Welcome to misalpav.com
लेखक: शनआत्तार | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

नाही संगणक प्रयोगशाळा सकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत उघडी असते मुले आपल्या सवडीने येतात व आपला अभ्यास पुर्ण कत्रतात

अतिशय स्त्युत्त उपक्रम, पण संगणक वापरायला तेव्हढा वेळ विज उपल्ब्ध असते का? आणि दुसर...आळशी मुले नुसत कॉपी पेस्ट करणार नाहीत का?

आणि दुसर...आळशी मुले नुसत कॉपी पेस्ट करणार नाहीत का? हा स्वानुभव का काय ताई ? :) :)

अभिनंदनीय काम करत आहात, आत्तार साहेब. तुमच्या सिंधुदुर्ग वाल्या लेखात मी दिलेला प्रतिसाद इथे पुन्हा देतो आहे:
>>>> चांगले शिक्षण म्हणजे फक्त परिक्षा पास होणे, चांगले गुण मिळवीणे इतका तोकडा अर्थ नाही>>>
अगदी खरे आहे. आपल्या इकडल्या शिक्षणात एक फार मोठी उणीव आहे, ती म्हणजे कला, साहित्य, संगीत इ. विषयी उत्तम संस्कारांची उणीव. मी माझ्या मुलांचे मित्र (आता मोठे झालेले) बघतो, त्यांना उत्तम चित्रकार, संगीतकार, लेखक, कवी इ.ची नावेही ठाऊक नाहीत, त्यांच्या रचना माहित तर असणे दूरच. याउलट युरोप अमेरिकेतील विद्यार्थ्यांना अगदी लहान पणापासून संग्रहालयात नेऊन अनेक प्रकारची माहिती दिली जाते. चित्रकलेच्या बाबतीत मी मदत करू शकतो, ती म्हणजे उत्तमोत्तम चित्रे निवडून त्याबद्दल थोडी माहिती असलेला एकादा ब्लॉग बनवून तो विद्यार्थांना दाखवता येइल. याच प्रकारे शाळेत भारतीय व पाश्चात्त्य शास्त्रीय संगीत थोडावेळ वाजवले, तर तेही त्यांच्या कानी पडेल.

तुमची आयडीआ पण मस्त आहे. खरचं असा ब्लॉग तयार करा, सगळ्यांनाच वापरता येईल. आत्तार सर.. मस्त उपक्रम. शिक्षकदिनाच्या शुभेच्छा!!

चांगला उपक्रम. येत्या आधुनिक काळात संगणक साक्षरता सर्व खेडोपाडीही पोहोचली पाहीजे. शाळेत सकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत संगणक वर्ग सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे ही सुद्धा शाळा चालकांची फार कौतुकास्पद बाब आहे असे म्हंटले पाहीजे. तुमच्या ह्या उपक्रमास अनेकानेक शुभेच्छा..!

अतिशय उत्तम उपक्रम! एका खेडेगावात हे सगळं करता आहात याबद्दल विशेष अभिनंदन! यामुळे मुलांना संगणकाचीही सवय होत आहे आणि अभ्यासही होतो आहे. वीज नसणे वगैरे अडचणींवर मात करावी लागत असेलच पण हे सगळं वाचून छान वाटलं. असेही प्रयोग मरगळलेल्या शिक्षणक्षेत्रात होत आहेत! इथे कोणी कोणी मुलांनी वेळ काढण्याबद्दल लिहिले आहे. पण मुले कसाही वेळ काढतात. माझ्या मुलाला संध्याकाळी घरी आल्यावर मैदानी खेळासाठी वेळ हवा असायचा. म्हणून पठ्ठ्याने या गृहपाठावर उपाय शोधून काढला होता, तो म्हणजे एक पीरियड झाला की दुसरे शिक्षक येईपर्यंतचा वेळ, मधली सुटी असा सगळा शाळेतला रिकामा वेळ तो गृहपाठासाठी वापरायचा. :D घरी कोणालाच कटकट नाही! आणि गृहपाठही पूर्ण!

आत्तारसाहेब ! _/\_ तुम्हाला! अत्यंत स्तुत्य आणि प्रेरक उमक्रम. हार्दिक अभिनंदन आणि उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा ! जे.पी.

हार्दिक अभिनंदन आत्तार साहेब, अतिशय चांगल्या रितीने तुम्ही तुमचं ज्ञान मुलांच्या शि़क्षणासाठी वापरत आहात *clapping*

आत्तार साहेब्...हार्दिक अभिनंदन !! या सम्पूर्ण प्रयोगाची सुरूवात, येणार्या अडचणी आणि त्यावर तुम्ही योजलेले उपाय यावर एखादा लेख लिहाल काय? धन्यवाद!!

तुम्हांला ह्या मुलांसाठी संगणकाची गरज असली तर मी देऊ शकते. माझ्याकडचा जरा जुना आहे, पण मुलांना चालू शकेल. मला व्य नि तून संपर्क करु शकता. चांगल्या अवस्थेतला संगणक, मॉनिटर वगैरे सगळे आहे.

अभिनंदन अत्तार सर. शिक्षण क्षेत्रात टॅबलेट्सचा वापर सुरु झाला आहेच पण भारत सरकारची स्वस्तात टॅबलेट उपलब्ध करुन देण्याची योजना होती, त्याचं काय झालं माहित नाही पुढे. पुस्तकांच/ पर्यायाने दप्तरांच ओझं कमी करण हे जरी शिर्षक असलं तरी सदरहू उपक्रमातून बर्‍याच बर्‍याच गोष्टी मुलांना करायाला/ अनुभवायाला मिळत असणारच. आता हे सगळं तुम्ही इतर शिक्षकांना समजावून त्यांच्या पचनी पाडून दिलत की मग साखळी अभियान सुरुच :) शुभेछा तुम्हाला शिक्षक दिनानिमित्त आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठीही.