दोष
मिसळलो त्यांच्यात ना मी, पाडले एकटे मला
पाहून संधी; काढून वेळ, दोष लावला मला ll १ ll
दिवसातले डावपेच रात्री, टाकायचे ठरवले तयांनी
रात्र त्यांची चोरली मी, हा दोष लावला मला ll २ ll
सभ्य कृतीत चौर्य, काय लागावी झोप तयांना
स्वप्ने तयांची चोरिली मी, हा दोष लावला मला ll ३ ll
फेडले वागलेले त्यांनी, सोने-पैसा लुप्त झाला
परीस त्यांचा चोरला मी, हा दोष लावला मला ll ४ ll
सजा तयांना द्याया ईश्वरे, योजून धाडिले संकटाला
कृपा ईश्वराची चोरली मी, हा दोष लावला मला ll ५ ll
झाले रिक्त कर्माने ते, परी मुळी ना पीळ गेला
चोरले मी पुण्य त्यांचे, हा दोष लावला मला ll ६ ll
पितळ झाले उघडे तयांचे, वाचा फुटेना बोलायला
शब्द त्यांचे चोरले मी, हा दोष लावला मला ll ७ ll
-सार्थबोध
💬 प्रतिसाद
(3)
अ
अभ्या..
Fri, 10/04/2013 - 09:19
नवीन
छान छान. आवडली
- Log in or register to post comments
त
तुषारहुषार
Fri, 10/04/2013 - 09:52
नवीन
सुन्दर!!!
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 10/04/2013 - 10:44
नवीन
छान रचना.
- Log in or register to post comments