Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अर्धांग

त — तिमा, गुरुवार, 09/05/2013 - 16:41
नोकरीने शोषलेले, प्रवासाने शिणलेले ते आमचे अर्धांग, न्याहाळत असतो मी, पैलतीरावरुन ! अधुन मधुन ओळख दाखवतं, सटीसहामाशी, कधी वाट्याला येतं चिपाड बनून! तेंव्हा डोळ्यांखालच्या काजळीत शोधू लागतो मी काजळमाया आणि शुष्क ओठांतली उरली सुरली थरथर प्रयत्न करुन! मग जाणवतात यंत्रवत प्रतिसाद,थंड गात्रे एक उरकून टाकण्याची भावना बहुतकरुन!

प्रतिक्रिया द्या
2756 वाचन

💬 प्रतिसाद (16)
प
पैसा गुरुवार, 09/05/2013 - 17:59 नवीन
नोकरी, घरकाम सगळ्याच्या ताणामुळे सगळ्यांचंच असं होत असेल. पण हे ताण कसे दूर करायचे यावर जास्त विचार करायचा! कविता/मुक्तक सुंदरच जमलं आहे!
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 09/05/2013 - 20:20 नवीन
बायको सुखात तर जिंदगी मजेत. फेक म्हणावं उद्या राजीनामा. हे दिवस पुन्हा येत नाहीत.
  • Log in or register to post comments
त
तिमा Fri, 09/06/2013 - 13:53 नवीन
अहो, हे व्यक्तिगत घेऊ नका. नुसता कल्पनाविलास आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Fri, 09/06/2013 - 14:25 नवीन
माझा एक मस्त प्रतिसाद निष्कारण डिलीट झालयं त्यामुळे डबल दु:ख!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
अ
अग्निकोल्हा Sun, 09/15/2013 - 12:41 नवीन
हे दिवस पुन्हा येत नाहीत.
दिवस येत नाहित मान्य आहे, पण यातुन भलतेच दिवस जातिल त्याचे काय ? तसही बाची, कुटुंबाची वा भारताचि इकॉनॉमी ड्ब्यात घालायला आसुसलेले आपले तत्वज्ञान नेहमीच वाचनारोचक असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
य
यशोधरा Fri, 09/06/2013 - 05:41 नवीन
सुर्व्यांच्या कवितेची आठवण झाली!
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 09/06/2013 - 05:52 नवीन
द्याल का इथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Fri, 09/06/2013 - 06:07 नवीन
जनरल बाज संक्षी. तरी एक दोन नमुने टंकेन वेळ झाला की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 09/06/2013 - 07:35 नवीन
वाह तिमा...
तेंव्हा डोळ्यांखालच्या काजळीत शोधू लागतो मी काजळमाया आणि शुष्क ओठांतली उरली सुरली थरथर प्रयत्न करुन!
हा कवितेचा कळस आहे... सुंदर शब्दात व्यक्त झालेली व्यथा अजुनच बोचते..
  • Log in or register to post comments
र
रुमानी Fri, 09/06/2013 - 09:12 नवीन
नोकरी आणि संसार अगदी तारेवरचि कसरत अस्ते बायकांन करीता.:(
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Fri, 09/06/2013 - 09:41 नवीन
वाचनीय आणि अर्थपूर्ण.
  • Log in or register to post comments
भ
भावना कल्लोळ Fri, 09/06/2013 - 14:06 नवीन
वास्तव आहे, पण सध्या काळाची गरज झाली आहे, पण कविता छान जमली आहे.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना गुरुवार, 09/12/2013 - 03:25 नवीन
नोकरीने शोषलेले, प्रवासाने शिणलेले ते आमचे अर्धांग, न्याहाळत असतो मी, पैलतीरावरुन ! पहिल्या कडव्यातच केव्हढा तो विरोधाभास तिमा? एकीकडे अर्धांग म्हणता अन पैलतीरावरुन पहाता? (अर्थात कवी) म्हणजे अर्धांग या शब्दाला अर्थच नाही उरला. तुम्ही तुमचा हात पैलतीरावरुन पाहु शकता? पाय? शरीराचा कोणताही अवयव? अगदी डोक्यावरचे केस? पहा बघु पैलतीरावरुन? नाही जमत ना? मग ....जे पुरं तुमच अर्धांग आहे ते तुम्ही जर पैलतीरावरुन पहात असाल तर मग ..ते कवितेते पुढे येणार्‍या शब्दांसारख...उदास..चिपाड...अन व्यवहार साधकच असणार. अर्धांग...काय सांगाव या शब्दाबद्दल? बोलायची सुद्धा गरज नसणारं ते अर्धांग...मना शरीराची वेदना समजणार ते अर्धांग..आपसुक फुलणार...सोबतीने खुलणार..घासात अडकणार..श्वासात फुलणार...नजरेत भरणार..ते अर्धांग. ते असं पैलतीरावरुन पहाणार्‍यांच्या नशिबात थोडच येणार आहे..जास्तीते जास्त जनाची लाज म्हणुन..समाजाची चौकट म्हणुन तुमच्या घरात एक मोलकरीण म्हणुन राहील ते, वर आणि नोकरी करुन पैसा कमवुन आणुन तुमची आर्थीक गरजही भागवील ते..पण जर तुम्ही पैलतीरावर...तर ते तुमच अर्धांग नाही.
  • Log in or register to post comments
त
तिमा गुरुवार, 09/12/2013 - 17:10 नवीन
पैलतीरावरुन चा जो अर्थ तुम्ही लावला आहे तो मला अभिप्रेत नव्हता. जवळ राहूनही, नोकरी करणार्‍या अनेक जोडप्यांना हल्ली रोज बोलायलाही वेळ मिळत नाही. एकाच घरांत राहूनही ती दोघं वेगवेगळ्या ऑर्बिट मधे फिरत असतात. अर्धांगाकडे कोणी फक्त वासनेच्या भावनेतून पहात नाही. पण जवळ राहूनही, जर चार सुखदु:खाच्या गोष्टीही बोलायला मिळत नसतील तर या व्यवस्थेमुळे, फ्रस्ट्रेशन येऊ शकते. ती भावना मांडण्याचा फक्त प्रयत्न केला.घरातील कामे, आर्थिक गरज यापलिकडेही काही अपेक्षा असतात. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
च
चित्रगुप्त गुरुवार, 09/12/2013 - 04:26 नवीन
'पैलतीरावरून' हा शब्द मलापण 'आखरला' (इन्दौरी भाषा) होता पण अपर्णाताईंनी त्यातलं नेमक आखरणीयत्व उलगडून दाखवलंय. कवी वार्धक्यामुळे, वा तथाकथित अध्यात्मिक साधनेमुळे 'पैलतीराला' पहुचला आहे का?
  • Log in or register to post comments
स
सस्नेह गुरुवार, 09/12/2013 - 04:31 नवीन
टोकदार वास्तवाची धारदार जाणीव !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा