Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मूक आक्रोश

क — किसन शिंदे, Sat, 09/07/2013 - 12:50
दिल्लीतील बलात्काराची शिकार झालेल्या "निर्भया"च्या शेवटच्या शब्दांवर आधारित एक कविता सध्या सगळीकडे ऐकू येते आहे. ती इंदू वर्मा यांनी लिहिली आहे. तिचा हा भावानुवाद. http://www.youtube.com/watch?v=fyrj5tMwjic आई, त्रास खुप सहन करून मनाला तुझ्या खुप त्रास देवून सांगून तुला काही, मी जात्ये आहे.... आज माझ्या पाठवणीला सख्या भेटायला येतील तेव्हा सफेद कपड्यात गुंडाळलेली पाहून मला हमसून हमसून रडतील जेव्हा.... आपल्या स्त्रीपणाचीच त्यांना जेव्हा लाज वाटेल आई, पाशवी लोकांच्या या दुनियेत सांभाळून त्यांनी राहावं हेच सांगणं तुझ्याकडे माझं फक्त एवढंच एक मागणं.... राखीला भाऊ त्याच्या मोकळ्या हाताकडे पाहील माझ्या आठवणीने त्याच्या डोळ्यात पाणी येईल भाळी टिळा लावायला आत्मा माझा तळमळेल आई, भाऊला रडून नको देवूस अश्रुंनी त्याच्या मी इथे हळहळेल.... आई, बाबाही मुक्याने खुप अश्रु ढाळतील काहीच करता न आल्याचा स्वतःलाच दोष देतील आई, वेदना त्यांना तू होऊन देवू नको आरोप स्वतःवर घेऊन देवू नको तेच माझा अभिमान तेच माझा सन्मान एवढं त्यांना तू सांगशील आई, तुझ्यासाठी शब्द नाहीत तुझ्या वेदनेला शब्दात कसं सांगू पुन्हा एकवार जगण्याचं दान कसं मागू आई, लोकं तुलाच दोषी ठरवतील मला स्वातंत्र्य देण्याचा तुलाच ठपका लावतील आई, सगळं सहन कर पण हे म्हणू नको "पुढच्या जन्मात मला मुलगीच पोटी नको”

प्रतिक्रिया द्या
2038 वाचन

💬 प्रतिसाद (9)
म
मुक्त विहारि Sat, 09/07/2013 - 12:57 नवीन
अक्षरे धुरकट झाली.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 09/07/2013 - 13:12 नवीन
मूळ कविता अतिशय उत्कट आहे. भावानुवाद अत्यंत सुरेख. लोकप्रिय कलाकार अमिताभ बच्चन यांचीही या विषयावरील कविता ऐकली आहे.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 09/07/2013 - 13:34 नवीन
काय बोलू..?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 09/07/2013 - 13:38 नवीन
सुंदर भावानुवाद. पण किसनद्येव सध्या लैच सेन्टी मूड मध्ये दिसायलेत.
  • Log in or register to post comments
स
स्पा Sat, 09/07/2013 - 13:40 नवीन
किसनद्येव सध्या लैच सेन्टी मूड मध्ये दिसायलेत.
ह्म्म्म
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 09/07/2013 - 13:46 नवीन
लैच सेन्टी मूड मध्ये दिसायलेत. >>>>> +२ बाकी अनुवाद छान!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
त
तिमा Sun, 09/08/2013 - 09:09 नवीन
उत्तम भावानुवाद. आपण सगळेच असहाय्य असल्याची जाणीव तीव्रतेने होते, असं काही वाचल्यावर.
  • Log in or register to post comments
अ
अग्निकोल्हा Sun, 09/08/2013 - 09:14 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
P
psajid Tue, 09/10/2013 - 08:36 नवीन
खुप सुन्दर भावानुवाद आणि अस्वस्थ करणारे शब्द आणि हुरहूर लावणारा संवाद !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा