देव नावे भिक्षा चालुच राही....
देव नावे भिक्षा चालुच राही
पोटांस ह्यांच्या तडस नाही.
ह्यांना झाला भस्म्या माणुसकीचा
माणसांची श्रध्दा खात सुटती.
देवही आता ह्यांच्या दयेचा भुकेला
ह्यांच्या घरी सदा तुप आणी लोणी.
देवही असा पराधीन झाला
लागली नजर त्याला ह्या डोमकावळ्यांची.
सत्तेचा ह्यांना अस माज आला
माणसाचा ह्यांनी गुलाम हो केला.
देवास नाही गरज पैशांची
तो तर भक्तांच्या भक्तीचा भुकेला.
भ़क्तीचा ह्यांनी बाजार मांडला
देवासही ह्यांनी कैदेत डांबला.
म्हणे दास निश जागे व्हा तुम्ही
देव चराचरी तुम्हां आम्हां ठायी.
देव चराचरी तुम्हां आम्हां ठायी.
(देवाचा बाजार मांडुन तुंबड्या भरणार्या भोंदु लोकांचा निषेध करावा म्हणुन ही कविता / अभंग आहे.)
💬 प्रतिसाद
(2)
च
चौकटराजा
Fri, 09/20/2013 - 10:22
नवीन
दास म्हणजे दाभोलकर सर काय ? सर . अभंग भिडणारा आहे.
- Log in or register to post comments
न
निश
Fri, 09/20/2013 - 10:50
नवीन
चौकटराजा साहेब का गरीबाची चेष्टा करताय. दास म्हंजे काय हे मी तुम्हाला सांगणे म्हंजे गल्लीतल्या क्रिकेटपटुने सचिन तेंडुलकरला क्रिकेट कस खेळायच हे सांगण्यासारख आहे. अभंग आवडल्याबद्द्ल आभारी आहे.
- Log in or register to post comments