झुक्या चे अभंग
खेळ मांडीयेला फेसबुके घाई, नाचती फेसबुके भाई रे
क्रोध अभिमान भिने त्यांच्या मनी, एक एका पकडति गळा रे
कुणी धर्माभिमानी, कुणी पुरिगामी. द्वेशाच्या माळा, लाईक्स मिरविती गळा
शिव्या शापाची घाई, गाली वर्षाव, अनुपम्य फेसबुक सोहळा रे
वर्ण अभिमान मिरवति जाती, एक एका लोटांगणी जाती
भेसळ चित्ते झाली नवसागर, पाषाणा हृदयी कलहती रे
होतो जयजयकार गर्जत फेसबुक, मातले हे फेसबुके वीर रे
झुक्या म्हणे सोपी केली पायवाट, समाज नेई स्मशान घाट रे..
अवि
💬 प्रतिसाद
(3)
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 09/16/2013 - 13:18
नवीन
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Wed, 09/18/2013 - 06:08
नवीन
वा बुवा! मस्त मारलायत!
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 09/18/2013 - 06:41
नवीन
आजकाल लोक एकवेळ कोण तुक्या म्हणून विचारतील पण झुक्या मात्र सगळ्याना माहिती!
- Log in or register to post comments