Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

निरोप

य — यशोधरा, गुरुवार, 09/12/2013 - 12:20
मंडळी, जरा साताठ दिस म्या येला ट्रेकला जाऊन येतू, तंवर नीट करुन र्‍हावा, जास्त धूमशान करु नगा. मिपा बंद पाडू नका. मी ही ग्येले आन ही परतून आलेच! काय बाय मनात आल्येलं लिवल्यालं हाये. यमकं आणि बिमकं मिळेल का; न्हाईती तवा शोदू नये! ~ हुकूमावरुन (कोनाच्या म्हंजी? माज्याच की!) येत्येच की म्यां जाऊन तंवर नीट र्‍हावा गप्पागोष्टी कराल तवा माजीबी याद काडा * दूरची हाय वो वाट चाल तर व्हनार इक्ती कुडी अक्षी गळनार मन भिर्र पाखरावानी! * आनभव जगायेगळे पदरी मीबी बांदीन सूर्य बगीन, चंद्र बगीन आभाळ माथा धरीन * आसंल कदी चांदनी सोबतीला येकुलती वाटंल तिला बगून आमी जल्माच्या मैतरनी! * गोळा करीन आटवनी आन् गठुडं त्येंचं बांदीन आन् न्हेमीच मनात जपीन मपली शिरीमंतीची लेनी * वाट चालता चालता दिस सरुन जात्याल मुक्कामाला सोबतीनं अल्लाद आनून सोडत्याल * जसा सरंल प्रवास समदं रितं रितं वाटंल धा दिशांमदून कसा बांध मनाचा फुटंल * पुन्ना कधी, केव्हा, कुटं बगायाला ह्ये गावंल? परतताना नगाधिराजाला साकडं मग मी घालंल * येऊ दे की रं मला वर्साला दर येकदा तरी काळजात साठवीन तुला मन व्हईल समाधानी * तर, भ्येटूच आपन लौकर ती खात्री हायेच मला आले की उलगडीन निसर्गाअंगीच्या कळा * आता घेत्ये रजा मागून येक मागनं यारी दोस्ती इसरु नगा आपुलकीचं लेनं

प्रतिक्रिया द्या
3405 वाचन

💬 प्रतिसाद (21)
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 09/12/2013 - 12:26 नवीन
काय वो हे? जौन जौन कुटं जानार तुमी आसं?
गोळा करीन आटवनी आन् गठुडं त्येंचं बांदीन आन् न्हेमीच मनात जपीन मपली शिरीमंतीची लेनी
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 09/12/2013 - 12:34 नवीन
हिमालयात चाललू न्हवं का.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 09/12/2013 - 12:38 नवीन
लै ब्येस... म्हंजी आक्शी जंक्शनच म्हना की वो !
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 09/12/2013 - 14:00 नवीन
परत आल्यावं त्ये गठुडं त्यवडं उघडून दावा मंजी झालं. येवा निचिंतीनं!!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 09/12/2013 - 14:20 नवीन
निचितीनं जावा....इकडची काय काळजी करु नका. इथं काय घडलं बिघडलं ते आम्ही तपशीलवार इथं लिहू बघा. हिमालयातून आल्यावर तेवढं वृत्तांत खंग्री लिहा. प्रवासासाठी शुभेच्छा....!!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मोदक गुरुवार, 09/12/2013 - 15:04 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
स्पा गुरुवार, 09/12/2013 - 18:09 नवीन
+२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आ
आनन्दिता Fri, 09/13/2013 - 05:50 नवीन
+३
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
म
मूकवाचक Fri, 09/13/2013 - 14:46 नवीन
+४
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
प
प्यारे१ गुरुवार, 09/12/2013 - 15:05 नवीन
सोताला सोडून या त्या हिमालयात. शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 09/12/2013 - 15:07 नवीन
हॅप्पी जर्नी. फोटोसकट वृत्तांताच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे गुरुवार, 09/12/2013 - 18:48 नवीन
मनाच्या एका कोपर्‍यात साठवा त्याला डोळे भरून बघणं...एवढं एक करा फक्त.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह गुरुवार, 09/12/2013 - 19:01 नवीन
आमचाबी नमस्कार सांगा बरं हिमालयाला !
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Fri, 09/13/2013 - 03:01 नवीन
लय हौस फोटुची तू नग करु सये आधी भरावी नदर मग काळीज ही बये कुणी उघडावी सांग फडताळीची ही पोथी काळजाच्या नदरेची आठवण लय मोठी र्‍हा जपुन ग जीवा नगो अधीर ते भाव र्‍हा लोकांना धरुन नगो एकांताची हाव घट्ट धरुन जिमिन घ्यावा आभाळाचा ठाव काय सांगाव मी यशो तुझामाझा एक गाव.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 09/13/2013 - 03:23 नवीन
र्हा जपुन ग जीवा नगो अधीर ते भाव र्हा लोकांना धरुन नगो एकांताची हाव घट्ट धरुन जिमिन घ्यावा आभाळाचा ठाव काय सांगाव मी यशो तुझामाझा एक गाव. छान.......!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
य
यशोधरा Sun, 09/22/2013 - 16:52 नवीन
किती सुरेख लिहिलं आहेस गं! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
अ
अग्निकोल्हा Fri, 09/13/2013 - 05:57 नवीन
.
  • Log in or register to post comments
र
रुमानी Fri, 09/13/2013 - 14:00 नवीन
आपल्या प्रवासास शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Fri, 09/13/2013 - 22:15 नवीन
हायला!! हिमालयात? येताना माझ्यासाठी एक यति घेउन ये.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 09/22/2013 - 16:34 नवीन
धन्यवाद! :) आत्ताच परत आले काही वेळापूर्वी! अगदी सुरेख झाला ट्रेक. जीव सुखावला... करु आता गप्पा बैजवार. :)
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Mon, 09/30/2013 - 02:28 नवीन
अरे? वापिस भे आ गये आप? चलो। अभी इत्मिनानसे बाते करेंगे।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा