Welcome to misalpav.com
लेखक: मुक्त विहारि | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

आँ!! यात कट्ट्याचा वृत्तांता कमी, तुमच्या घरचाच वृत्तांत जास्त आहे. तो ही खुसखूशीत आहे म्हणा. ;) बादवे कट्ट्याच्या वेळी मला डॉक्टरांनी केलेली तुफान फटकेबाजी जाम आवडली. :)

सौ मुक्तविहारी मिपा मेंबर असल्या तर तो आणखी एक कट्टा झाला ना?

सहज सुचलं, सौ मुक्तविहारी काय सदस्यनाम घेतील? कदाचित मुक्तिवाहिनी ;-).

 वरील राग तुम्ही कट्टा केलात म्हणुन, म्हणजे हमरेकु मिळ्या न्हय म्हणुन. फार छान! बरे दुपारी घोरता तुम्ही? लेखातली फटकेबाजी आवडली.

की, मी थोडी सुरुवात करून देणार आणि इतर जमलीली मंडळी आपापले अनूभव लिहिणार, जेणे करून क्ट्ट्याला हजर असलेला प्रत्येक्जण व्रुत्तांतात थोडी फार भर घालेल.

यावरून का कुणास ठाउक " पुन्हा प्रपंच " मधील मिसेस टेकाडे यांची आठवण झाली. मिसेस मुवि कदाचित कधीच कट्ट्याला येणार नाहीत पण मुविंच्या शब्द कौशल्यामुळे त्या लक्षांत रहातील . बाकी गुंडया भाउचा कोचा झाल्याने चिमण जसा विशिष्ट आवाजात हसतो तशी बायकोचा " जीवन" चेहरा पाहून मुवि हसताहेत "चिमण स्टाईलने" असे दृष्य दिसत आहे. !!

जसा मुविंना मी अचानक फोन केला, तसेच मलाही त्याच्या काही वेळ आधी कट्टा संयोजक आदरणीय स्पा साहेबांनी फोन करून या कट्ट्याची पूर्वकल्पना दिली. त्यांच्या गंभीर सूचनेनुसार मी मुविंना आणि इतर काही जणांना फोन केला, आणि रविवार कट्टा जुळून आला. ठरलेल्या वेळेसाठी आवरा आवर चालू असताना डॉ. सुबोध खरेंचा फोन आला, आणि ते या कट्ट्याला येत असल्याचं सांगून त्यांनी कट्ट्याआधीच आमचा आनंद द्विगुणित केला. मिपाचे अजून एक ज्येष्ठ सदस्य आदरणीय सूडसाहेबांनी इच्छित स्थानकात उतरण्यात काहीसा घोळ घातल्यामुळे त्यांच्या प्रतिक्षेत थांबलेले किसनराव आणि स्पा यांना पोहोचण्यास उशीर झाला हे सांगायला नकोच. तो पर्यंत कट्ट्याच्या ठरलेल्या ठिकाणी म्हणजेच एम.आय.डी.सी. मधल्या सेलिब्रेशन हॉटेलात डॉ. खरे, मुवि, भटक्या खेडवाला, लीलाधर, निम आणि मी पोहोचलो. आखाती देश, डॉलरची स्थिती अशा गंभीर विषयांवर चर्चासत्र चालू असतानाच सूड, किसन आणि स्पा येऊन थडकले आणि ऑफिशीयली कट्टा जमला. डॉ. खरे असल्यामुळे भन्नाट गप्पा होणार हे नक्की होतंच, आणि झालंही तसंच. अनेक विषयांवर डॉ. खरेंच्या तुफान फटकेबाजीचा आणि सोबत ६ पहाडी ग्रिल सँडविचेस, २ पाव भाजी, २ कोल्ड ड्रिंक्स, एक कॉफी, एक कोक फ्लोट आणि एका बटरस्कॉच मिल्कशेकचा आस्वाद घेता घेता १.५-२ तास कसे गेले कळलंच नाही. त्यानंतर बाहेर पडून पुन्हा असाच एखादा अचानक कट्टा जमवायचा प्लॅन झाला, आणि कट्टेकरी मंडळी आपापल्या घरांकडे परतली. q कट्टेकरी (समोरील रांगेत डावीकडून) - स्पा, मुक्त विहारी, भटक्या खेडवाला, डॉ. सुबोध खरे s कट्टेकरी (डावीकडून) - सूड, किसन शिंदे, लीलाधर, मी, स्पा. s पेटपूजेसाठी मागवलेल्यांपैकी (सुदैवाने फोटो काढण्यापुरते)शिल्लक राहिलेले पदार्थ.. sd गप्पा नाष्ट्याचा आस्वाद घेताना कट्टेकरी (डावीकडून) - मुक्त विहारी, भटक्या खेडवाला, डॉ. सुबोध खरे, निम, सूड.

डॉक्टर फ्रंटफुटवर येउन जी काही खेळी करुन गेले आहेत की अजून थांबलो असतो एखाद तास तर आणखी त्यांची फटकेबाजी पहायला आणि ऐकायला मिळाली असती... असो पुढील कट्टयाच्या प्रतिक्षेत असलेला... प्रतिक्षित (लीलाधर)

डोंबिवलीकर मिपाहो, असे अचानक कुठेही जाहीर वाच्चता न करता कट्टा उरकल्यापद्दल तीव्र निषेध. गेल्या वेळी डोंबिवली कट्टा झाला त्यावेळी मला मिपाचे सदस्यत्व मिळाले नव्हते. त्यामुळे तेव्हा फक्त एक वाचक म्हणुन त्या कट्टयाला येणे मला शक्य झाले नाही. त्यावेळी त्या कट्टयाचा सविस्तर वृतांत वाचून मनाचे समाधान करून घेतले होते आणि पुढील कट्टयाला नक्की जायचे असे ठरवुन सदस्यत्व मिळवण्यासाठी मालकांना (मा. नीलकांत) गळ घातली होती. पण नशिबाने यावेळीसुद्धा दगाच दिला. तुम्ही आपसात कट्टा ठरवुन जरासुद्धा खबरबात न लागु देता तो उरकुनदेखील टाकलात. घरडा सर्कलपासून माझे घर अवघ्या दहा मिनिटांवर आहे. रविवारी ८ सप्टेंबरला सकाळी १० वाजता मला तेथे येणे सहज जमले असते. सर्व मिपाकरांना भेटण्यास ऊत्सुक असल्याने हा वृतांत वाचुन हळहळ झाली. तेव्हा पुढील कट्टयाआधी जाहीर आमंत्रण देऊन आपणा सर्वांना भेटण्याची संधी द्यावी हि विनंती.

आम्हांला आधी कल्पना असती तर तुम्हांला नक्की बोलावले असते. असो, पुढल्या कट्ट्याला नक्की.. मु.विं.नी तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक मला व्यनि केलाय. त्यामुळे आता संपर्कात राहूच... :)

वृत्तांत अगदी खुसखुशीत बरं का!! अचानक बोलवून चक्क दहा जण जमतील असं अजिबात वाटलं नव्हतं.