सगळ्या भावना आणि घटना टिपणारी छायाचित्रे आवडली. फोटो-स्टोरी हे करणे बेक्कार अवघड असत असणार, मला नेहमी, अश्या परिस्थितीत फोटोग्राफर कसा काय काम करतो ? असा प्रश्न पडतो. स्वतः पण (भिंतीवरच्या) फोटो चा भाग न बनता फोटोग्राफी करणे म्हणजे 'सलामी' काम आहे.
केमिकॅल अस्त्राने, काय झाले याचे फोटो खालच्या लिंक मध्ये आहेत,
सिरीया !
ती खूप भीतीदायक वाटतात कारण जी आपल्या मनात युद्धातल्या मृत्यू ची कल्पना असते, ती कल्पना मोडून काढतात.
फोटो-स्टोरी हे करणे बेक्कार अवघड असत असणार, मला नेहमी,
या संदर्भात टाईम मॅगझिन मधील हा फोटो एसे पहा. मी सगळा वाचत बसलो नाही (आणि ते फोटो पण बघायला गेलो नाही...)
खूप भयानक, पण सत्य आहे.
फोटो एसे, हा प्रकारच भारी आहे, प्रत्येक फोटोची एक गोष्ट असते आणि प्रत्येक फोटो एक पुस्तक म्हणून पण वाचता येतो. टाईम ची फोटो एसे ची एक वेबसाईट आहे "लाईफ !
अस्वस्थ करणारी छायाचित्रे आहेत. तेच वरील जॅक डनियल्स यांच्या प्रतिसादातील बॉस्टन ग्लोबमधील दुव्याबद्दल...बरेच कंगोरे असलेला हा विषय आहे.
रासायनिक शस्त्रे वापरली गेली आहेत हे सत्य आहे... पण जे आजपर्यंत चालत आले आहे तेच आत्ता देखील होत आहे. लहान राष्ट्र आणि तिथला हुकूमशहा मोठ्या राष्ट्राच्या हातातले स्वतःचा स्वार्थ (आणि जीव देखील) टिकवण्यासाठी खेळणे होणार. मग दुसरे मोठे राष्ट्र त्यावर हल्ला करणार अथवा त्याहूनही अधिक म्हणजे परीस्थिती चिघळवत ठेवणार...
तेथे नागरीयुद्ध चालू आहे. आसाद वाईट आहे हे नक्कीच. पण त्याचे विरोधक देखील आले तर ते कट्टर इस्लामिस्ट आणि अलकायदाने प्रेरीत झालेलेच असणार आहेत.
अमेरीकेने रासायनिक शस्त्रांचा वापर केल्याने आंतर्राष्ट्रीय कराराचा भंग झाला म्हणून सिरीयावर हल्ला करायचे योजले खरे. त्यातली मेख अशी की सिरीया ह्या करारात सामीलच नाही... त्या व्यतिरीक्त अमेरीकन जनता आणि राजकारणामुळे असेल पण अमेरीकन काँग्रेस देखील युद्धाच्या विरोधात आहे.
त्यात भरीस भर म्हणून रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादीमिर पुतिन यांनी न्यू यॉर्क टाईम्स मधे अमेरीकेन जनतेला उद्देशून स्तंभलेखन (ऑपएड) लिहीले आहे. त्यात आपण (रशियन्स) कसे आंतराष्ट्रीय कायदा पाळतो आणि अमेरीका कशी पाळत नाही इथपासून ते देवाने सर्वांना समान तयार केले असे कधीकाळी साम्यवादी रशियाच्या गुप्तहेर संघटनेचा प्रमुख (पुतिन) बोलताना दिसतो!
आखातातले तेल जर समुद्राखालून युरोपात आणायचे असेल तर सिरीया हा योग्य पर्याय आहे. आणि तसे झाले तर रशियाच्या तेलाचे काय होणार हा प्रश्न आहे.
View Larger Map
मेंदू प्रगत झाला आणि जनावर व मानवात खूपच फरक पडला...
जनावरे अजूनही मेंदूचा उपयोग पोटाची भूक भागण्यासाठी गरज आहे तेवढीच हत्या करण्यासाठी करतात, माणूस मात्र मेंदूची सतत वाढत जाणारी आणि न भागणारी भूक (हाव) भागवायलाही हत्या करायला लागला.
अत्यंत वाईट.. सत्ता, अधिकार, पैसा आणि वर्चस्व ह्यापायी माणुसकी विसरतात लोक.. विश्वाच्या पटलावर एका धुलिकणाएवढी पृथ्वी, त्या पृथ्वीच्या इतिहास-भविष्याच्या तुलनेत एका नॅनोसेकंडएवढा माणसाचा आयुष्यकाल! किती महत्त्व देतात लोक आपल्या क्षुल्लक आयुष्याला आणि त्यातील महत्त्वाकांक्षांना, आणि किती क्रूर होतात त्यापायी ? देवा, माणुसकी दे रे माणसाला..
ही सुन्नी आणि अलेवाइट या इस्लामच्या दोन पंथांमधली मारामारी आहे. टर्की आणि कुर्दीश मारामारी सुद्धा सेम. १० लाख कुर्दीश नागरिक सद्दाम हुसेन नं नर्व्ह गॅस वापरून मारले होते. हे काम करणार्या सेनाधिकार्याला 'केमिकल अली' असच म्हणत.
सामान्य सिरीयन नागरिकांच जीवन अवघड आहे या परिस्थितीत पण अमेरिकेनं जिथं तिथं रेबल्स ना शस्त्र / ट्रेनिंग देणं आतातरी थांबवाव...जे काही करायचय ते मध्य आशियातल्या देशांनी कराव. इराणचा शाह, हुस्ने मुबारक, गद्दाफी यांना हटवून काय भलं झालं त्या त्या देशांच आणि जगाच?
मागे मी मद्रास केफे वरील लेखात प्रतिसाद देतांना एक लिंक दिली होती ती वाचावी के जी बी चा माजी गुप्तहेर अमेरिकेत पळून गेल्यावर १९८४ साली त्याने अमेरिकन अधिकाऱ्यांना दिलेली माहिती इतक्या वर्षांनी तू नळीवर उपलब्ध आहे.
त्यात त्याने साफ म्हटले होते जगभरातील कोणतीही ग्रास रूट चळवळ हि उस्फूर्त नसते.
सिरीयामध्ये बंडखोरांना मदत करणारे ह्या विध्वंसाला तितकेच जबाबदार आहे.
अमेरिकेला फक्त ९-११ माहिती आहे ,
पण अमेरिकेने इराक व अफगाण मध्ये २४-७ जे आरंभले आहे हे सर्व जगाला ठाऊक आहे.
रिसेशन च्या फेर्यातून अमेरिका नुकतीच गेली आहे ,
त्यांच्या जनतेला अमेरिका युद्ध फक्त हॉलीवूड च्या सिनेमातच जिंकते हा साक्षात्कार झाला आहे.
रासायनिक व आण्विक शस्त्रे व त्यांचा प्रसार हा अरब राष्ट्रांनी केला नसून त्यांना हि शस्त्रे प्रगत राष्ट्रांनी दिली.
आता अमेरिकेत १००० जास्त अण्वस्त्रे लोणच्याच्या बरणीत ठेवली असून कधीकाळी जगावर एलियन चा हल्ला झाला तर तिला वाचविण्याची जबाबदारी एक जबाबदार महासत्ता म्हणून अमेरिकेला पार पाडावी लागणार म्हणून नाईलाजाने ते अण्वस्त्र स्वतः कडे ठेवून इराण ला ती बनवू देत नाही आहेत.
ओबामा ला नोबेल देण्याचा पश्चात्ताप तो देणाऱ्या संघटनेला होता होता वाचला
सिरीया मध्ये संयुक्त राष्ट्र संघांची शांती सेना पाठवायला हवी अजून इजिप्त शांत झाले नाही आहे. आणि
अमेरिका मात्र असाद ने काही हजार सिरियन मारले त्यासाठी सिरीयाशी युद्ध करून काही लाख सिरियन इराकी मारले तसे मारणार.
गिरिश कुबेर यांचे राजहंसने प्रकाशित केलेले "युद्ध जिवांचे" हे पुस्तक जेव्हा वाचले तेव्हाच मी समजून चुकलो होतो की युद्धे ही लढण्यासाठी नसतात तर फक्त आणि माणसं ते ही जास्तीत जास्त कशी मारली जातील हे निश्चित करण्यासाठीच होते. रासायनिक / जैविक अस्त्राचा प्रयोग अगदी आदिम काळापासून केला गेला आहे, हे वाक्य जर मी हे पुस्तक वाचण्याआधी कोणी माझ्यासमोर व्यक्त केले असते तर मी त्याला वेड्यात काढले असते.. पण इंग्लडने अमेरिकेत प्रवेश करताना काय केले हे जेव्हा वाचले तेव्हा खरचं मला वाचताना पण विश्वास बसला नाही मी थोडा नेटवर शोध घेतल्यावर जे जे सापडले ते आपल्यासारख्या सामान्य माणसांना प्रचंड धक्कादायक असते.
मी नेहमी म्हणतो, आपण मानव म्हणजे सभ्य व शांततेचे पुरस्कर्ते आहोत हा जगातील सर्वात मोठा विनोद आहे, मानव म्हणजे जगातील सर्वात घातक व धोकादायक प्राणी आहे, जो फक्त आणि फक्त विनाश करु शकतो. फक्त हे तात्कालिन परिस्थितीवर अवलंबून असते की तो कसा वागणार आहे.. अफाट शक्ती जेव्हा हाती असते तेव्हा हिरोशिमा व नागासाकि या खूप छोट्या गोष्टी आहेत!
आपण जे भविष्य गृहीत धरले आहे त्याच्या नाशाची ही सुरुवात आहे. अजूनही बहुसंख्यांना वाटते की सीरियात जे यादवीयुद्ध गेली काही वर्षे चालू आहे त्यामागे दोन धार्मिक गटांमधली तेढ किंवा तत्सम कारणे आहेत. तशी ती आहेतच पण त्यांचा परिणाम शतगुणीत करणारी कारणे कोणत्याही मुख्य प्रवाहातील माध्यमात सांगितली जात नाहीत.
सुन्नी, शिया वा अलावाईत मुसलमान तिथे अनेक वर्षांपासून राहतात आणि भांडतातही पण त्यांची भांडणे इतक्या विकोपाला जाण्याचे कारण आहे अन्नपाण्याची टंचाई आणि आर्थिकदृष्ट्या कोसळत चाललेली व्यवस्था.
हवामान बदलाचा थेट परिणाम दिसणारी ही पहिली घटना असावी आणि असे प्रारब्ध आपले नाही असे समजणार्या लोकांसाठी हा धोक्याचा इशारा आहे.
गेली काही वर्षे सीरियात अभूतपूर्व असा दुष्काळ आहे.
गव्हाचे व इतर अन्नधान्याचे उत्पन्न खूप कमी झाले आहे (http://www.pecad.fas.usda.gov/highlights/2008/05/Syria_may2008.htm)
या दुष्काळामागे हवामान बदल हे एक प्रमुख कारण आहे पण त्याबद्दल वाच्यता केली जात नाही. त्याचवेळी खनिज तेलाचे उत्पादन कमी होऊ लागले आहे. सीरियासारख्या तेल निर्यातदार देशांचे तेल निर्यातीतून मिळणारे उत्पन्न घटत चालले आहे आणि त्याचवेळी लोकसंख्या विविध कारणांनी वाढतच आहे व त्यात इराकसारख्या देशांतून येणार्या विस्थापितांची भर पडत आहे.
(http://www.noaanews.noaa.gov/stories2011/20111027_drought.html)
तेलाच्या तुटवड्याचा धोका वेळीच लक्षात घेऊन अमेरिकेने आपला व आपल्या मित्रांचा तेल पुरवठा 'सुरक्षित' करण्यासाठी आधीच आखलेल्या धोरणाप्रमाणे या प्रदेशात आपला फास आवळायला सुरुवात केली आहे.
तिकडे रशियाला तेलातून जर पुरेसे उत्पन्न मिळाले नाही तर त्यांच्याही अर्थव्यवस्थेला धोका आहे. हवामान बदलाची झळ त्यांनाही बसू लागली आहेच.
या सगळ्या घटना म्हणजे आगामी जगव्यापी संघर्षाची नांदीच म्हटली पाहिजे.
घाबरवून सोडलत की हो. पण काही विचारजंत सुरक्षीत वातावरणात, गुबगुबीत खुर्च्यात बसून हे चाललय ते एव्हडं वाईट नाही, यापुर्वी याहून भयंकर रक्तपात झालाय, वातावरण बदल ही समस्या नाही आहे, उलट आकडे देउन अनधान्याचे उत्पादन खूप वाढलय, अगदी भारतसुद्धा परत सुजलाम-सुफलाम होइल अशी गोग्गोड स्वप्न दाखवतायत त्याचं काय?
घाबरण्यासारखीच परिस्थिती आहे आणि जितक्या जास्त लोकांना याची जाणीव होईल, तितक्या चांगल्या पद्धतीने ती हाताळली जाईल असे वाटते.
परंतु ज्यांचे लघुकालीन हितसंबंध गुंतलेले आहेत, ते लोक बुद्धिभेद करून लोकांना अंधारात ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.
तरीही बहुतेक लोकांना अंतर्मनात एक जाणीव असते की जे चाललंय ते सस्टेनेबल नाहीय आणि भविष्यात कधीतरी आपल्याला किंवा आपल्या मुला-नातवंडांना गंभीर प्रसंगाला तोंड द्यावे लागेल. अशा दु:खद जाणीवेला तोंड देण्याच्या पाच पायर्यांपैकी तुम्ही म्हणता त्या विचारजंतांसह बहुतेक जण पहिल्याच म्हणजे डिनायलच्या पायरीवर आहेत.
येणारा काळ आणखी काय दाखवणार आहे ठाऊक नाहि... पण जे काहि चाललय ते परिस्थिती सुधारण्यासाठी नव्हे तर आणखी बिकट करण्यासाठी होतय... आणि हो... भारत सध्या सुपात आहे... जात्याच्या दिशेने आपली प्रगती अपेक्षेपेक्षा जास्तच फास्ट आहे. येत्या ५० - १०० वर्षात आपण हा धोका ऑलमोस्ट टाळलेला तरी असु किंवा अगदी त्याच्या उंबरठ्यावर तरी असु.
फार भयंकर आहे हे.
शेलिंग पहाणारी लहान मुले / मुलाला पुरणारा बाप / कचर्यात पडलेली प्रेते.
कशासाठी भोगताहेत हे अत्याचार हे लोक. काय गुन्हा असेल त्यांचा.
सध्या जरी हा संघर्ष महासत्तांमधील संघर्ष वाटत असला तरी फार काळ तटस्थ राहणे इतर राष्ट्रांना परवडणारे नाही. प्रचंड वेगाने संपत जाणारे नैसर्गिक वायू, तेल, खनिजे आणि पाण्याचे साठे यांवर हक्क मिळवण्यासाठी प्रत्येक देशाला आज ना उद्या आपापली बाजू निवडावीच लागणार आहे. जेव्हा प्रश्न सर्व्हायवलचा असतो तेव्हा धर्म, देश, संस्कृती, नैतिकता ही वरवरची पातळ आवरणे ओरबाडली जाऊन आतील पशूचे दर्शन होऊ लागते.
