२०१४
देशाच्या प्राक्तनाचे
लिलाव जवळ येताच
भावी विधात्यांची
स्वप्नांची दुकानं
पॉश एरीयातल्या
आर्ट गॅलरीतली
कोलाज बनून सजतात
गूढ, अगम्य, गुंगवणारी
पण प्रेक्षणीय
आणि चक्क श्रवणीयही
तेव्हां..
टाळ्या पिटायला
आख्खी धारावी धावते
आणि वाट पाहते
पुढच्या शो ची
पुन्हा पाच वर्षांसाठी
- संध्या
१७.९.१३
💬 प्रतिसाद
(7)
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 09/16/2013 - 21:48
नवीन
@आणि वाट पाहते
पुढच्या शो ची
पुन्हा पाच वर्षांसाठी >>> वा वा.. छान!
अवांतरः-(अंतू बर्वा मोड)- आंता निवडणूकां विरोधी काव्यरणशिंग फुंकलनीत किं काँय? 
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Mon, 09/16/2013 - 22:02
नवीन
एकदम विद्रोही वगैरे?
थोडी छोटी नि तुटक पण छान.
अशा कविता मोठ्ठ्या चान वाटतात, व्यासपीठ सजवायला नि कवीसम्मेलन गाजवायला. :)
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Tue, 09/17/2013 - 03:25
नवीन
आपल्या हाती फक्त मतदान!
मतमोजणी सुद्धा नाही.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 09/17/2013 - 06:15
नवीन
जाउ द्या हो.
चालायचंच.
- Log in or register to post comments
च
चाणक्य
Tue, 09/17/2013 - 06:47
नवीन
दिवसांनी तुमची कविता आली. छोटेखानी पण चांगली.आहे
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 09/17/2013 - 07:39
नवीन
व्वाह!!
- Log in or register to post comments
अ
अग्निकोल्हा
Tue, 09/17/2013 - 14:40
नवीन
.
- Log in or register to post comments