पाककृती

मक्याचा उपमा

Primary tabs

मक्याचा उपमा

साहित्य -मक्याची ४ कणसे, चांगले तूप २ चमचे ,जीर चवीनुसार ,२ हिरव्या मिरच्या ,थोडी कोथिम्बिर,दुध १ कप .मीठ चवीनुसार , (वाफवलेले मटार ,गाजर ,फ्लावर ई . घालू शकतो).
कृती -मक्याची कणस किसणीवर किसून घेणे . मिरची बारीक चिरू नये ,तिखट लागल्यास काढून टाकता येते . कोथिंबीर बारीक चिरणे ,gas on करून ,कढइत तूप जीर व मिरच्या घालून या फोडणीत किसलेला मका घाला व उलथल्याने नीट परतवून घ्या,मका शिजत असतांना एक कप दुध घालावे ,चवी नुसार मीठ घालावे ,नीट परतत रहावे ,एक ताटली ठेवून वाफ आणावी . gas बंद करावा व serve करावे .

ही कृती ४ झणांसाठी आहे.

पैसा

मिपावर स्वागत आहे. पाकृ चांगली लागत असावी. फोटो दिला असतात तर नक्की कशी दिसते त्याचा अंदाज आला असता.

रुमानी

आपले स्वागत...!
पाकृ छान. ...फोटो कुठेय हो ? :(
हा उपमा मि पण करते पण मिळुनयेण्या करीता थोडे चनाडाळ भिजवुन जाड्सर वाटुन त्या सोबत वाफवते. :)

मदनबाण

फोटो ?
फोटो नसेल तर प्रतिक्रिता देताना मी कंजुषपणा करतो ! ;)

स्पंदना

अरेच्या त्यात दुध आणी कशाकरता? मक्याच्या कणसांन बरच दुध असतं. कणस किसत असताना सगळ चिकचिक होतं ना?
आम्हे करतो हा उपमा अन अश्याच फोडणीचा पण मक्याचे दाणे काढुन,भाजुन, हलकेच झेझरुन आम्ही उसळ्ही बनवतो. मस्त लागते.
आता कॉर्न आणने आलं.