छान ओळख करून दिली आहे. राज कपूर, शंकर जयकिशन, शैलेन्द्र आणि लता मंगेशकर ही एक जबरदस्त टीम होती. हिंदी सिनेसंगीताचा सुवर्णकाळ असंच या काळाला म्हणावं लागेल. जयकिशन गेल्यानंतर एकटा शंकर स्वतंत्रपणे फार काम करू शकला नाही यावरून या जोडीचं एकत्व लक्षात यावं.
१९६२ मधे मी यत्ता तिसरीत होतो. त्यावेळी " जिस देशमे " ची गाणी गाजत होती. त्याच वेळी शं ज च्या प्रेमात पडलो , पण पुढे १९६५ मधे मेरे सनम या चित्रपटाद्वारे ओपी नय्यर भेटले. त्यांच्याकडे एस जे सारखा रेंज नाही पण मेलडी व रिदम यांचा सुरेख संगम दिसे . त्यांच्या गीतांशी जणू माझे लगीन लागले. पण आजही पहिलं प्रेम विसरलेलो नाही.
माझ्या मते, आरजू हा चित्रपट म्हणजे त्यांच्या कारकीर्दीचा कळस ! बाकी रागदारीचा फार वेगळा असा उपयोग एस जे नी केला यात शंका नाही. भैरवी पहाडी, कामोद, शिवरंजनी, बसंत बहार भूपाली ई नी नटलेले त्यांचे संगीत अजरामर आहे. बरोबरच शंकर यांचे काउंटर मेलडी वरचे प्रभूत्व ही विसरून कसे चालेल ? जयकिशन यांच्यात रूप व स्वरप्रतिभा यांचा मिलाफ इतका ही क्या कहने ?
गीताच्या धव्निमुद्रणात गायकाचा एक लेअर मानला तर स्वरांच्या भरण्याचे, फॉलो पीसचे, फिलर्स चे काम दुसर्या काही लेअर वर करतात.मुळ चालीला उत्तम साद घालेल असा ( चाल म्हणजे मेलडी ) आणखी एक थर म्हणजे काउंटर मेलडी. उदा. दिलके झरोकोमे ही गीत ऐकल्यास त्यातील मागच्या लेअरवर वाजणारा वायलीनचा ताफा काउंटर मेलडीचे काम करतो. सर्वच संगीतकार या प्रकारच्या स्वरमेलनाचा उपयोग करतात पण " शंकर" त्यात बाप होते असे म्हटले जाते. " नजरमे बिजली
अदामे शोले" "मदहोश हवा मतवाली फिजा" कहता है जोकर सारा जमाना ई उदाहरणे अशीच आहेत.
प्रतिक्रिया
भावपूर्ण श्रद्धांजलि
छान ओळख.
माझे पहिले प्रेम ...
काउंटर मेलडी म्हणजे काय?
एक थर