ध्यासबावळी
आस मिटे ना मन हो चातक थेंब मिळे ना स्वाती
तृषा पाशवी अंतर्यामी असून पाणी भवती
फिरे एकटा मेघ अंबरी आतुर सुकली माती
छळते सावट रंध्रे अनवट ठाव न लागे चित्ती
अंकुर चिंतातूर; दिसे ना किरण सोबती अवती
गुदमर विळखुन विरह दाटला स्तब्ध जाहली नाती
एक साद पवनास विनवते छेड बांधले मोती
झुलव आपला झुला; तोषव ध्यासबावळी धरती
…………………. अज्ञात
💬 प्रतिसाद
(5)
स
स्पंदना
गुरुवार, 09/05/2013 - 04:34
नवीन
तोषव ध्यास बावळी धरती........__/\__
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 09/05/2013 - 09:34
नवीन
ध्यासबावळी... हा शब्दच सुंदर आहे, आवडली.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 09/05/2013 - 13:28
नवीन
+१ टू मि.का.
- Log in or register to post comments
स
सुधीर
गुरुवार, 09/05/2013 - 12:39
नवीन
आवडली.
- Log in or register to post comments
इ
इन्दुसुता
Fri, 09/06/2013 - 05:54
नवीन
कविता आवडली.
- Log in or register to post comments