Welcome to misalpav.com
लेखक: प्रचेतस | प्रसिद्ध:
गणेशचतुर्थीच्या आणि मिपावर्धापनदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. भटकंतीच्या निमित्ताने लेणी, मंदिरे फिरता फिरता आढळलेल्या गणेशमूर्ती आज येथे देत आहे. ह्या मूर्ती निवडतांना मुद्दामच प्राचीन काळातील निवडलेल्या आहेत. साधारण ८व्या शतकापासून ते १३ व्या शतकापर्यंतच्या ह्या मूर्ती. राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार ते यादव या राजवटींमधील ह्या मूर्ती. त्या काळी गणेशदेवतेला मुख्य देवतांत स्थान नव्हते म्हणूनच ह्या काळात गणेशमूर्ती मुख्य गर्भगृहांत कधीही नव्हत्या. त्या कोरलेल्या असायच्या मंदिरांच्या बाह्य भिंतींवर, प्रवेशद्वारांतील गणेशपट्टीवर किंवा सप्तमातृकांपटांमध्ये. १. सप्तमातृकांसह असलेला वेरूळच्या कैलास लेणीतील यज्ञशाळेतील हा गणेश. शेजारीच आहे सर्वभक्षक काल. a २. वेरूळच्याच २१ व्या क्रमांकाच्या रामेश्वर लेणीतील हा सप्तमातृकांसह असलेला गणेश a ३. वेरूळ लेणी क्र. १७ मधील हाती असलेल्या मोदकपात्रातील मोदक (का लाडू?) खात असलेला गणेश. a ४. अंजनेरीच्या भग्न जैन मंदिरातील ही गणेश प्रतिमा a ५. अंजनेरीतीलच गणेशाची अजून एक भग्न प्रतिमा. ह्या गणेशाने त्याच्या पत्नीला (रिद्धी/सिद्दी) पैकी एकीला आपल्या मांडीवर बसवले आहे. a ६. गोंदेश्वर शिवपंचायतनातील एक गणेशमूर्ती a ७. गोंदेश्वर मुख्य शिवमंदिराच्या स्तंभावरील गणेशप्रतिमा a ८. पाटेश्वर येथील आगळावेगळा गणेश a ९. पाटेश्वर येथीलच स्त्रीरूपी गणेश अथवा गणेशिनी अथवा विनायकी a १०. भुलेश्वर येथील स्त्रीरूपी गणेश अथवा गणेशिनी अथवा विनायकी a ११. पेडगाव येथील भग्न बाळेश्वर मंदिरातल्या सभामंडपातील स्तंभावर असलेला गणांसह नृत्यमग्न गणेश a १२. तिथल्याच बाह्य भिंतीवर असलेला अजून एक नृत्यमग्न गणेश a १३. पेडगाव येथीलच अजून एका भग्न मंदिरातील गणेशमूर्ती a १४. पिंपरी दुमाला येथील प्राचीन मंदिरातील गणेशप्रतिमा a १५. पिंपरी दुमाला येथीलच महावीरांसह असलेली गणेश प्रतिमा a १६. पांडेश्वरच्या यादवकालीन शिवमंदिरातीच्या बाह्य भिंतीवर असलेला गणेश a १७. खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराच्या बाह्य भिंतीवर असलेली भव्य गणेशप्रतिमा a १८. खिद्रापूरच्या मंदिरातील सप्तमातृकापट. डवीकडे वीरभद्र शिव मध्ये सप्तमातृका आणि शेवटी उजवीकडे गणेश a