Welcome to misalpav.com
लेखक: एस | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

चारही टिशर्टस आवडले! "फीलिंग्ज जाळून टाका" ची पार्श्वभूमी म्हणून माओचा (हात उंचावलेला) किंवा स्टॅलिनचा (टोकदार मिशाधारी) फोटो शोभला असता! बारक्या अक्षरांत "१९८४" सुद्धा समर्पक ठरलं असतं :)

हा जाळून टाका वाला टीशर्ट एका ताज्या प्रेमभंगवीराने आमच्या क्लायंटाकडून रडून-भांडून-मस्का लावून वगैरे हर प्रयत्नांनी (फुकटात) ठेऊन घेतला आहे असे क्लायंटाने आजच कळवलंय. :P बिचारा!
"फीलिंग्ज जाळून टाका" ची पार्श्वभूमी म्हणून माओचा (हात उंचावलेला) किंवा स्टॅलिनचा (टोकदार मिशाधारी) फोटो शोभला असता! बारक्या अक्षरांत "१९८४" सुद्धा समर्पक ठरलं असतं
नक्कीच.

मस्त आहे! आणखी काही भयंकर वाक्यं निव्वळ कल्पना म्हणून लिहून ठेवा! कधीतरी उपयोगी पडतील!

पैसाताई, या क्लायंटाच्या रूमच्या भित्ताडांवर अशीच दिव्यवचने पूर्वी रंगवलेली होती.

टिशर्ट वरची कॅलिग्राफी हा एक अत्यंत नावाजलेला प्रकार आहे. त्यात केलेले वेगवेगळे प्रकार बघता थक्क व्हायला होतं. आपण जे केलंय ते प्रयत्न म्हणून नक्कीच स्तुत्य आहे. बेस्ट ऑफ लक.

कॅलिग्राफी हा प्रकारच इंटरेस्टींग आहे. टीशर्ट वर, मग्जवर, ग्रीटींग्ज वर हे त्यांचे वेगवेगळे अ‍ॅप्लीकेशन झाले. सुलेखनकार श्री. अच्युत पालव यांनी मराठी अशी कॅलिग्राफीची गोडी लावली. बाकी धागाकर्त्याने स्वतःच इतक्या अटी जाहीर करुन टाकल्यात त्यामुळे कशाबद्दल काय बोलावे हेच सुचत नाही. :( तूर्तास स्वतःला लै सीलबंद करुन धागा टाकला त्याबद्दल अभिनंदन. :)

आदिभौ, निव्वळ मजा म्हणून केलंय. खरंतर शक्य तितकी गिचमिड करायची असं ठरवलं होतं पण अच्युत पालवांच्याचपासून स्फूर्ती घेतलेले आमचे हात अंमळ बरे चालू लागलेले पाहून ऐनवेळी ज्याला जसे सुचेल तसे बदल केले आहेत. त्यात फॉण्टटाईप, साइज, जाडी वग्रै सगळंच आलं. ;) (डेव्हिल मोड ऑफ्. फालतूच आहे याची पूर्ण कल्पना आहे. डेव्हिल मोड ऑन्.) अभ्या, वरील अटींमुळे खरंतर चेकाळून सगळे धांगडधिंगा घालतील अशी अपेक्षा होती पण सगळा विरस झाला. छ्याट् च्या मारी... ती क्यालिग्राफी गेली खड्डयात. अटींवर तरी बोला बिंदास!

Lee Cooper चे टीशर्ट्स ह्या असल्या प्रकारासाठी वाया घालवले??

परत एकदा वाचा. बादवे ह्या असल्या प्रकारासाठी माझे जलरंगांचे महागडे कुंचले आणि रंगतबक कायमचे वाया गेले ह्याचं जास्त वाईट वाटलं. आणि करायचंच म्हणल्यावर ली कूपर काय किंवा आणखी काय, मागेपुढे पाहिलं असतं असं वाटतं का? बाकी प्रतिसाद आवडेश

आता नेमके जे करू नका म्हटलंत ते सगळे केलंय आणि प्रश्न विचारलेत असं समजून तुमची "पुणेरी" स्टायलीतली उत्तरं द्या!! :-/