Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आज पुन्हा उडावेसे वाटले

प — पल्लवी मिंड, Mon, 10/07/2013 - 16:50
आज पुन्हा उडावेसे वाटले पंखाना जरा विहारावेसे वाटले दगदग काय रोजचीच आज उसंतीला चाखावेसे वाटले घोटभर शांततेसाठी हे मायाजाल हटवावेसे वाटले आज पुन्हा उडावेसे वाटले आकाशात हरवावेसे वाटले धावपळीत विरघळलेल्या मला अलगद ओढावेसे वाटले आज पुन्हा उडावेसे वाटले नभीचे तरंग वेचावेसे वाटले विस्मृतित गेलेल्या बालपनाला परत जगावेसे वाटले त्या निरगसतेत झोकून द्यावेसे वाटले उंचावरच्या जगात मला आजमावेसे वाटले अंहपणाचा जप सोडून आज पुन्हा उडावेसे वाटले फार झाली आता अस्तित्वाची लढाई त्या गोड पाखरसारखे आज जगावेसे वाटले..... जगावेसे वाटले.......

प्रतिक्रिया द्या
1830 वाचन

💬 प्रतिसाद (11)
स
सुजित पवार Mon, 10/07/2013 - 18:06 नवीन
छान जमलि आहे...
  • Log in or register to post comments
प
पल्लवी मिंड गुरुवार, 10/10/2013 - 09:03 नवीन
खरच खूप आभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुजित पवार
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 10/08/2013 - 06:12 नवीन
मुळ कविता चांगली असल्या मुळे आम्हालाही प्रेरणा मिळाली :) आज मला कपडे बदलावेसे वाटले मोजेही जरा धुवावेसे वाटले अंगावरची जीन्स रोजचीच बर्‍याच दिवसानी तीला काढावेसे वाटले घोटभर चहासाठी कप विसळावेसे वाटले चहाचे भांडेही धुवावेसे वाटले झुरळांचा खडु फिरवावेसे वाटले बेडवरच्या मळलेल्या चादरीला अलगद ओढावेसे वाटले उशांचे अभ्रेही बदलावेसे वाटले भिंतीवरची जळमटेही काढावेसे वाटले दारा मागचे तसले फोटो फाडुन टाकावेसे वाटले ( पण खरच फाडले नाही हं.... फक्त वाटले :) ) त्या जागी देवादिकांचे फोटो लावावेसे वाटले टेरेस वरुन रोजच तुला पहातो आज तुझ्या समोर येउन एकदाच काय तो फैसला करावेसे वाटले फार झाले आता एकाकी जगणं तुझ्या सारखे गोडपाखरु आयुष्यात यावे असे वाटले...... त्याचमुळे..... आज मला कपडे बदलावेसे वाटले
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 10/08/2013 - 06:35 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
प
पल्लवी मिंड गुरुवार, 10/10/2013 - 09:04 नवीन
मस्त जमलय विडंबन ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 10/10/2013 - 18:53 नवीन
ह्ही ह्ही ह्ही!!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
क
क्रेझी Tue, 10/08/2013 - 07:10 नवीन
पल्लवीजी तुमची कविता खूप आवडली :) आणि ज्ञानोबांनी केलेलं विडंबनही छान आहे पण वेगळा धागा काढून ते डकवलं असतं तर बरं वाटलं असतं.
  • Log in or register to post comments
प
पल्लवी मिंड गुरुवार, 10/10/2013 - 09:05 नवीन
खूप आभारी आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रेझी
न
निवेदिता-ताई गुरुवार, 10/10/2013 - 19:06 नवीन
+१ दोन्हीही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रेझी
प
पैसा गुरुवार, 10/10/2013 - 19:09 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अग्निकोल्हा गुरुवार, 10/10/2013 - 20:03 नवीन
इतकच काय, धने, मिरे, मिरच्या , तिळगुळ, शेंगदाणे, अन साखरफुटाणेही वाटले, असे वाटले... म्हणूनही वाटले असे वाटले!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा