:खा तुझ्या नि माझ्यामधील नाते अगम्य दु:खा असा कसा बेसुमार आलास एवढ्यांदा जरा तरी बाळगायचे तारतम्य दु:खा तुझ्यामुळे जाणले सुखाचे महत्व यास्तव तुझे हजारो गुन्हे ठरवतोय क्षम्य दु:खा जगात जीवन नसेल जर काय दु:खविरहित जगावयाची कशास इच्छा अदम्य दु:खा हजार 'कैलास' जन्मती तव कथन कराया तुझ्यामुळे या कथा जोवरी सुरम्य दु:खा ---डॉ.कैलास गायकवाड

प्रतिक्रिया द्या
1287 वाचन

💬 प्रतिसाद (7)
प
प्रसाद गोडबोले Sun, 09/01/2013 - 10:36 नवीन
मस्त गज़ल ! विशेष करुन
असा कसा बेसुमार आलास एवढ्यांदा जरा तरी बाळगायचे तारतम्य दु:खा तुझ्यामुळे जाणले सुखाचे महत्व यास्तव तुझे हजारो गुन्हे ठरवतोय क्षम्य दु:खा
! हे दोन शेर खूप भावले . -- प्रसाद
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 09/04/2013 - 15:31 नवीन
झकास हाय,फकस्त अजुन खटक्यात बसायला पाहीजे होती! :)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 09/04/2013 - 18:19 नवीन
गझल. असा कसा बेसुमार आलास एवढ्यांदा जरा तरी बाळगायचे तारतम्य दु:खा तुझ्यामुळे जाणले सुखाचे महत्व यास्तव तुझे हजारो गुन्हे ठरवतोय क्षम्य दु:खा एकदम खास. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
स्पंदना गुरुवार, 09/05/2013 - 02:40 नवीन
खासच!
  • Log in or register to post comments
र
रुमानी गुरुवार, 09/05/2013 - 09:30 नवीन
छान...!
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 09/05/2013 - 09:36 नवीन
आकृतीबंध अन् वाचनीय.
  • Log in or register to post comments
P
psajid गुरुवार, 09/05/2013 - 11:37 नवीन
गझल खुप छान ! प्रत्येक शेर आवडला मात्र - "असा कसा बेसुमार आलास एवढ्यांदा जरा तरी बाळगायचे तारतम्य दु:खा" हा लाजवाब !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा