अविचल
पुसू पहातो पुसू शके ना अवकाशातिल मेघ दळे
उचंबळे तळ लाटेवरती अस्पर्शच पण चंद्र खळे
फुटे किनारा व्रण काठावर कातळ अविचल स्वर आदळे
घोंघावे वारा माडातुन वय झालेले गोत गळे
.................... अज्ञात
💬 प्रतिसाद
(4)
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 10/08/2013 - 07:37
नवीन
इतक्या कमी शब्दात इतकी अर्थपूर्ण रचना!!
__/\__!!
- Log in or register to post comments
स
सार्थबोध
Tue, 10/08/2013 - 07:42
नवीन
अतिशय सुरेख
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Tue, 10/08/2013 - 08:07
नवीन
वरीगिनल कविता आवडली आणि अगदी रहावले नाहि म्हणुन लावतो आहे.
पुसू पाहतो पुसू शके ना गालावरचे चुंबन खास
उचंबळे मन आठवणींने तव स्पर्शाचा होई भास
फुटे बिंग सापडती हीस माझ्या शर्टावरती केस
पटवा पटवी घरात चाले, दिवस चार जाणार उदास
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 10/08/2013 - 08:10
नवीन
काय ओ काका? आज गाडी एकदम जोरात आहे...
- Log in or register to post comments