अमेरिका आणि इतर साम्राज्यवादी राष्ट्रे यांना दोष देतांना आपल्याच देशातील शेजारी राज्यांमध्ये याच प्रश्नांवरून संघर्ष वाढत चालला आहे हे देखील विसरून चालणार नाही. सध्या तरी परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही एवढेच फार तर म्हणता येईल. "आधुनिक राष्ट्रवाद" या संकल्पनेलाच सुरुंग लागण्याची ही चिन्हे आहेत. राष्ट्र्वादाकडून टोळीवादाकडे उलटा प्रवास सुरु झालेला आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक देशाला आपापली बाजू निवडावी लागणार आहे त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीलाही एक ना एक दिवस आपापली टोळी निवडावी लागणारच आहे.
पण ते तेवढे "जी" सोडून द्या बुवा! आपल्या मराठमोळ्या भाषेला हे असले काही मानवत नाही! आपल्या रांगड्या मराठी भाषेत हा "जी" म्हणजे दिल्लीमधील मराठी नेत्यांसारखा बापुडवाणा दिसतो.
अमेरीकेने जेथे जेथे पाय रोवलेत तेथे तेथे अक्षरशः वाट लावली आहे.
सर्वात मोठा दहशतवादी देश म्हणून नावलौकीक झालाच आहे.
पाकिस्तानात भर वस्तीत बाजारात अमेरीकन सैनीकानी एक खून केला. खुनी मात्र निवान्त देशाबाहेर गेले.
अर्थात पाकिस्तानात तेवढा दम नाहिय्ये. मात्र एका सार्वभौम देशात उद्दाम पणे अमेरीका हे करु शकते.
जे जे समोर दिसतय ते खरे आहे का ? ही छायाचित्रे कुणी प्रसृत केली ? अमेरीकेने प्रसृत केली असतील तर ती का केली. त्यांना सिरीयावर हल्ला करायला नैतिक पाठबळ मिळावे म्हणून का !
एके काळी सद्दाम हुसेन अमेरीकेचा लाडका होता. नंतर पैशाच्या वाटणीवरून या चोरांमधे भांडणे झाली त्यात सद्दाम मारला गेला. कुत्रा मारण्यापूर्वी तो पिसाळलेला आहे हे जाहीर करावे लागते. म्हणजे जगाचे समर्थन आपोआप मिळते.
११ सप्टेंबर २००१ला अमेरीकेवर हल्ला झाला. त्याचा अमेरीकेने पद्धतशीर प्रचार केला. त्यावेळी सगळ्या जगाची सहानुभूती अमेरीकेला होती. त्याचा फायदा घेऊन अमेरीकेने अफगाणिस्तानात उभा आडवा हात मारून घेतला.
लेखामधील एका चित्रात बंडखोर महिलेचे चित्र आहे. हे चित्र खरे आहे याची खात्री कोण देणार ? ही महिला सिरीयनच आहे का ? अमेरीकन नाही कशावरून ? असली तरी बंडखोर आहे कशावरून ? (कृपया माझ्या एवढ्याच एका मुद्द्याला लोंबकाळून झोके घेऊ नयेत. पूर्ण म्हणणे ध्यानात घ्यावे)
अफगाण युद्धाच्या काळात तालिबान जिंकले तर काय होइल या अर्थाची चित्रे इंटरनेटवर पहायला मिळत.
लिबर्टीच्या पुतळ्याला बुरखाजॉर्ज बुशला दाढी
आपल्या हल्ल्याचे समर्थन करण्याचा हा खटाटोप होता.
लादेन हाही कुकर्मा, दहशतवादी म्हणून जगासमोर आणला गेला. तुम्ही आम्ही काय प्रचार केला ते लक्षात ठेवतो. कोण सांगतय आणि त्याचा हेतू काय आहे हे लक्षात ठेवत नाही. एकेकाळी लादेन बुशचा बिझिनेस पार्टनर होता. बुशसाहेबांचे टेक्सासमधे १६०० एकरचे मोठे फार्म हाऊस आहे. तिथे बुश आणि लादेन यांच्या भेटी होत असत. नंतर लादेन वाइट आहे असा प्रचार होवू लागला. कारण तेव्हा या दोन चोरांमधे भांडण झाले होते.
अफगाणिस्तानात गॅस पाइपलाइनीकरता जागा मिळावी यासाठी अमेरीका तालिबानशी बोलणी करीत असे. त्यांच्यावर पैसा ओतत असे. त्यावेळी तालिबान अमेरीकेसाठी अजिबात वाइट नव्हते. तालिबान हेदेखील काही प्रमाणात अमेरीकेचेच पिल्लू आहे. रशियाची अफगाणिस्तानवरील पकड कमी करण्यासाठी अमेरीकेला या प्रदेशात कुणी बाहुले हवे होते.
प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर वातावरण निर्मिती करण्याची अमेरीकेची जुनी पद्धत आहे.
अँजेलिना जोलीला आपला देश सोडून सिरीयन लोकांचे अश्रू पुसायला जायची आणि आपल्या सिरीया भेटीचे फोटो प्रसिद्ध काय गरज आहे ? हा या वातावरण निर्मितीचाच भाग आहे.
हिरोशिमा व नागासाकीवर अणुबाँब टाकणारी अमेरीका हीच सर्वात मोठी दहशतवादी आहे.
(फारच कणव असेल तर अँजेलिनाताईने जपानमधील अणुबाँबग्रस्त पिढ्यांचे अश्रू पुसावेत)
माध्यमांवर विश्वास ठेवता येणार नाही . आणि पाश्विमात्य माध्यमांवर तर मुळीच नाही. मध्यपुर्वेतील त्यातही स्पेशली सीरीया आणि इराण मधील माध्यमांतील काही रेफरन्स द्यावा .( इराण कारण सीरीयातील राजकीय संघर्शाला जातीय रंग ही आहे इतर मध्यपुर्वेतील माध्यमांवर विश्वास ठेवणे अवघड आहे )
संध्यानंद चे दुवे वेळेत सापडले नाहीत म्हणून हे दुवे जोडावे लागले…एक डाव माफी द्या
अवांतर : जीवाची बाजी लावून हे फोटो काढताना आणि कव्हरेज घेताना संबंधित न्यूज मिडीयांचे १० पेक्षा जास्त पत्रकार सिरीयामध्ये मृत्युमुखी पडले आहेत.
>>आय हॅव अ स्मॉल क्वेश्चन " व्हाय अमेरीका पुटस हर दर्टी नोज ज्यात त्यात "
प्रचंड पैसा आणि त्याचा असलेला प्रचंड माज
अगणित शस्त्रास्त्रे आणि ती कुणा ना कुणावर वापरायची असलेली खुमखुमी
संपूर्ण जग आपल्याच छत्राखाली असावे ही इच्छा
जाईल तिथे आपटी खाल्ल्याने अजुनही चालु असलेला विजयाचा शोध
हीच कारणे असावीत...
सहमत. कुठलासा पिच्चर पाहिला होता, आम्रिकेतले शस्त्रास्त्रांचे व्यापारी असल्या वेळी कसं आपापलं उखळ पांढरं करून घेतात त्याबद्दल. भौतेक निकोलस केज होता त्यात. जब्री होता पिच्चर, नाव कै आठवायला तयार नै. :(
प्रतिक्रिया
भयानक
सहमत.
सगळ्या भावना आणि घटना टिपणारी
फोटो एसे
खूप भयानक, पण सत्य आहे.
....
लहान मुलांना मारुन जग जरी
अस्वस्थ
View Larger Map
एका सुंदर देशाची हि अवस्था
मेंदू प्रगत झाला आणि जनावर व
+११११
यासंदर्भात
+1
सत्ता नि राजकारणाबरोबरच
ऑथेंटीसिटी ?
वाईट..
पाहवतही नाही इतकं भीषण आहे हे
ही सुन्नी आणि अलेवाइट या
मागे मी मद्रास केफे वरील
गिरिश कुबेर यांचे राजहंसने
आपण जे भविष्य गृहीत धरले आहे
.
अगदी भारतसुद्धा परत सुजलाम
घाबरण्यासारखीच परिस्थिती आहे
पिच्चर अभी बाकी है दोस्तों...
फार भयंकर आहे हे.
अंतिम संघर्ष
+1
+ १
धन्यवाद!
ओक्के...
अमेरीकेने जेथे जेथे पाय
सद्दाम ला नक्की कशासाठी फाशी
इराण..?
.
आपल्या हल्ल्याचे समर्थन करण्याचा हा खटाटोप होता. लादेन हाही कुकर्मा, दहशतवादी म्हणून जगासमोर आणला गेला. तुम्ही आम्ही काय प्रचार केला ते लक्षात ठेवतो. कोण सांगतय आणि त्याचा हेतू काय आहे हे लक्षात ठेवत नाही. एकेकाळी लादेन बुशचा बिझिनेस पार्टनर होता. बुशसाहेबांचे टेक्सासमधे १६०० एकरचे मोठे फार्म हाऊस आहे. तिथे बुश आणि लादेन यांच्या भेटी होत असत. नंतर लादेन वाइट आहे असा प्रचार होवू लागला. कारण तेव्हा या दोन चोरांमधे भांडण झाले होते. अफगाणिस्तानात गॅस पाइपलाइनीकरता जागा मिळावी यासाठी अमेरीका तालिबानशी बोलणी करीत असे. त्यांच्यावर पैसा ओतत असे. त्यावेळी तालिबान अमेरीकेसाठी अजिबात वाइट नव्हते. तालिबान हेदेखील काही प्रमाणात अमेरीकेचेच पिल्लू आहे. रशियाची अफगाणिस्तानवरील पकड कमी करण्यासाठी अमेरीकेला या प्रदेशात कुणी बाहुले हवे होते. प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर वातावरण निर्मिती करण्याची अमेरीकेची जुनी पद्धत आहे. अँजेलिना जोलीला आपला देश सोडून सिरीयन लोकांचे अश्रू पुसायला जायची आणि आपल्या सिरीया भेटीचे फोटो प्रसिद्ध काय गरज आहे ? हा या वातावरण निर्मितीचाच भाग आहे. हिरोशिमा व नागासाकीवर अणुबाँब टाकणारी अमेरीका हीच सर्वात मोठी दहशतवादी आहे. (फारच कणव असेल तर अँजेलिनाताईने जपानमधील अणुबाँबग्रस्त पिढ्यांचे अश्रू पुसावेत)
१. अनोखा लग्न समारंभ
सिरीयातील यादवी बद्दल आपले मत
.
लाजू नका संपर्क साधा आणि खात्री करून घ्या
.
लेखाची शेवटची ओळ
.
एक्ज्यॅक्टी !!
रिस्पेक्टेड गिरीजाकाकू
.
मिडीयांचे १० पेक्षा जास्त पत्रकार सिरीयामध्ये मृत्युमुखी पडले आहेतआय हॅव अ स्मॉल क्वेश्चन " व्हाय अमेरीका पुटस हर दर्टी नोज ज्यात त्यात ">>आय हॅव अ स्मॉल क्वेश्चन "
नाही. त्यांची इकॉनॉमी युद्ध
सहमत. कुठलासा पिच्चर पाहिला
लै खंग्री पिक्चर..
रैट्ट!!!! तोच तो. काय पॉवरफुल
Pagination